महत्वाच्या बातम्या
-
Fake News | सीरम, भारत बायोटेकच्या लसींना इमर्जन्सी वापराची परवानगी नाकारल्याचं वृत्त चुकीचं
कोरोना प्रतिबंधक लसीचा आपातकालीन वापर करण्याची परवानगी मिळावी, यासाठी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि हैदराबादच्या भारत बायोटेकने प्रस्ताव पाठवले होते. पण हे प्रस्ताव मंजूर होऊ शकले नाहीत. लसीची सुरक्षितता आणि प्रभावीपणाबद्दल पुरेशी माहिती दिलेली नसल्यामुळे हे प्रस्ताव मंजूर झाले नाहीत, असे बुधवारी एनडीटीव्हीने सांगितले.
4 वर्षांपूर्वी -
थंडीच्या दिवसांत शेतकरी रस्त्यावर आहेत | हा प्रश्न मार्गी लावणं हे सरकारचं कर्तव्य
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह विरोधी पक्षातील पाच नेत्यांनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कृषी कायदा रद्द करण्याची मागणी राष्ट्रपतींकडे केली. केंद्र सरकारने शेतकऱ्यांचं म्हणणं समजून घेतलं पाहिजे, असंही विरोधकांनी राष्ट्रपतींना सांगितलं.
4 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांचा मोदी सरकारवरचा विश्वास उडाला | राहुल गांधीची केंद्रावर जोरदार टीका
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह विरोधी पक्षातील पाच नेत्यांनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कृषी कायदा रद्द करण्याची मागणी राष्ट्रपतींकडे केली. केंद्र सरकारने शेतकऱ्यांचं म्हणणं समजून घेतलं पाहिजे, असंही विरोधकांनी राष्ट्रपतींना सांगितलं.
4 वर्षांपूर्वी -
PM-WANI Wi-Fi योजनेला मंजुरी | देशात 1 कोटी डेटा सेंटर उघडणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज कॅबिनेटची बैठक पार पडली. यावेळी ‘PM-WANI Wi-Fi’ योजनेला मंजुरी देण्यात आली असून त्यातंर्गत देशात एक कोटी डेटा सेंटर सुरू करण्यात येणार आहे. या योजनेला ‘प्रधानमंत्री वाणी वाय-फाय अॅक्सेस इंटरफेस’ असं नाव देण्यात आलं आहे. या योजनेमुळे देशात प्रत्येक ठिकाणी फ्रि वाय-फाय मिळणार असून देशात वायफाय क्रांतीच होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
4 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांनी केंद्र सरकारचा प्रस्ताव फेटाळला | कायदेच रद्द करा | शेतकरी ठाम
मागील काही दिवस शेतकरी मोदी सरकारच्या कृषी कायद्याविरोधात जोरदार आंदलोन करत आहेत. दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Sha and Farmers Leaders meeting on Farm Bills) यांच्यात सुरू असलेली बैठक समाप्त झाली आणि आधीच्या बैठकांप्रमाणेच ही बैठक देखील कोणत्याही तोडग्याविना संपल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला होता. मात्र केंद्र सरकार या कायद्यात सुधारणांबाबत शेतकऱ्यांना आज (९ डिसेंबर) लेखी प्रस्ताव देणार होतं.
4 वर्षांपूर्वी -
केंद्राकडून आंदोलनकर्त्यांना एक प्रस्ताव मिळाला | हे आहेत प्रस्तावातील महत्त्वाचे मुद्दे
मागील काही दिवस शेतकरी मोदी सरकारच्या कृषी कायद्याविरोधात जोरदार आंदलोन करत आहेत. दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Sha and Farmers Leaders meeting on Farm Bills) यांच्यात सुरू असलेली बैठक समाप्त झाली आणि आधीच्या बैठकांप्रमाणेच ही बैठक देखील कोणत्याही तोडग्याविना संपल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला होता. मात्र केंद्र सरकार या कायद्यात सुधारणांबाबत शेतकऱ्यांना आज (९ डिसेंबर) लेखी प्रस्ताव देणार होतं.
