4 May 2024 7:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

विधानसभा निवडणुकीच्या आधीच राजस्थान भाजपमध्ये भूकंप होणार? वसुंधरा राजेंना राजस्थान निवडणूक समित्यांमधून वगळलं

Rajasthan BJP Vasundhara Raje

Rajasthan BJP | राजस्थान विधानसभा निवडणुकीला अवघे तीन महिने शिल्लक राहिले असले तरी भाजप अजूनही स्वत:चा पेच घट्ट करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे आणि दुसऱ्याबाजूला मोठ्या राजकीय चुका देखील करताना दिसत आहे.

दोन समित्यांपैकी एकाही समितीत वसुंधरा राजे यांना स्थान नाही

कारण एकाबाजूला वसुंधरा राजे यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बनवण्याबाबत पक्ष द्विधा मनस्थितीत आहे. यावर भाजपने स्पष्टपणे काहीही सांगितले नसले तरी राजस्थानच्या मातीवर वसुंधरा पूर्वीसारखी ताकदवान राहिलेल्या नाहीत अशी पेरणी गुजरात लॉबीच्या समर्थकांनी केली होती. परिणामी राजस्थानसाठी जाहीर करण्यात आलेल्या दोन समित्यांपैकी एकाही समितीत वसुंधरा राजे यांना स्थान देण्यात आलेले नाही. पक्षाने केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांची निवडणूक जाहीरनामा समितीच्या प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. तर माजी खासदार नारायणलाल पंचारिया यांची निवडणूक व्यवस्थापन समितीचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजपचे प्रभारी अरुण सिंह आणि प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी यांनी माध्यमांशी बोलताना समित्यांची घोषणा केली. या दोन्ही समित्यांच्या घोषणेची भाजपमध्ये बराच काळ प्रतीक्षा होती. काँग्रेसने निवडणुकीशी संबंधित समित्या यापूर्वीच जाहीर केल्या आहेत. परंतु उशिरा जाहीर झालेल्या भाजपच्या वरिष्ठ समित्यांमध्ये वसुंधरा राजे यांना वगळण्यात आल्याने आता राजकीय भूकंपाची चर्चा सुरु झाली आहे.

नुकतेच जेपी नड्डा यांनी आपल्या नव्या टीमची घोषणा केली. त्यातही वसुंधरा राजे यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष करण्यात आले. त्यामुळं कदाचित त्यांना राजस्थानमधून हटवून भाजप त्यांना दिल्लीच्या राजकारणात ठेवू इच्छित असेल, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र आता समित्यांच्या घोषणेमुळे या चर्चेला अधिक वेग येत आहे की गुजरात लॉबी त्यांना राज्याच्या राजकारणातून बाहेर करू इच्छित आहेत.

भाजपने काय प्रतिक्रिया दिली?

वसुंधरा राजे या आदरणीय नेत्या आहेत, असं राजस्थानच्या निवडणुकीची जबाबदारी असलेले केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचं म्हणणं आहे. त्यांना निवडणूक प्रचार समितीत स्थान देण्यात येणार आहे. लवकरच या समितीची घोषणा करण्यात येणार आहे. अशा प्रकारे त्यांनी अटकळांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र संघटनेत कायम ठेवून दोन समित्यांमधून वगळल्यानंतर ही चर्चा थांबलेली नाही. भाजपने आतापर्यंत दोन समित्यांच्या माध्यमातून सामाजिक समीकरण तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपचे दलित चेहरा अर्जुन राम मेघवाल यांना संकल्पपत्र समिती अर्थात जाहीरनामा समितीचे प्रमुख करण्यात आले आहे.

News Title : Rajasthan BJP Vasundhara Raje not included in two committees 17 August 2023.

हॅशटॅग्स

#Rajasthan BJP Vasundhara Raje(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x