14 December 2024 10:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

पद्मविभूषण पंडित जसराज यांचं निधन

Padma Vibhushan Pandit Jasraj, Passes Away, New Jersey

नवी दिल्ली, १७ ऑगस्ट : पंडित जसराज यांचं निधन झाले आहे. ते 90 वर्षांचे होते. अमेरिकेत त्यांनी शेवटचा श्वास घेतल्याची माहिती आहे. पं. जसराज यांना भारतीय शास्त्रीय संगीतातील संगीत मार्तंड म्हटले जाते. ते मेवाती घराण्याचे गायक होते. पंडित जसराज यांचा जन्म 28 जानेवारी 1930 साली झाला. वयाच्या चौथ्या वर्षांपासूनच त्यांनी वडील पंडित मोतीराम यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे धडे गिरवायला सुरुवात केली. शास्त्रीय संगीतातील मेवाती घराण्याचे तपस्वी गायक अशी पंडित जसराज यांची ओळख होती.

भारत सरकारने २००० मध्ये संगीत क्षेत्रातल्या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौवरले होते. पंडित जसराज हे मूळचे तबलजी होते. गायकाच्या तुलनेत इतर साथीदारांना दुय्यम समजले जाते हे समजल्याने त्यांनी तबला वादन सोडून गायक बनायचे ठरवले. त्यांचे मोठे बंधू मणिरामजी यांनी त्यांना गाणे शिकवले. भारतीय संगीतातला एक स्वर्गीय सूर हरपला अशीच भावना संगीत रसिकांच्या मनात आहे. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात.

 

News English Summary: Indian classical vocalist Pandit Jasraj passed away at the age of 90 on Monday. The music legend breathed his last in New Jersey state of US, announced his daughter Durga Jasraj. He had turned 90 in January this year. The cause of death is not known yet.

News English Title: Padma Vibhushan Pandit Jasraj Passes Away In New Jersey News Latest Updates.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x