27 April 2024 6:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

तुकाराम मुंढे यांची थेट पीएमओकडे तक्रार, नितीन गडकरींचा पुढाकार

Union Minister Nitin Gadkari, Tukaram Mundhe, PMO

नागपूर, ३० जून: मुंबई, पुणे शहरापाठोपाठ नागपूरमध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, कोरोना आणि पावसाळ्याच्या तोंडावर संकटाशी दोन हात करण्यासाठी पालिका आयुक्त तुकाराम मुंढे महापालिकाच्या पाच हॉस्पिटलचा कायापालट केला आहे. तुकाराम मुंढे यांनी करून दाखवलं असं म्हणत, त्यांच्या कामगिरीची सर्वत्र प्रशंसा होत असताना नागपुरात महापौरविरुद्ध आयुक्त वाद पेटल्याचं पाहायला मिळालं होतं.

नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात सदर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आलं होतं. स्मार्ट सिटीमध्ये २० कोटींचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप तुकाराम मुंढेंवर ठेवण्यात आला आहे. तुकाराम मुंढे यांनी मर्जीतल्या कंत्राटदारांना परस्पर कंत्राट दिल्याचा आरोप महापौर संदीप जोशी यांनी केला होता.

मात्र भाजप आणि तुकाराम मुंडेंमधील वादात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे. नागपूरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी थेट पीएमओकडे तक्रार केली आहे. नागपुरातील स्मार्ट सिटी घोटाळ्याप्रकरणी गडकरींनी मुंढे यांची तक्रार पीएमओकडे पत्राद्वारे केली आहे. नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे सीईओ तुकाराम मुंढे यांचे अवैध, असंवैधानिक आणि घोटाळेबाज वर्तन असल्याचे पत्र गडकरी यांनी पंतप्रधान कार्यालयाची जबाबदारी सांभाळणारे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांना लिहिले आहे.

तुकाराम मुंढे यांनी नागपूर महापालिका आयुक्त म्हणून धुरा खांद्यावर घेताच ‘नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’च्या सीईओपदाची जबाबदारी अवैधरीत्या बळकावल्याचा आरोपही गडकरींनी पत्रातून केला आहे. निविदा रद्द करणे, कोरोना काळात कंत्राटी कर्मचाऱ्यांना टर्मिनेट करणे, असे निर्णय मुंढे यांनी घेतल्याचा दावाही गडकरींनी पत्रात केला आहे. गडकरींच्या आरोपांवर आता पीएमओ कोणती कारवाई करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

News English Summary: Union Minister Nitin Gadkari has lodged a complaint against Nagpur Municipal Commissioner Tukaram Mundhe directly with the PMO. Gadkari has lodged a complaint against Mundhe in a letter to the PMO over the Nagpur smart city scam.

News English Title: Union Minister Nitin Gadkari complaints about Tukaram Mundhe to PMO News Latest Updates.

हॅशटॅग्स

#BJPM(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x