5 May 2024 4:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर Smart Investment | श्रीमंत बनवतो हा 15*15*15 फॉर्म्युला, हमखास कोटीत परतावा मिळतो, सेव्ह करून ठेवा Health Insurance Premium | हेल्थ इन्शुरन्स घेणाऱ्यांना धक्का! 10 ते 15 टक्क्याने वाढणार पॉलिसी प्रिमिअम Gold Rate Today | अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदीच विचार आहे? तनिष्क, मलबार ज्वेलर्स आणि कल्याण ज्वेलर्सचे दर जाणून घ्या
x

सेनेचा अपमान छोट्या-मोठ्या गोष्टीं? भाजपा - शिवसेना यांनी एकत्र यायला हवं: मनोहर जोशी

Shivsena Leader Manohar Joshi, Chief Minister Uddhav Thackeray, Shivsena, NCP, Congress, MahaVikasAghadi

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी मोठं विधान केलं आहे. शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्र आले तर उत्तम होईल, पण सध्या दोन्ही पक्ष त्या मानसिकतेत नाहीत, असं मनोहर जोशी म्हणाले. मनोहर जोशी यांनी हे आपलं वैयक्तिक मत असल्याचंही यावेळी नमूद केलं.

ऑक्टोबर महिन्यात विधानसभेची निवडणूक पार पडली. त्यानंतर निकाल लागला तो महायुतीच्या बाजूने मात्र शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाची मागणी लावून धरली. त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये काडीमोड झाला आणि शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत हात मिळवत मुख्यमंत्रीपद मिळवलं. उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. यानंतर आता मनोहर जोशी यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे.

आता असं वाटतं छोट्या-मोठ्या गोष्टींवरून आपसात वाद करण्यापेक्षा थोडं सहन करावं, काही गोष्टी असल्यास त्यांनी एकमेकांना आग्रहानं सांगाव्यात, एकत्र काम केल्यास दोघांच्याही फायद्याचं ठरेल, अशी मला खात्री आहे. ज्यावेळी कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळत नाही, त्यावेळी मतं गोळा करण्याच्या निमित्तानं, पक्ष विस्ताराच्या दृष्टीनं अशा गोष्टी घडतात. तसं सध्या शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्याबाबतीत झालं आहे. याचा अर्थ आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर कधीच जाणार नाही, असं नाही. योग्य वेळ येताच माननीय उद्धवजी योग्य भूमिका घेतील, अशी मला खात्री आहे. एकंदरीतच शिवसेना-भारतीय जनता पक्ष पुन्हा एकत्र येण्यावर मनोहर जोशींनी सूतोवाच केले आहेत.

 

In my Opinion it will be better if Shivsena and BJP will stay together says Former Chief Minister Manohar Joshi

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x