4 वर्षांपूर्वी -
पेट्रोल पंपांचं नाव 'नरेंद्र मोदी वसुली केंद्र' करा | इंधन दरवाढीवरून काँग्रेसचा हल्लाबोल
पेट्रोल आणि डिझेल दरवाढीने लवकरच महागाईचा आगडोंब उसळण्याची (Rising petrol and diesel prices are likely to push up inflation) शक्यता आहे. सलग सहाव्या दिवशी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलमध्ये वाढ केली होती. पेट्रोल २० पैशांनी तर डिझेल २६ पैशांनी महागले आहे. डिझेल दरवाढीने मालवाहतूकदारांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
मला कुठल्याही चौकात बोलवा म्हणता | शेटजी, शेतकऱ्यांच्या सिंघु बॉर्डर चौकात जा की
केंद्राचे प्रतिनिधी शेतकऱ्यांना भेटत असले तरी पंतप्रधानांनी एकदाही आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतलेली नाही. दरम्यान, नोटबंदीच्या वेळी मला फक्त पन्नास दिवस द्या आणि त्यानंतर मी तुमच्यासमोर कोणत्याही चौकात यायला तयार आहे आणि तुम्ही द्याल ती शिक्षा मला मान्य असेल असं मोदींनी म्हटलं होतं. त्याचाच धागा पकडून काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी मोदींना जोरदार टोला लगावला आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती | सतराशे-साठ अँप | भारतीयांच्या लसीकरणाचा डेटा घेण्यासाठी सुद्धा अँप
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) कोरोना लशीच्या डिलीव्हरीचा रिअल टाईम मॉनिटरिंगसाठी एक मोबाईल अॅप्लिकेशन (Mobile Application For Corona Vaccine) तयार केलं आहे. त्याशिवाय एक डिजीटल प्लॅटफॉर्मही विकसित करण्यात आलं आहे. यामाध्यमातून डेटा रेकॉर्ड (Data Record) ठेवला जाऊ शकतो. तसेच, लोक स्वत: कोरोना लशीसाठी नोंदणी करु शकतील (Mobile Application For Corona Vaccine).
4 वर्षांपूर्वी -
UPSC IFS Main Exam 2020 | परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
देशातील सर्वोच्च प्रशासकीय पदावर बसणं अनेक तरुणाचं मोठं स्वप्न असतं आणि त्यात यूपीएससी अंतर्गत येणाऱ्या परीक्षांचं स्थान हे नेहमीच सर्वोच्च राहिलं आहे. त्यातीलच एक महत्वाची परीक्षा म्हणजे Indian Forest Service अर्थात भारतीय वन सेवा परीक्षा म्हणाव्या लागतील. त्याच परीक्षांचं वेळापत्रक आज अखेर जाहीर झालं आहे.
4 वर्षांपूर्वी -
कृषी कायदे मागे घेण्यास केंद्राचा नकार | शेतकरी तिन्ही कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम
मागील काही दिवस शेतकरी मोदी सरकारच्या कृषी कायद्याविरोधात जोरदार आंदलोन करत आहेत. दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यात सुरू असलेली बैठक समाप्त झाली असून, आधीच्या बैठकांप्रमाणेच ही बैठक देखील कोणत्याही तोडग्याविना संपल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. मात्र केंद्र सरकार या कायद्यात सुधारणांबाबत शेतकऱ्यांना आज (९ डिसेंबर) लेखी प्रस्ताव देणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई पोलिसांकडून रिपब्लिक TV'च्या कर्मचाऱ्यांचा छळ | अर्णब पुन्हा हायकोर्टात
रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक आणि सर्वेसेवा अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. कारण काल त्यांना थेट सुप्रीम कोर्टातून धक्का मिळाला आहे. केवळ अर्णब गोस्वामीच नव्हे तर त्यांच्या कर्मचाऱ्यांचे देखील धाबे दणाणले असतील अशी शक्यता निर्माण झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | भारतीय पशुपालन निगम'मध्ये 3777 पदांची भरती
भारतीय पशुुपलन निगम लिमिटेड भरती २०२०. बीपीएनएल भरती २०२०. भारतीय पशुपति निगम लिमिटेडने अधिकृत भरती अधिसूचना प्रकाशित केली आहे आणि 3777 प्रशिक्षण समन्वयक, प्रशिक्षण नियंत्रण अधिकारी, प्रशिक्षण प्रभारी आणि प्रशिक्षण एड्स पदांसाठी अर्ज मागविले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार बीपीएनएल भरती २०२० साठी २१ डिसेंबर २०२० पर्यंत किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि बीपीएनएल भरती २०२० साठी अर्ज कसा करावा यासारख्या अधिक माहिती पुढील लेखात वाचा.
