12 December 2024 9:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

कोरोना व्हायरस प्लॅस्टिक, स्टीलवर २ ते ३ दिवस सक्रिय राहतात, नवे संशोधन

News Latest Updates, Corona Virus Crisis

वॉशिंग्टन, १८ मार्च : चीनमधून आलेल्या प्राणघातक कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. या विषाणूने आतापर्यंत ७ हजार १५८ लोकांचा जीव घेतला आहे. तर १.८० लाखाहून अधिक लोकांना या विषाणूची लागण झाली आहे. परिस्थितीची तीव्रता पाहता डब्ल्यूएचओने कोरोनाला महामारी (साथीचा रोग) जाहीर केला आहे. अमेरिकेतही कोरोना विषाणूमुळे ६० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी सज्ज असलेल्यांसाठी आनंदाची बातमी आली होती. तो म्हणजे कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीची मानवावर चाचणी घेण्यास अमेरिकेतील सिएटलमध्ये सुरुवात झाली आहे. अमेरिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी याबद्दल माहिती दिली हे. अर्थात ही लस सर्वसामान्यांसाठी बाजारात यायला आणखी दीड वर्षांचा कालावधी लागू शकतो. वेगवेगळ्या चाचण्यामध्ये यशस्वी ठरल्यानंतर आणि आवश्यक मान्यता मिळाल्यानंतरच ही लस बाजारात उपलब्ध होईलअसं स्पष्ट करण्यात आलं आहे.

या लसीचे नाव mRNA-1273 असे असून अमेरिकेतील राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या शास्त्रज्ञांनी ती विकसित केली आहे. जैवतंत्रज्ञानातील अमेरिकी कंपनी मॉडर्ना यांचेही सहकार्य ही लस तयार करण्यासाठी घेण्यात येत आहे. मात्र त्याचवेळी दुसऱ्या बाजूला संशोधनातून दुसरं सत्य देखील समोर आलं आहे आणि त्यामुळे जगाची चिंता वाढू शकते.

कोरोना विषाणू कोणत्याही पृष्ठभागावर किंवा हवेत खूप वेळ सक्रिय राहतो, असे अमेरिकेतील एका संशोधनात आढळून आले आहे. सार्सप्रमाणेच हा विषाणू जास्त काळ मानवी शरीराबाहेर सक्रिय राहतो, असे संशोधन करणाऱ्या अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीनमध्ये या संशोधनाचे निष्कर्ष प्रकाशित झाले आहेत. कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल एँड प्रिव्हेन्शन संस्थेतील शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले आहे. या संशोधनानुसार कोरोना विषाणू हे प्लॅस्टिक आणि स्टीलवर दोन ते तीन दिवस सक्रीय राहू शकतात. त्याचवेळी पुठ्ठ्यावर ते २४ तास सक्रिय राहू शकतात. हवेमध्येही हे विषाणू तीन तास सक्रिय राहू शकतात, असे निष्कर्ष या शास्त्रज्ञांनी काढले आहेत.

मात्र दुसऱ्या बाजूला काही शास्त्रज्ञांनी या निष्कर्षांवर टीका देखील केली आहे. हे निष्कर्ष खूप वाढवून सांगण्यात आले आहेत. इतक्या मोठ्या कालावधीसाठी कोरोना विषाणू कार्यरत राहात नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. खोकला किंवा शिंका यातूनच कोरोना विषाणू हवेत मिसळतात. त्यानंतर ते खूप कमी वेळ हवेत सक्रिय राहू शकतात, असे या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. मागील आठवड्यात मेडिकल प्री-प्रिंट वेबसाईटवर या संशोधनाचे निष्कर्ष सर्वात आधी प्रकाशित झाले होते.

 

News English Summery:  There is important information for everyone battling the corona virus. Corona virus is active on any surface or in the air for a long time, a US study has found. Like the SARS, the virus remains active outside of the human body for a long time, scientists say. The findings of this research have been published in the New England Journal of Medicine. The research was done by scientists at the University of California’s Center for Disease Control and Prevention. According to this research, corona virus can remain active on plastics and steel for two to three days. At the same time, they can remain active for 24 hours on the cardboard. Scientists have concluded that the virus can remain active for up to three hours, even in the air.

 

News English Title:  Story novel Corona virus can survive on surfaces or in Air for several hours study News Latest Updates.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x