14 December 2024 5:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

'आघाडी बिघाडी' आणि 'देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र' पेजेस कोण चालवत होते

Jayant patil, Aghadi Bighadi, Devendra Fadnavis for Maharashtra Pages

मुंबई, २ मे: दोन तीन दिवसांपूर्वी अभिव्यक्ती स्वातंत्र, प्रसार माध्यमांचं स्वातंत्र आणि समाज माध्यमांवरील सामान्य लोकांचं मत प्रदर्शन करण्याचं स्वातंत्र यावरून राज्याचे राज्यपाल भगत सिंग कोषारी यांची भेट घेणारे भाजपचे नेते आता फडणवीसांवर होणाऱ्या ट्रॉलिंग वरून पोलिसांकडे तक्रार दाखल करून आले आहेत. त्यामुळे भाजपची संभ्रमावस्था वाढत असल्याचं मत सत्ताधारी व्यक्त करत आहेत.

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह भाषेत ट्रोल केलं जात असून ट्रोल करणाऱ्यांना रोखलं जावं अशी मागणी भाजपा नेत्यांनी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याकडे केली होती. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप खासदार गोपाळ शेट्टी आणि आमदार मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची भेट घेतली होती.

अनेक वेळा अश्लील पोस्ट टाकल्यानंतर त्याला दम देणं अपेक्षित आहे का ? भाजपाची सहनशीलता दुर्बलता समजू नये. अन्यथा आमचे कार्यकर्ते जशास तसं उत्तर देतील हेही आम्ही नम्रपणे सांगितलं,” असल्याचं प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे एकूण दोन्ही बाजू पाहता आता सत्ताधारी समर्थक आणि विरोधी पक्षातील समर्थकांमध्ये समाज माध्यमांवर वाद विकोपाला जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

दरम्यान, यावरून राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आणि मंत्री जयंत पाटील यांनी भाजपला मागील आठवण करत सुनावले आहे. यावर ट्विट करताना जयंत पाटील यांनी म्हटलं आहे की, ‘भाजपा नेते सोशल मीडियात त्यांच्या चुकांवर बोट ठेवणार्‍या नागरिकांवर कारवाईची मागणी करत आहेत. हि मागणी करण्यापुर्वी त्यांनी ‘आघाडी बिघाडी’, ‘देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र’ पेजेस कोण चालवत होते, त्याच्या जाहिराती करण्यासाठी कोण पैसे देत होते, याची माहिती आधी जाहीर करावी.

पुढे त्यांनी असं म्हटलं आहे की, आज संपूर्ण जग कोरोना सोबत लढत असताना, भाजपा नेते मात्र राज्यपाल, पोलीस आयुक्त यांच्याकडे जाऊन आमच्या वरील टिका थांबवा, अशी मागणी करत आहेत. यातून भाजपा नेत्यांचे प्राधान्यक्रम कोणते आहेत, हेच यातून स्पष्ट होते. सोशल मीडियातील टिका थांबवणे हि जीवनावश्यक सेवा आहे का ?

 

News English Summary: Senior NCP leader and minister Jayant Patil has reminded the BJP of the past. Tweeting this, Jayant Patil said, “BJP leaders are demanding action against the citizens who point fingers at their mistakes on social media. Before making this demand, they should first announce who was running the ‘Aghadi Bighadi’, ‘Devendra Fadnavis for Maharashtra’ pages, who was paying for its advertisements.

News English Title: Story NCP State President Jayant Patil critisized BJP Leaders after complaint at Mumbai Police over social media reactions News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x