4 वर्षांपूर्वी -
शेतकरी आंदोलन | शरद पवार, राहुल गांधींसहीत ५ दिग्गज नेते उद्या राष्ट्रपतींना भेटणार
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्र सरकारवरचा दबाव वाढतो आहे. हा दबाव वाढविण्यासाठी विरोधी पक्षांचं एक शिष्टमंडळ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहे. या शिष्टमंडळामध्ये राष्ट्रवादीचे शरद पवार(NCP President Sharad Pawar), काँग्रेसकडून राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi), CPI (M)चे सीताराम येचुरी, CPIचे डी राजा आणि DMKचे टीकेएस एलनगोवन यांचा समावेश आहे. कोविड प्रोटोकॉलमुळे फक्त 5 नेत्यांनाच भेटीची परवानगी मिळाली आहे. शरद पवार यांनीही आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत याविषयीची माहिती दिली. या प्रश्नावर सर्व पक्ष मिळून भूमिका ठरविणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. संध्याकाळी 5 वाजता ही भेट होणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | महा मेट्रो पुणे मध्ये 139 पदांची भरती
एमएमआरसीएल पुणे भरती २०२१. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड पुणेतर्फे अधिसूचना जारी केली असून १३९ तंत्रज्ञ व अभियंता पदांसाठी अर्ज मागविले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार एमएमआरसीएल पुणे भरती २०२० साठी २१ जानेवारी रोजी किंवा तत्पूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि एमएमआरसीएल पुणे भरती २०२० साठी अर्ज कसा द्यावा यासंबंधी अधिक माहिती खालील लेखात दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांच्या हक्कांबद्दलचं मोदींच ते जुनं ट्विट | आ. रोहित पवारांकडून आठवण
युपीए सरकारच्या काळात केंद्रीय कृषीमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळत असताना शरद पवार यांनी कृषी कायद्यात मोठ्या बदलाची गरज व्यक्त करत अनेक राज्यांना पत्र लिहिलं होतं. त्यांनी लिहिलेलं हे पत्र वायरल होत आहे. त्यावर आता स्वत: शरद पवार यांनी भाष्य केले आहे. शरद पवार केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत पोहोचले होते. पुरंदर विमानतळाच्या जमीन अधीग्रहणासंदर्भात यावेळी चर्चा झाली. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी पत्राबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “ज्यांनी पत्राचा हवाला दिला आहे त्यांनी ते थोडं नीट वाचलं असतं तर त्यांचा वेळ वाचला असता. कायद्यातील सुधारणांसंदर्भात पत्र लिहिलं होतं यामध्ये कोणतंही दुमत नाही. पण आज जे तीन नवे कृषी विधेयक आणले आहेत त्यात याचा उल्लेख दिसत नाही”.
4 वर्षांपूर्वी -
आंदोलक शेतकऱ्यांची चिकाटी | अखेर अमित शहांनी बोलावली शेतकरी नेत्यांची तातडीची बैठक
‘भारत बंद’ बरोबर व्यापक झालेल्या शेतकरी आंदोलनाच्या (All India Bharat Bandh called by protestant farmers) पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Minister Amit Shah) यांनी आज सध्याकाळी ७ वाजता शेतकरी नेत्यांची बैठक बोलावली आहे. ९ डिसेंबरला बुधवारी सरकार शेतकरी नेत्यांशी चर्चा करणार असताना देखील अमित शहा यांनी ही तातडीची बैठक अचानक बोलावली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिकाटीपुढे सरकार झुकवणार की शेतकऱ्यांची आश्वासनांवर बोळवण होणार ते पाहावं लागणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
दुःखद बातमी | टिकरी सीमेवर अजून एका आंदोलक शेतकऱ्याचा मृत्यू
केंद्र सरकारने लागू केलेल्या ३ कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी आज (८डिसेंबर)भारत बंदची हाक दिली आहे. देशभरातील शेतकऱ्यांसह अनेक संघटना, विरोधी पक्षांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून महाराष्ट्रातही कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बहुतांश कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद राहणार आहेत. माथाडी कामगारही या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. संवेदनशील मार्गावर एसटी सेवा बंद ठेवण्यात आली आहे. सकाळपासूनच भारत बंदच्या या शेतकऱ्यांच्या हाकेला लोकांनी सहकार्य केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
नवा कृषी कायदा | शरद पवार उद्या दिल्ली विरोध पक्षांची बैठक घेणार
दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलनाचा आजचा १३ वा दिवस आहे. केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांकडून भारत बंदची हाक देण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्या (९ डिसेंबर) सर्व विरोधी पक्षांची दिल्लीत बैठक बोलावली आहे. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे. यात भारतीय कम्यूनिस्ट पक्ष, काँग्रेस यांसह अनेक विरोधी पक्षाचे नेते सहभागी होण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
India Mobile Congress 2020 | मुकेश अंबानी यांची 5G सेवांबाबत मोठी घोषणा
संपूर्णपणे भारतीय तंत्रज्ञान असलेलं 5G नेटवर्क पुढील वर्षात भारतात लाँच करणार असल्याची माहिती रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी यापूर्वीच दिली होती. ४३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना अंबानी यांनी यावर भाष्य केलं होते. त्यावेळी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर रिलायन्सनं जिओ मीट द्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेचं आयोजन केलं होतं.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Tata Motors Share Price | संधी सोडू नका, झटपट 21 टक्के परतावा मिळेल, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, आज 6.26% वाढला, फायदा घ्या - NSE: ADANIPOWER
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरेदी करून ठेवा हा मल्टिबॅगर शेअर, भविष्यातील आर्थिक चिंता मिटेल - NSE: VEDL
-
Suzlon Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, स्वस्तात खरेदी करून ठेवा, पैसा वाढवा - NSE: SUZLON
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये आज 2.51% तेजी; जोरदार खरेदी, नेमकं कारण काय? - NSE: TATATECH
-
Adani Port Share Price | 34 टक्के कमाई करा, आज 6.27% वाढला, अदानी पोर्ट शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPORTS
-
Jio Finance Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मजबूत कमाई करा, मार्केट तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: JIOFIN
-
AWL Share Price | जबरदस्त अपसाईड तेजीचे संकेत; अदानी विल्मर शेअरला BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: AWL
-
Rattan Power Share Price | 10 रुपयांच्या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले; अपसाईड टार्गेट - NSE: RTNPOWER