5 May 2024 6:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

Macfos IPO | ग्रे मार्केटमध्ये शानदार प्रदर्शन करणाऱ्या कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध होण्यास सज्ज, तुम्ही या IPO मध्ये पैसे लावले?

Macfos IPO share price

Macfos IPO | ‘मॅकफॉस लिमिटेड’ या ई-कॉमर्स कंपनीच्या IPO मध्ये पैसे लावण्याची मुदत आता संपली आहे. 21 फेब्रुवारी 2023 हा IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा शेवटचा दिवस होता. कंपनीने आपल्या IPO शेअरची किंमत बँड 96 ते 102 रुपये प्रति शेअर जाहीर केली होती. या कंपनीच्या आयपीओ शेअरने ग्रे मार्केटमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. ‘मॅकफॉस लिमिटेड’ कंपनीचा IPO स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 76 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे. GMP नुसार हा शेअर 178 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतो. 24 फेब्रुवारी 2023 रोजी या IPO शेअरचे वाटप केले जातील. स्टॉक 1 मार्च 2023 रोजी BSE SME निर्देशांकावर सूचीबद्ध होईल. स्टॉक एक्सचेंज एसएमई इंडेक्समध्ये लहान आणि मध्यम आकाराच्या कंपन्यांचे शेअर्स सूचीबद्ध होतात. ‘BigShare Services Private Limited’ फर्मला या IPO इश्यूचे रजिस्ट्रार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Macfos Share Price | Macfos Stock Price)

IPO ला प्रतिसाद :
‘मॅकफॉस लिमिटेड’ कंपनीचा IPO 127 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. एकूण IPO मध्ये गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांना कोटा : 15 टक्के, पात्र संस्थात्मक खरेदीदारांना : 50 टक्के, किरकोळ गुंतवणुकदारांना : 35 टक्के कोटा राखीव ठेवण्यात आला आहे. आणि कंपनीने आयपोओच्या माध्यमातून 23.75 कोटी रुपये भांडवल उभारण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले. राखीव कोटा पैकी गैर – संस्थात्मक गुंतवणूकदार कोटा : 127 पट, पात्र संस्थात्मक खरेदीदार कोटा : 10 पट, किरकोळ गुंतवणुकदार कोटा : 105 पट सबस्क्राईब झाला आहे.

मॅकफॉस आयपीओ इतर तपशील :
मॅकफॉस ही एक एसएमई कंपनी आहे. कंपनीने आपल्या आयपीओच्या माध्यमातून 10 रुपये दर्शनी मूल्याचे 2,328,000 इक्विटी शेअर्स जारी केले आहे. हा पूर्ण IPO ऑफर फॉर सेल अंतर्गत खुला करण्यात आला आहे. अतुल मारुती डंबरे, बिनोद प्रसाद आणि नीलेशकुमार पुरुषोत्तम चव्हाण हे कंपनीचे प्रवर्तक म्हणून काम पाहत आहेत. ‘Macfos Limited’ ही एक ई-कॉमर्स कंपनी असून ती आपल्या वेबसाइट आणि मोबाईल अॅप्लिकेशन Robu.in च्या माध्यमातून 12000+ इलेक्ट्रॉनिक घटकांची विक्री, पुरवठा आणि विपणन करते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Macfos IPO is ready for subscription check details on 22 February 2023.

हॅशटॅग्स

Macfos IPO share price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x