9 May 2024 4:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 09 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 09 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या South Indian Bank Share Price | शेअर प्राईस 27 रुपये! स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआउट, लवकरच मोठा परतावा देईल Gold Rate Today | खुशखबर! आज अक्षय्य तृतीयेच्या 2 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम झाला, नवे दर तपासून घ्या Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा! 1 महिन्यात दिला 41% परतावा, स्टॉक अप्पर सर्किटवर JP Associates Share Price | शेअर प्राईस रु.17, जेपी असोसिएट्स कंपनीबाबत चिंता वाढवणारी अपडेट, स्टॉक Sell करावा? Yes Bank Share Price | येस बँकेबाबत नवीन अपडेट आली, थेट शेअर्सला किती फायदा होणार? स्टॉक Buy करावा?
x

EKI Energy Services Share Price | असा शेअर निवडा! गुंतवणुकीवर 1600 टक्के परतावा दिला, स्टॉक डिटेल्स पहा

EKI Energy Services Share Price

EKI Energy Services Share Price | ‘ईकेआय एनर्जी सर्व्हिसेस’ या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअरने पुन्हा एका तेजी पकडली आहे. 511.95 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर पोहोचल्यानंतर, ईकेआय एनर्जी सर्व्हिसेस स्टॉक सलग दोन दिवस अप्पर सर्किट होता करत होता. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 688.20 रुपये किमतीवर पोहोचले होते. ईकेआय एनर्जी कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 2964 रुपये होती. कंपनीच्या शेअर्समध्ये विक्रीचा दबाव वाढला होता आणि स्टॉक 50 टक्के पर्यंत खाली आला होता. आता मात्र स्टॉकमध्ये सुधारणा होत आहे. मंगळवार दिनांक 21 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 10.00 टक्के वाढीसह 757.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | EKI Energy Services Share Price | EKI Energy Services Stock Price | BSE 543284)

1.22 लाखावर दिला 24 लाख परतावा :
ईकेआय एनर्जी कंपनीचा IPO 24 मार्च ते 26 मार्च 2021 या काळात 100-102 रुपये किमतीवर गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या कंपनीचे शेअर्स 102 रुपये किंमत बँडवर वाटप करण्यात आले होते. गुंतवणूकदारांना IPO मध्ये एका लॉट अंतर्गत 1200 शेअर्सचे वाटप करण्यात आले होते, मात्र बोनस शेअर्स वाटप केल्यानंतर शेअरची संख्या वाढून 3600 झाली. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 688.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. अशा परिस्थितीत जर तुम्ही IPO मध्ये 1,22,400 रुपये लावले असते तर बोनस शेअर्स मिळाल्यानंतर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 24.77 लाख रुपये झाले असते. 1 लॉटमध्ये लोकांना 1200 शेअर्स वाटप करण्यात आले होते, आणि त्यासाठी गुंतवणूकदारांना 122400 रुपये जमा करावे लागले होते. EKI एनर्जी सर्व्हिसेस कंपनीने जुलै 2022 रोजी 3 : 1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप केले होते, म्हणजेच कंपनीने प्रत्येक 1 शेअरवर 3 बोनस शेअर वाटप केले होते.

गुंतवणुकीवर 1600 टक्के परतावा :
ईकेआय एनर्जी सर्व्हिसेस कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना स्थापनेपासून आतपर्यंत 1600 टक्के परतावा कमावून दिला आहे. तथापि मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्समध्ये 67 टक्के पडझड झाली होती. EKI एनर्जी कंपनीचे शेअर्स मागील 6 महिन्यांत 56 टक्के कमजोर झाले होते. या कंपनीचे बाजार भांडवल सुमारे 1893 कोटी रुपये आहे. ही कंपनी मुख्यतः कार्बन फूटप्रिंट मॅनेजमेंट, सस्टेनेबिलिटी ऑडिट आणि क्वालिटी कंपनी कार्बन क्रेडिट्स, असेट कंट्रोलसाठी प्रशिक्षण देण्याचे काम करते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | EKI Energy Services Share Price 543284 stock market live on 21 February 2023.

हॅशटॅग्स

#EKI Energy Services Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x