12 December 2024 8:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

बळींचा संभाव्य आकडा घटल्याने मतदारांनी मला पुन्हा मत देण्यास हरकत नाही

US President Trump, Upcoming US Elections, Corona Crisis

वॉशिंग्टन, २९ एप्रिल : करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीची तारीख बदलण्यास अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नकार दिला आहे. ३ नोव्हेंबर रोजी तेथे अध्यक्षीय निवडणूक होत आहे. व्हाइट हाऊस येथे पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, निवडणुकांच्या तारखा बदलण्याचा विचार आपण करूच शकत नाही, तसे करण्याचे काही कारणही नाही.

त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार असलेले डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बिडेन यांनी गेल्या आठवडय़ात असे म्हटले होते की, ट्रम्प हे अमेरिकी निवडणुकीच्या तारखा बदलण्याच्या विचारात आहेत. ट्रम्प हे निवडणुकांच्या तारखा बदलणार आहेत, त्याची कारणे ते काहीही सांगतील, पण निवडणुका कशासाठी लांबणीवर टाकायच्या हे समजत नाही.

दरम्यान, जगभरात कोरोनानं थैमान घातलं असून याचा सर्वात मोठा उटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत कोरोनामुळे जवळपास ६० हजार जणांचा मृत्यू झाला आहे. यातील सर्वाधिक मृत्यू न्यूयॉर्कमध्ये झाले आहेत. तसेच करोना विषाणूमुळे अमेरिकेतील बळींचा आकडा ७० हजारांपर्यंत जाऊ शकतो, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. मात्र, मूळातील बळींचा संभाव्य आकडा हा अधिक असून तो कमी झाल्यामुळे मतदारांनी आता मला नोव्हेंबरमध्ये पुन्हा मत देण्यास काही हरकत नाही, असे ते म्हणाले.

व्हिएतनाम युद्धामध्ये जितक्या अमेरिकी नागरिकांचा मृत्यू झाला, त्यापेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू सहा आठवड्यात झाल्यामुळे अध्यक्षांना नागरिकांनी पुन्हा निवडून का द्यावे, असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला होता. त्याला उत्तर देताना त्यांनी वरील वक्तव्य केले. व्हिएतनाम युद्धात ५८ हजार अमेरिकी सैनिकांचा मृत्यू झाला होता. जॉन हॉपकिन्स विद्यापीठातील आकडेवारीनुसार अमेरिकेमध्ये करोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या ५५ हजारांपुढे गेली आहे. साथीच्या आजारामुळे २२ लाखांचा मृत्यू होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्या तुलनेत ६० ते ७० हजार आकडा हा कमी असल्याचे ट्रम्प म्हणाले.

 

News English Summary: Corona has killed nearly 60,000 people in the United States. Most of these deaths occurred in New York. Also, the death toll from the corona virus in the United States could rise to 70,000, according to US President Donald Trump. “However, the potential number of victims at the original level is high and voters have no problem voting for me again in November,” he said.

News English Title: Story US President Trump says American voters should vote me again during corona crisis US Nations News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x