महत्वाच्या बातम्या
-
गेंड्याचं कातडं पांघरलेल्या महाविकास आघाडी सरकारला जाग यायला तयार नाही
रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राऊत यांच्यावर जोरदार शब्दांत प्रहार केला आहे.करोना संकटाच्या काळात शेतकरी आणि कामगारांचे कंबरडेच मोडले. गेले काही महिने अभूतपूर्व अशा आर्थिक संकटातून जात असलेल्या या वर्गाला १०० टक्के वीजबिलमाफी देऊन खरंतर आधार देण्याची गरज होती मात्र गेंड्याचं कातडं पांघरलेल्या राज्यातील महाविकास सरकारला जाग यायला तयार नाही, असे नमूद करत विरोधात असताना वीजबिल माफ करा, असे म्हणत शेतकरी व कामगारांबाबत कळवळा दाखवत होता मग आता सत्तेत आल्यावर काय झाले?, असा सवालच खोत यांनी केला.
5 वर्षांपूर्वी -
वीज बिलात ना माफी ना सूट | शिवसैनिकांचं 'ते' चड्डी बनियन आंदोलन देखील वाया
महावितरणने अव्वाच्या सव्वा वीज बिल पाठवल्याने संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी जुलै महिन्यात महावितरणवर चड्डी बनियन मोर्चा काढला. त्यावेळी त्यांनी लॉकडाऊनमुळे आमच्या अंगावर केवळ चड्डी बनियन उरलीय, तुमचे बील कुठून भरणार? असा सवाल महावितरणच्या अधिकाऱ्यांना केला होता. राज्यात शिवसेना आघाडीची सत्ता असतानाही शिवसैनिकांनी हा सवाल केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आलं होतं.
5 वर्षांपूर्वी -
भाजपाला धक्का | संघाच्या मुशीतून घडलेल्या माजी केंद्रीय मंत्र्याचा भाजपाला रामराम
उत्तर महाराष्ट्रातील दिग्गज नेते एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपाला मोठी गळती लागल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्र तसेच राज्यात मंत्री पद भूषविणारे नेते देखील भाजपाला सोडचिट्ठी देत असल्याचा पाहायला मिळत आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाला एका माजी केंद्रीय पद भूषविणाऱ्या नेत्याने रामराम ठोकला आहे आणि त्यामुळे भाजपाची चिंता कमी होण्याची चिन्ह दिसत नाही.
5 वर्षांपूर्वी -
त्यामुळे शरद पवार यांचा उत्तर महाराष्ट्र दौरा रद्द | काय आहे कारण?
एकनाथ खडसे यांनी भाजपाला रामराम करून राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केल्यानंतर स्थानिक पातळीवर भाजपाला धक्के देण्यास सुरुवात केली होती. काही दिवसातच त्यांनी भाजपचे अनेक पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीत आणलं आणि भारतीय जनता पक्षाला खान्देशात राजकीय धक्के देण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर आता शरद पवार देखील खान्देशात राष्ट्रवादीच्या विस्तारासाठी सज्ज झाले होते.
5 वर्षांपूर्वी -
आज आठवा स्मृतीदिन | बाळासाहेबांचे 'ते' स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार करू - अजित पवार
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Hindu Hruday Samrat Balasaheb Thackeray) यांचा आज आठवा स्मृतीदिन. या संपूर्ण महाराष्ट्र आणि देशातील शिवसैनिकांच्या, हिंदूंच्या आणि अनेक राजकीय व्यक्तींच्या मनात आदराचं स्थान असणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस सर्व स्तरांतून अभिवादन करण्यात येत आहे. बाळासाहेब आज आपल्यात नसले तरीही त्यांची वादळी राजकीय कारकिर्द आणि राजकारणातील त्यांचं योगदान हे कायमच अग्रस्थानी राहील. अशा या नेत्याच्या काही स्मृतींना शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या ‘सामना’तून उजाळा देण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मिशन पक्षविस्तार | शरद पवार २०-२१ नोव्हेंबरला उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर
एकनाथ खडसे यांनी भाजपाला रामराम करून राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केल्यानंतर स्थानिक पातळीवर भाजपाला धक्के देण्यास सुरुवात केली होती. काही दिवसातच त्यांनी भाजपचे अनेक पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीत आणलं आणि भारतीय जनता पक्षाला खान्देशात राजकीय धक्के देण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर आता शरद पवार देखील खान्देशात राष्ट्रवादीच्या विस्तारासाठी सज्ज झाले होते.
