Harley Davidson X440 | हार्ले-डेव्हिडसन X440 ची बुकिंग पुन्हा सुरू, आवडत्या व्हेरियंटवर प्रमाणे किंमत तपासून घ्या
Harley Davidson X440 | हार्ले डेव्हिडसन एक्स ४४० ची आतुरतेने वाट पाहणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. कंपनीने तब्बल 11 आठवड्यांनंतर पुन्हा एकदा हार्ले डेव्हिडसन एक्स 440 चे बुकिंग सुरू केले आहे. हार्ले आणि हिरो मोटोकॉर्पयांच्या सहकार्याने तयार करण्यात आलेले भारतातील सर्वात स्वस्त हार्ले डेव्हिडसन एक्स 440 या वर्षी जुलैमध्ये लाँच करण्यात आले होते.
राजस्थानमधील नीमराणा (जयपूरजवळ) येथील हीरो मोटोकॉर्पच्या प्लांटमध्ये तयार करण्यात आलेली हार्ले-डेव्हिडसन एक्स ४४० ही भारतीय बाजारात उपलब्ध असलेल्या रॉयल एनफिल्ड, जावा आणि होंडा च्या अनेक मिड-डिस्प्लेसमेंट प्रीमियम बाइक्सना टक्कर देते.
हार्ले-डेव्हिडसन एक्स ४४० ची डिलिव्हरी १५ ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. हिरो मोटोकॉर्पने एका निवेदनात म्हटले आहे की, कंपनीने देशभरातील 100 शोरूममध्ये ग्राहकांना 1,000 हून अधिक बाईक डिलिव्हरी केल्या आहेत. पहिल्या टप्प्यातील बुकिंगमध्ये हार्ले-हिरोने दावा केला होता की, 4 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान हिरो मोटोकॉर्पला एकूण 25,597 ऑर्डर मिळाल्या आहेत.
सणासुदीच्या काळात पुन्हा बुकिंग विंडो मिळाल्याने हिरो मोटोकॉर्पचे मुख्य कार्यकारी अधिकारी निरंजन गुप्ता यांनी सांगितले की, येत्या चार ते पाच महिन्यांत सर्व डिलिव्हरी पूर्ण होतील. पुरवठा साखळीवर परिणाम होऊ नये यासाठी कंपनी आधीच क्षमता वाढवण्याच्या प्रक्रियेत असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले की, हिरो मोटोकॉर्पचा प्रयत्न हार्ले डेव्हिडसन भारतातील प्रत्येक ग्राहकापर्यंत पोहोचविण्याचा आहे जो ते खरेदी करू इच्छितो. आगामी काळात हार्ले डेव्हिडसनचा वेटिंग पीरियड कमी करायचा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. म्हणजेच बुकिंग केल्यानंतर खरेदीदारांना हार्ले डेव्हिडसनची फार काळ वाट पाहावी लागणार नाही.
व्हेरियंटवर आधारित किंमत
हार्ले-डेव्हिडसन एक्स ४४० हे हिरो मोटोकॉर्प आणि हार्ले यांच्या सहकार्याने विकसित केलेले पहिले उत्पादन आहे. ही बाईक 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीत विकसित करण्यात आली आहे. लेटेस्ट एक्स ४४० मॉडेल भारतात उपलब्ध असलेले सर्वात स्वस्त हार्ले डेव्हिडसन आहे. याची किंमत 2.29 लाख ते 2.69 लाख रुपयांदरम्यान आहे. येथे आपण व्हेरियंटवर आधारित किंमती पाहू शकता.
X440 व्हेरियंट – किंमत (एक्स-शोरूम)
* Denim – 2.29 लाख रुपये
* Vivid – 2.49 लाख रुपये
* S – 2.69 लाख रुपये
फीचर्स
हार्ले-डेव्हिडसन एक्स ४४० मध्ये स्लिम टँक, सरळ बसण्याची स्थिती, रुंद बार आणि गोल हेडलाईट आहे. या सर्व वैशिष्ट्यांनी हार्लेचे क्लासिक डिझाइन कायम ठेवले आहे. लेटेस्ट एक्स ४४० मॉडेलची निर्मिती हिरोच्या राजस्थानमधील निमराणा फॅसिलिटी प्लांटमध्ये करण्यात आली आहे. हार्ले-डेव्हिडसन एक्स 440 मध्ये यूएसडी फ्रंट फोर्क, ड्युअल रियर शॉक, दोन्ही टोकाला ड्युअल चॅनेल एबीएस आणि डिस्क ब्रेक, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी आणि नेव्हिगेशनसह डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, 18 इंच फ्रंट आणि 17 इंच रिअर व्हील्स देण्यात आले आहेत. यात यूएसबी चार्जिंग सॉकेट, एलईडी लाइट्स आणि कनेक्टेड फीचर्स देण्यात आले आहेत.
इंजिन आणि स्पर्धा कोणाशी?
हार्ले-डेव्हिडसन एक्स ४४० मध्ये लाँग स्ट्रोक सिंगल सिलिंडर, ऑइल कूल्ड टेक्नॉलॉजी-आधारित ४४० सीसी इंजिन आहे जे २७ बीएचपी पॉवर आणि ३८ एनएम टॉर्क जनरेट करते. नव्या बाईकमध्ये देण्यात आलेल्या इंजिनला ६ स्पीड गिअरबॉक्सची जोड देण्यात आली आहे. एक्स ४४० चे इंजिन २० टक्के इथेनॉल आणि ८० टक्के इंधनावर म्हणजेच ई २० वर चालण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे.
रॉयल एनफिल्डला कडवी टक्कर देण्यासाठी हिरो आणि हार्लेने एक्स ४४० ची रचना केली आहे. हार्ले-डेव्हिडसन एक्स ४४० ची स्पर्धा बाजारात उपलब्ध असलेल्या रॉयल एनफिल्ड ३५० श्रेणीशी आहे. यामध्ये क्लासिक 350, हंटर अँड मेटिओर, होंडा सीबी 350 आणि सीबी 350 आरएस, बेनेली इम्पिरियल 400 या सारख्या कारचा समावेश आहे.
News Title : Harley Davidson X440 Price in India 18 October 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News
- Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट