26 April 2024 2:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

मंत्रिमंडळ विस्तारानंतर सर्व खात्यांचे यथोचित खातेवाटप होईल: अर्थमंत्री जयंत पाटील

Finance Minister Jayant Patil

मुंबई: राज्यातील शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस महाआघाडी सरकारच्या मंत्र्यांचे बहुप्रतीक्षित खातेवाटप अखेर आज जाहीर करण्यात आले. शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांच्यावर गृहमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांच्याकडे अर्थमंत्रीपद तर काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरातांकडे महसूल मंत्रीपद आले आहे.

दरम्यान, जयंत पाटील सदर खातेवाटपावर म्हणाले की, ‘माझ्या मते आज जाहीर झालेले खातेवाटप हे तात्पुरत्या स्वरूपाचे असून, मंत्रिमंडळ विस्तारानंतर सर्व खात्यांचे यथोचित खातेवाटप होईल, असे नमूद करत अर्थ मंत्रालयासह ८ खात्यांची जबाबदारी मिळालेले कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी मोठ्या प्रमाणात खातेबदल होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

एकनाथ शिंदे – गृह, नगर विकास, वने, पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, मृत व जलसंधारण, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण.

छगन भुजबळ – ग्रामविकास, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास आणि उद्योजकता, अन्न आणि औषध प्रशासन ही खाती देण्यात आलेली आहेत.

बाळासाहेब थोरात – यांच्याकडे महसूल, ऊर्जा व अपारंपरिक ऊर्जा, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय ही खाती सोपवण्यात आली आहेत.

सुभाष देसाई – उद्योग, उच्च तंत्र शिक्षण या खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.

 

Web Title:  Real Picture Regarding Maharashtra State Government Portfolios will be clear after the cabinet expansion says Finance Minister Jayant Patil

हॅशटॅग्स

#JayantPatil(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x