13 December 2024 10:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL
x

राजकारण बाजूला ठेवून राष्ट्रहिताचा विचार करा, अमित शहा काँग्रेसवर बरसले

Corona Crisis, Covid 19, Home Minister Amit Shah

नवी दिल्ली, २ एप्रिल: कोरोना विषाणूचे वेगाने होणारे संक्रमण रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या लॉकडाऊनच्या निर्णयावर काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काँग्रेस अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर पलटवार केलाय. सध्याच्या घडीला राजकारण बाजूला ठेऊन राष्ट्रहिताचा विचार करणे गरजेचे आहे. देशातील जनतेमध्ये कोणताही संभ्रम पसरवण्याचे प्रयत्न करु नका, अशा शब्दांत अमित शहा यांनी काँग्रेसला सुनावले. अमित शहा यांनी ट्विट्च्या माध्यमातून सोनिया गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

यासंदर्भात गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करत म्हटले आहे, की ‘पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या नेतृत्वात कोरोना व्हायरसविरोधातील लढ्याचे देश आणि जागतीक पातळीवर कौतुक होत आहे. १३० कोटी भारतीय कोरोनावर मात करण्यासाठी एकत्र आले आहेत. असे असतानाही, काँग्रेस क्षुद्र राजकारण करत आहे. त्यांनी देश हिताचा विचार करावा आणि लोकांमध्ये भ्रम निर्माण करणे सोडावे.’

कोरोनाचे संकट रोखण्यासाठी देशभरात डॉकडाऊन गरजेचे होते, मात्र त्याची अंमलबजावणीची पद्धत चुकीच्या पद्धतीने झाली आहे. यामुळे देशातील लाखो स्थलांतरीत मजुरांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे, अशा शब्दांत सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. सोनिया गांधी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे काँग्रेस पक्षाच्या वर्किंग कमिटीची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केले होतं आणि त्यानंतर अमित शहांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

News English Summary: Congress has raised questions over the lock down decision by Prime Minister Narendra Modi to prevent the rapid transmission of the Corona virus. Union Home Minister Amit Shah has now rebuffed the Congress following a statement made by Congress interim president Sonia Gandhi. At the present time, it is necessary to consider politics of nationalism by keeping aside politics. Do not try to spread any confusion among the people of the country, Amit Shah told the Congress. Amit Shah, who is also a response to the remarks by Sonia Gandhi through his tweets.

 

News English Title: Story Union Home Minister Amit Shah attack congress over Sonia Gandhi statement regarding corona lock down says stops dirty politic Corona Crisis News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x