5 वर्षांपूर्वी -
राज्यातील धार्मिक स्थळे पाडव्यापासून खुली होणार | राज्य सरकारचा निर्णय
राज्यातील धार्मिक स्थळांचे दरवाजे अखेर खुले होणार आहेत. पाडव्यापासून म्हणजेच सोमवार दि. १६ नोव्हेंबरपासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. हा फक्त सरकारी आदेश नसून ‘श्रीं ची इच्छा समजा! मंदिरात चपला बाहेर काढून प्रवेश करायचा असतो, पण तोंडावरील मास्क मात्र सक्तीचा आहे हे विसरू नका. मंदिरे उघडतील, इतर प्रार्थनास्थळे उघडतील. आपण शिस्त पाळली तरच देवांचे आशीर्वाद आपल्याला व महाराष्ट्राला मिळतील असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर भाजप सावध | पंकजा मुंडे आणि तावडेंना प्रभारीपद
भारतीय जनता पक्षाने 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रभारी व सह प्रभारींची यादी जाहीर केली आहे (BJP Party announced state in charges). पक्षाने जाहीर केलेल्या यादीनुसार माजी केंद्रीय मंत्री राधामोहन सिंग यांना उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पंकजा मुंडे (Former Minister Pankaja Munde) यांची मध्य प्रदेश सह प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विनोद तावडे (Former Minister Vinod Tawde) यांची हरियाणा प्रदेश भारतीय जनता पक्ष प्रभारीपदी नियुक्ती केली आहे. तसेच सुनील देवधर यांची आंध्र प्रदेश सह प्रभारीपदी नियुक्ती केली असून, विजया रहाटकर यांना दमन दीव-दादरा-नगर हवेली प्रभारीपदी नियुक्ती दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
आईच्या आठवणींनी शरद पवार गहिवरले | पत्र लिहून भावना व्यक्त
राजकारणाच्या आखाड्यात भल्याभल्यांना मात देणारे व महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या राजकारणातही आपला दबदबा राखणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाचा पाया त्यांच्या आईनेच अर्थात शारदाबाई पवार यांनी रचला होता. हार न मानता, खचून न जाता झुंजण्याचे बाळकडू पवार यांना त्यांच्या आईकडूनच मिळाले. त्याचे स्मरण करत शरद पवार यांनी एक भावनिक पत्र आपल्या दिवंगत आईला लिहिले आहे.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५’वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
5 वर्षांपूर्वी -
भाजपचे आमदार फुटू नये म्हणून काही दिवस ते सरकार पडणार असं बोलत राहतील - जयंत पाटील
भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी पक्ष सोडून महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये प्रवेश करु नये म्हणून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ‘हे सरकार पडणार’, असे सतत बोलावं लागते, असा टोला राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना आपली माणसं टिकवण्यासाठी महाविकास आघाडी सरकार पडणार, असं वारंवार बोलावं लागतं. अजून काही काळ ते असंच बोलत राहतील. त्यानंतर फडणवीस यांचं बोलणं आपोआप बंद होईल, अशी खिल्ली उडविणारी टिपणी सुद्धा जयंत पाटील यांनी केली.
5 वर्षांपूर्वी -
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात पंकजा मुंडेंचे समर्थक भिडणार | प्रवीण घुगेंची बंडखोरी
राज्यातील ५ पदवीधर मतदारसंघांसाठी १ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. आचारसंहिता देखील लागू करण्यात आली आहे. तर ३ डिसेंबर रोजी निवडणुकांचे सर्व निकाल जाहीर केले जातील. निवडणुकीसाठी ५ नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख आज (१२ नोव्हेंबर) आहे. उद्या (१३ नोव्हेंबर) आलेल्या अर्जांची छानणी होणार आहे. तसेच अर्ज मागे घेण्याची तारीख १७ नोव्हेंबर आहे.
5 वर्षांपूर्वी -
पदवीधर निवडणूकीत राष्ट्रवादीला बंडखोरीचं ग्रहण
राज्यातील ५ पदवीधर मतदारसंघांसाठी १ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. आचारसंहिता देखील लागू करण्यात आली आहे. तर ३ डिसेंबर रोजी निवडणुकांचे सर्व निकाल जाहीर केले जातील. निवडणुकीसाठी ५ नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख आज (१२ नोव्हेंबर) आहे. उद्या (१३ नोव्हेंबर) आलेल्या अर्जांची छानणी होणार आहे. तसेच अर्ज मागे घेण्याची तारीख १७ नोव्हेंबर आहे.
