12 December 2024 10:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | नवीन वर्ष 'या' राशींसाठी असणार अत्यंत खास; शनीच्या साडेसातीपासून व्हाल कायमचे मुक्त Samvardhana Motherson Share Price | संवर्धना मदरसन सहित हे 4 शेअर्स 45% पर्यंत परतावा देतील, फायदा घ्या - NSE: MOTHERSON Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP
x

मुंबई मरोळ पाइप लाइनमध्ये झोपडपट्टीतील दूधवाल्याला कोरोनाची लागण

Corona Crisis, Covid19, Milkman Covid19, Marol Pipeline

मुंबई, १६ एप्रिल: धारावीमधील आणखी एका रहिवाशाचा बुधवारी करोनामुळे मृत्यू झाला असून धारावीतील मृतांची संख्या आठवर पोहोचली आहे. तर आणखी पाच करोनाबाधित सापडले असून बाधितांची संख्या ६० झाली आहे. बुधवारी मृत्यू झालेली व्यक्ती मरकज कार्यक्रमाला हजेरी लावून परतली होती.

दुसरीकडे मुंबईच्या मरोळ पाइप लाइनमधील एका झोपडपट्टीतील दूधवाल्याला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहितीसमोर आली आहे. त्यामुळे आरोग्य आणि पालिका प्रशासनाची झोप उडाली असून मरोळ पाइपलाइन परिसरात मोठ्या प्रमाणावर तपासण्या करण्यात येत आहेत.

मरोळ पाइपलाइन येथील एका झोपडपट्टीतील दूधवाल्याला ताप आल्यानंतर घशात खवखव होऊ लागल्याने त्याची तपासणी करण्यात आली असता त्याचे टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे. या दूधवाल्याला करोनाची लागण झाल्याचं आढळून आल्यानंतर तो राहत असलेला परिसर सील करण्यात आला आहे. तसेच त्याचे कुटुंबीय आणि तो राहत असलेल्या चाळीतील लोकांना क्वॉरंटाइन करण्यात आले असून त्यांच्या तपासण्याही सुरू आहेत.

तत्पूर्वी, दक्षिण दिल्लीतील मालवीय नगरमध्ये पिझ्झाची होम डिलिव्हरी करणाऱ्या एका व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेनंतर या भागातील ७२ कुटूंबियांना सध्या होम क्वारंटाईन (घरातच विलगीकरण) पद्धतीने राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

 

News English Summary: Corona infection has been reported in a slum in Mumbai’s Marol Pipeline. As a result, the health and municipal administration has fallen asleep and massive investigations are being conducted in the Marol Pipeline area.

News English Title: Story Corona a milkman has tested positive for Corona virus the man hails from Marol pipeline slum in Mumbai News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x