26 April 2024 8:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

Tata Group Stock | करोडपती करणारा हा शेअर आता दुप्पट परतावा देऊ शकतो, तज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस पहा

Tata Group Stock

Tata Group Stock | टाटा समूहातील टायटन कंपनीचा स्टॉक दिवंगत गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचा पसंतीचा स्टॉक होता. टायटन कंपनीचा शेअर हा म्युच्युअल फंड, FII आणि दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी एक पारंपरिक गुंतवणूक पर्याय आहे. टाटा समूहातील कंपनीच्या शेअरने नुकताच NSE निर्देशांकावर 2791 रुपये ही आपली सर्वकालीन उच्चांक किंमत स्पर्श केली आहे. तथापि, विक्रमी उच्चांक किंमत गाठल्यानंतर टायटन कंपनीच्या शेअरमध्ये थोडी प्रॉफिट बुकींग सुरू झाली होती, त्यामुळे शेअरची किंमत किंचित घसरली आहे. दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी या कंपनीच्या शेअरमध्ये आपली गुंतवणुक वाढवली आहे.

टायटनचे शेअर्सची लक्ष किंमत :
स्टॉक मार्केटमधील तज्ज्ञांनी टाटा समूहातील टायटन कंपनीच्या शेअरवर पैसे लावण्याचा सल्ला दिला आहे. दीर्घकालीन गुंतवणूकदार घसरणीवर स्टॉक खरेदी करू शकतात. चालू आर्थिक वर्षाच्या तिसर्‍या आणि चौथ्या तिमाहीत टायटन कंपनी मजबूत नफा संकलित करेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. स्टॉक मार्केट तज्ञांचे म्हणणे आहे की सध्या टायटन कंपनीच्या शेअर्सची किंमत खरेदी करण्यासाठी एकदम योग्य आहे. सध्याच्या 2350 रुपये या किंमत पातळीवर स्टॉक खरेदी करून 3000 या लक्ष किमतीसाठी होल्ड करण्याचा सल्ला तज्ञांनी दिला आहे. टायटन कंपनीचे शेअर्स दरम्यानच्या काळात 3000 रुपये पर्यंत जाऊ शकतात. दीर्घ काळात टायटन कंपनीच्या शेअरमध्ये 5000 रुपयांपर्यंतही वाढण्याची क्षमता आहे.

6 महिन्यांत 25 टक्के परतावा :
GCL सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी आपल्या अहवालात म्हंटले आहे की, पुढील 6-9 महिन्यांत टायटन कंपनीचे शेअर्स 3000 रुपयांवर जाऊ शकतात. आणि पुढील 2 वर्षांत स्टॉक 5000 रुपये पर्यंत वाढतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मागील 6 महिन्यांत टायटन कंपनीच्या शेअर्सची किंमत 25 टक्के वाढली आहे. 16 मे 2022 रोजी टायटन कंपनीचे शेअर्स 2110.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, त्यात वाढ होऊन आता स्टॉक 14 नोव्हेंबर 2022 रोजी 2630.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

टायटनमध्ये झुनझुनवाला यांची गुंतवणूक :
दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे 14 ऑगस्ट 2022 रोजी निधन झाले होते. टायटन कंपनीच्या जुलै-सप्टेंबर 2022 या तिमाहीतील शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी टायटन मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. राकेश झुनझुनवाला यांच्याकडे टायटन कंपनीचे 3,41,77,395 शेअर्स म्हणजे 3.85 टक्के मालकी वाटा आहे. त्याच वेळी, राकेश झुनझुनवाला यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टायटन कंपनीचे 1,50,23,575 शेअर्स आहेत. त्यांचा कंपनीतील एकूण गुंतवणूक वाटा 1.69 टक्के आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Tata Group Stock of Titan limited share price return on investment on 16 November 2022.

हॅशटॅग्स

#Tata Group Stock(29)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x