5 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरे खेळ तर आता सुरू झाला आहे | अर्णब गोस्वामी पुन्हा आक्रमक
वास्तुसजावटकार अन्वय नाईक यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने अर्णब गोस्वामी यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. अर्णब गोस्वामी यांच्यासहित इतर दोन आरोपींना देखील न्यायालयाने जामीन मजूर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येकी पन्नास हजारांच्या जातमुचलक्यावर तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
अशी सरकारं फार काळ टिकत नाहीत | जेव्हा कोसळेल तेव्हा पर्यायी सरकार देऊ - फडणवीस
राज्यातलं महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याचे दावे भारतीय जनता पक्षाच्या दिल्ली ते गल्लीतील नेत्यांनी केले आहेत. मात्र बिहार मधील सत्ता एनडीएने कायम राखल्यानंतर भाजपच्या नेत्यांना पुन्हा स्वप्नं पडू लागली आहेत. पाच वर्षातील एक वर्ष सरकार पडण्याची वाट पाहिल्यानंतर उरलेल्या ४ वर्षांवर पुन्हा वक्तव्य येण्यास सुरुवात झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
जगंलराज का युवराजला बिहारच्या जनतेने नाकरले | आता महाराष्ट्रात पण...
बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचं पानीपत झाल्यानंतर भाजप नेत्यांकडून शिवसेनेवर जोरदार टीका केली जात आहे. काँगसने महाराष्ट्रात “हातात” “धनुष्यबाण” धरला, त्याचा ठासून फटका बिहारमध्ये बसला. आता महाराष्ट्रात सुध्दा जनतेच्या “घड्याळाचे” काय सांगावे टायमिंग…? अशी टीका भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांनी राज्यातील महाविकास विकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांवर केली.
5 वर्षांपूर्वी -
अर्णब गोस्वामी यांनी तुरुंगात वापरला मोबाईल | दोन पोलीस निलंबित
इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांनी अंतरीम जामिनासाठी मंगळवारी सुप्रीम कोर्टात केलेल्या याचिकेवर आज म्हणजे बुधवारी सुनावणी पार पडत असून न्यायालयात जोरदार युक्तिवाद सुरु झाला आहे. जस्टीस धनंजय चंद्रचूड आणि जस्टीस. इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठात अर्णव गोस्वामी यांच्या याचिकेवर सुनावणी सध्या सुरु आहे. मुंबई हायकोर्टाने सोमवारी याप्रकरणी अंतरिम जामीन देण्यास नकार दिला होता आणि कनिष्ठ कोर्टात जाण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर अर्णव यांनी अधिवक्ता निर्निमेष दुबे यांच्याद्वारे सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.
5 वर्षांपूर्वी -
माझ्या आत्महत्येला मोदी सरकार जबाबदार म्हणत शेतकऱ्याने सुसाईड नोट लिहिली होती | पण भाजपने...
यवतमाळ मध्ये तीन लाखाच्या कर्ज आणि नापिकीला कंटाळून नैराश्य आलेल्या शेतकऱ्याने आत्महत्या केली. परंतु त्याने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट मध्ये ‘माझ्या आत्महत्येला नरेंद्र मोदी सरकार जबाबदार’ असल्याचा लिखित उल्लेख केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मेधा कुलकर्णीं यांचा राजकीय प्रवास संपुष्टात? | चंद्रकांत पाटलांवर अजून विश्वास?
विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. १ डिसेंबरला पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे तर ३ डिसेंबरला निकाल लागणार आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातून मेधा कुलकर्णी यांचा पुन्हा पत्ता कट करण्यात आला आहे. त्यांच्या जागी संग्राम देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
विधानसभेत मेधा कुलकर्णींचा पत्ता कट केला | आता सांगलीचा उमेदवार देत पुन्हा पत्ता कट
विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. १ डिसेंबरला पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे तर ३ डिसेंबरला निकाल लागणार आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातून मेधा कुलकर्णी यांचा पुन्हा पत्ता कट करण्यात आला आहे. त्यांच्या जागी संग्राम देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY
-
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
-
Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
HUDCO Share Price | पैसे गुंतवावे तर अशा शेअर्समध्ये, पोर्टफोलिओ भक्कम करा, मोठा परतावा मिळेल - NSE: HUDCO
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL