12 December 2024 1:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Spicejet Share Price | शेअरची किंमत 61 रुपये, स्पाईसजेट शेअर्समध्ये तेजीचे संकेत, कंपनीकडून आली फायद्याची अपडेट

Spicejet Share Price

Spicejet Share Price | स्पाईसजेट एअरलाईन कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4 टक्के वाढीसह 65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज या कंपनीचे शेअर्स जबरदस्त विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. आर्थिक संकटात अडकलेल्या स्पाइसजेट कंपनीने मंगळवारी माहीती दिली की, कंपनीला भाडेतत्वावर विमान देणाऱ्या क्रॉस ओशन पार्टनर्स कंपनीसोबत 11.2 दशलक्ष डॉलर्स रक्केमेच्या वादात समझोता झाला आहे. आज बुधवार दिनांक 6 मार्च 2024 रोजी स्पाईसजेट एअरलाईन कंपनीचे शेअर्स 3.19 टक्के घसरणीसह 61.68 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( स्पाईसजेट एअरलाईन कंपनी अंश )

स्पाईसजेट एअरलाईन कंपनीने सांगितले की, “या विवाद निपटारा कराराअंतर्गत कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय एअरफ्रेम्स आणि इंजिनच्या हस्तांतरणाचा फायदा कंपनीला होणार आहे. स्पाइसजेट कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले की, क्रॉस ओशन पार्टनर्स कंपनीने दाखल केलेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली आहे. स्पाइसजेट कंपनी मागील काही काळापासून अनेक आर्थिक अडथळ्यांना सामोरे जात होती. त्यासाठी कंपनी भांडवल उभारण्याचा प्रयत्न करत आहे”.

2019 मध्ये स्पाईसजेट एअरलाईन कंपनीचे शेअर्स 146 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 75 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 60 टक्के वाढली आहे.

दीर्घकालीन गुंतवणुकदारांना मात्र अजूनही 24 टक्के तोटा सहन करावा लागत आहे. 2019 मधील किमतीच्या तुलनेत स्पाईसजेट एअरलाईन कंपनीचे शेअर्स 56 टक्के घसरले आहेत. स्पायजेट शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 77.50 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 22.65 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 4,359.92 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Spicejet Share Price NSE Live 06 March 2024.

हॅशटॅग्स

#SpiceJet Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x