20 May 2024 2:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं
x

राज्यात दोन दिवसांत ७०० कोरोना रुग्णांना डिस्चार्ज

Corona Crisis, Covid 19, Maharashtra, Rajesh Tope

मुंबई, ६ मे : राज्यात गेल्या दोन दिवसात कोरोनाच्या सुमारे ७०० रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. सोमवारी आणि मंगळवारी अनुक्रमे ३५० आणि ३५४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सलग दोन दिवस एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होण्याची ही पहिलीच वेळ असून सुमारे सव्वा महिन्यात २८१९ रुग्णांना घरी सोडण्यात आले.

उपचारानंतर सोमवारी ३५० जणांना तर मंगळवारी ३५४ जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. सलग दोन दिवसांमध्ये इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होण्याची ही पहिलीच वेळ आहे. तसंच सव्वा महिन्यात सुमारे २ हजार ८१९ रुग्णांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.

राज्यात ९ मार्चला पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर २५ मार्चला पहिल्यांदा पुणे येथील दोन रुग्णांना घरी सोडण्यात आले होते. त्यानंतर दररोज राज्यात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. सोमवारी ४ मे रोजी पहिल्यांदाच ३५० रुग्णांना, तर लगेच दुसऱ्या दिवशी ३५४ रुग्णांना घरी सोडण्यात आले. राज्यातील ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे.

 

News English Summary: The number of corona sufferers is increasing in the country as well as in the state. However, the number of patients recovering from coronary heart disease is also increasing. Health Minister Rajesh Tope said that more than 700 patients have been discharged in the last two days.

News English Title: Story Maharashtra State Health Minister Rajesh Tope Says 700 Corona Patients Discharge After Medications Highest Numbers News latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x