11 December 2024 9:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

जितेंद्र आव्हाड यांची कोरोनावर मात...सुखरूप घरी परतले!

Jitendra Awhad, Covid 19

मुंबई, १० मे: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. ठणठणीत बरे होऊन ते आज घरी परतले आहेत. आपल्यावर यशस्वी उपचार करणाऱ्या फोर्टिस रुग्णालयाच्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे त्यांनी आभार मानले आहेत. पुरोगामी महाराष्ट्रासाठी लढण्यास पुन्हा त्याच जोमानं सज्ज होऊया, असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर सातत्यानं फिरतीवर असणाऱ्या अनेक व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग होत असल्याच्या घटना समोर आल्या. यात माध्यमांच्या प्रतिनिधींचाही समावेश होता. त्यानंतर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनाही करोनाचा संसर्ग झाल्याची चाचणीतून निष्पन्न झालं. करोनाचं निदान झाल्यानंतर आव्हाड यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर जिद्द व उपचाराच्या मदतीनं आव्हाड यांनी करोनावर मात केली आहे.

जितेंद्र आव्हाज पुढे म्हणाले की, माझ्यावर यशस्वी उपचार करणारे फोर्टिस हॉस्पिटल मुलुंड येथील सर्व डॉक्टर्स ,नर्सेस ,वॉर्डबॉय आणि इतर सर्व हॉस्पिटल स्टाफ यांचा मी आयुष्यभर ऋणी राहीन त्यांना मनापासून धन्यवाद. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझी पत्नी आणि मुलगी यांच्या प्रेमाची ताकद माझ्या पाठीशी होती असं जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटद्वारे सांगितले.

 

News English Summary: NCP leader and state housing minister Jitendra Awhad has successfully defeated corona. He has recovered from the cold and returned home today. He thanked the doctors and staff of Fortis Hospital for their successful treatment.

News English Title: Story Minister Jitendra Awhad Discharged From Hospital Covid 19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x