12 December 2024 11:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Maruti Suzuki Swift | या कारच्या खरेदीसाठी शो-रूम मध्ये गर्दी, 6.49 लाखांची बजेटमधील कार खरेदी करा, फीचर्स जाणून घ्या BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL Horoscope Today | नवीन वर्ष 'या' राशींसाठी असणार अत्यंत खास; शनीच्या साडेसातीपासून व्हाल कायमचे मुक्त Samvardhana Motherson Share Price | संवर्धना मदरसन सहित हे 4 शेअर्स 45% पर्यंत परतावा देतील, फायदा घ्या - NSE: MOTHERSON Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या
x

Infinix Note 30 5G | 108 MP कॅमेरा असलेला दमदार Infinix Note 30 5G स्मार्टफोन फक्त 13,499 रुपयांमध्ये खरेदी करा

Infinix Note 30 5G

Infinix Note 30 5G | जर तुम्हाला कमी किंमतीत सर्वोत्तम कॅमेरा असलेला फोन हवा असेल तर फ्लिपकार्टने तुमच्यासाठी एक उत्तम ऑफर दिली आहे. या मोठ्या डीलमध्ये तुम्ही १०८ मेगापिक्सल मेन कॅमेरा असलेला 5G फोन इनफिनिक्स नोट ३० 5G एमआरपीपेक्षा अत्यंत कमी किंमतीत खरेदी करू शकता.

कंपनी या फोनवर 25 टक्के सूट देत आहे. डिस्काउंटनंतर फोनची किंमत 17,999 रुपयांवरून 13,499 रुपयांवर आली आहे. बँक ऑफरमध्ये तुम्ही या फोनची किंमत 1 हजार रुपयांपर्यंत कमी करू शकता. एक्सचेंज ऑफरमध्ये फोन घेतल्यास तुम्हाला 12,900 रुपयांपर्यंत फायदा मिळू शकतो. चला तर मग जाणून घेऊया या फोनमध्ये कंपनी काय ऑफर देत आहे.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
कंपनी या फोनमध्ये ६.७८ इंचाचा फुल एचडी+ एलसीडी पॅनेल देत आहे. हा डिस्प्ले १२० हर्ट्झचा रिफ्रेश रेट आणि २४० हर्ट्झचा टच सॅम्पलिंग रेटसह येतो. याची पीक ब्राइटनेस लेव्हल ५८० निट्स आहे. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी कंपनी यात एनईजी ग्लासदेखील देत आहे. हा फोन ८ जीबी पर्यंत एलपीडीडीआर ४एक्स रॅम आणि २५६ जीबीपर्यंत यूएफएस २.२ स्टोरेजसह येतो. मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने तुम्ही या फोनची मेमरी 2 टीबीपर्यंत वाढवू शकता.

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे देण्यात आले आहेत. यामध्ये 2 मेगापिक्सलडेप्थ सेन्सरसह 108 मेगापिक्सलचा मेन लेन्स आणि एआय लेन्सचा समावेश आहे. तर सेल्फीसाठी कंपनी या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देत आहे. साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज असलेल्या या फोनमध्ये ५००० एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी ४५ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

ड्युअल नॅनो सिम सपोर्ट असलेल्या या फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय, ब्लूटूथ ५.१, जीपीएस, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि ३.५ एमएम हेडफोन जॅक सारखे पर्याय मिळतील. आयपी 53 डस्ट आणि स्प्लॅश रेझिस्टंट रेटिंग असलेला हा फोन अँड्रॉइड 13 वर आधारित एक्सओएस 13 वर काम करतो. हा फोन सनसेट गोल्ड, मॅजिक ब्लॅक आणि इंटरस्टेलर ब्लू या तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे.

News Title : Infinix Note 30 5G smartphone offer on Flipkart sale 04 October 2023.

हॅशटॅग्स

#Infinix Note 30 5G(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x