18 November 2019 12:20 AM
अँप डाउनलोड

आज मुंबईत राज ठाकरेंच्या दोन जाहीर सभा; आरे आणि पीएमसी बँकेचा मुद्दा उचलणार?

MNS, Maharashtra Navnirman Sena, Raj Thackeray, Raj Thackeray Rally, Raj Thackeray Speech, Maharashtra Vidhansabha Election 2019

मुंबई: ‘मेघ’ गर्जनेमुळे पुण्यात सभा रद्द झाल्यानंतर गुरूवारी मनसे प्रमुख राज ठाकरेंची मुंबईत सभा होणार आहे. राज ठाकरे यांच्या मुंबईत दोन सभांचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेद्वारे राज ठाकरे विधनसभा निवडणुक प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. राज ठाकरे यांची सायंकाळी सहा वाजता पहिली सभा मुंबईतील सांताक्रुझमधील मराठा कॅालनीमध्ये आणि दुसरी सभा गोरेगावमधील आझाद मैदानात आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान आरेतील झाडांची कत्तल आणि पीएमसी बँकेमुळे लाखो मुंबईकर संतापलेले असताना या दोन्ही विषयांशी भाजप आणि सेनेचा थेट संबंध असल्याने राज ठाकरे हा मुद्दा सभेत उचलण्याची शक्यता आहे.

राज्यभरातील मनसेच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पुण्यातील राज ठाकरे यांची सभा सुरू होण्यापूर्वीच पावसाने तुफान हजेरी लावली. सकाळी पडलेल्या पावसाने मैदानावर चिखल झाल्याने तसेच पाणी साठल्याने कार्यकर्त्यांनी मैदान भुसा, खडी व मोठमोठे फ्लेक्स टाकून व्यवस्थित करून घेतले होते. परंतु, संध्याकाळी सुरू झालेल्या मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांची दाणादाण उडाली होती. त्यानंतर अखेर पुण्यातील राज ठाकरेंची पहिली सभा रद्द करण्यात आली होती.

दरम्यान लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात न उतरता भाजप विरोधी भूमिका घेत जोरदार भाषण केली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे कोणती भूमिका घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(472)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या