26 April 2024 2:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today Pune | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Hot Stocks | असा शेअर निवडा, कुबेर पावेल! अवघ्या 6 दिवसात दिला 80 टक्के परतावा, खरेदी करणार का? Suzlon Share Price | 1 वर्षात 413% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, तज्ज्ञांनी काय म्हटले? Penny Stocks | 3 रुपये ते 9 रुपये किंमतीच्या स्वस्त 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मालामाल होऊन जाणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर्स चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर RVNL Share Price | अल्पावधीत 1985 टक्के परतावा देणारा RVNL शेअर रॉकेट तेजीत धावणार, फायद्याची अपडेट आली Bonus Shares | खरेदी करा हा शेअर! फ्री बोनस शेअर्स सुद्धा मिळतील, शेअरने 6 महिन्यांत 210% परतावा दिला
x

राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भेट घेणार

NCP MP Amol Kolhe, Farmer Protest, leader Rakesh Tikait

नवी दिल्ली, १० फेब्रुवारी: अमोल कोल्हे यांनी सोमवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना मोदी सरकारला चांगलेच धारेवर धरले. त्यांनी शेतकरी आंदोनावरुन सरकारला खडेबोल सुनावले. तसेच राष्ट्रपतींच्याच भाषणातील मुद्दे घेत त्यावर भाष्य करत मोदी सरकारची चांगलीच कोंडी केली. यावेळी त्यांनी शेतकरी प्रश्नावर सन्मानजनक तोडगा काढण्यासाठी सरकारने पुढे यावं, असं आपल्या भाषणातून सांगितलं. देशभर काल अमोल कोल्हेंच्या भाषणाची चर्चा होती.

या रोखठोक भाषणानंतर खासदार अमोल कोल्हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी गेले. या भेटीवेळी देशाचे माजी गृहमंत्री तसंच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. या भेटीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याची प्रतिक्रिया बैठकीनंतर अमोल कोल्हे यांनी दिली.

दरम्यान, अमोल कोल्हे यांनी पंतप्रधान मोदींच्या भाषणाचा समाचार घेताना शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला. दिल्लीत सुरु असलेल्या शेतकऱ्यांची खासदार डॉ. कोल्हे भेट घेऊन त्यांच्या व्यथा समजावून घेणार आहेत.

अत्यंत दुर्दैवी आहे की देशातील शेतकऱ्यांना या पद्धतीने आपल्या हक्कांसाठी आंदोलन करावे लागत आहे. तसंच त्या आंदोलनाची देशाच्या प्रमुखाकडूनच दुर्दैवी चेष्टा केली जाते. हे आंदोलन बदनाम करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातोय. त्यांना खालिस्तानी देशद्रोही म्हटले जातंय, पण सरकारने हे लक्षात ठेवावं की सत्ता येते जाते पण बळीराजा काय तुम्हाला आम्हाला पोसण्यासाठी काबाड कष्ट करत असतो. आपण दोन घास खावेत म्हणून तो राबत असतो. शेतकऱ्यांचे प्रश्न समजावून घ्या. एक पाऊल पुढे टाका”, असं आवाहन डॉ. कोल्हे यांनी केलं.

गुरुवारी आम्ही शेतकऱ्यांना भेटायला जाणार आहोत, असं सांगत आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत हे सांगायला त्यांना भेटायला जाणार आहे. त्यामध्ये राजकीय हेतू कोणता नाही, असं देखील खासदार अमोल कोल्हे यांनी सांगितलं.

 

News English Summary: On Thursday we are going to meet the farmers, telling them that we are behind them. MP Amol Kolhe also said that there is no political motive in it.

News English Title: NCP MP Amol Kolhe will meet Farmer leader Rakesh Tikait at Delhi news updates.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x