15 December 2024 8:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

देशभरात गेल्या २४ तासांत ५३ हजार ६०१ कोरोनाबाधित | ८७१ रुग्णांचा मृत्यू

India, Covid19, Corona Virus

नवी दिल्ली, 11 ऑगस्ट : देशात ९ दिवसांनंतर आज कोरोनाचे नवीन कमी रुग्ण सापडले आहेत. गेल्या ४ ते ५ दिवसांमध्ये ६० हजाराहून अधिक कोरोनाचे रुग्ण प्रत्येक दिवसाला सापडत होते. तर २४ तासात साधारण १००० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. हे प्रमाण आज कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार २४ तासांत ५३ हजार ६०१ नवीन लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे देशात आतापर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा २२ लाख ६८ हजार ६७५ वर पोहोचला आहे. याशिवाय कोरोनामुळे ८७१ रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत हा आकडा ४५ हजार २५७ वर पोहोचला आहे. देशात सध्या ६ लाख ३९ हजार ९२९ कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

देशातील २२ लाख ६८ हजार ६७६ करोनाबाधितांच्या संख्येत ६ लाख ३९ हजार ९२९ अॅक्टिव्ह रुग्ण, करोनामुक्त झालेले/डिस्चार्ज मिळालेले/स्थलांतरित १५ लाख ८३ हजार ४९० जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या ४५ हजार २५७ जणांचा समावेश आहे. आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

 

News English Summary: Today, after 9 days in the country, new cases of corona have been found. In the last 4 to 5 days, more than 60,000 corona patients were found every day. In 24 hours, about 1,000 patients died from the corona. This number is declining today.

News English Title: Single Day Spike Of 53601 Cases And 871 Deaths Reported In India In The Last 24 Hours News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x