15 December 2024 8:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

राजधानी मुंबईत मासेमारी, कॉल सेंटर आणि विवाह समारंभांना सशर्त परवानगी

Covid 19, Corona Crisis, Mumbai City

मुंबई, २० एप्रिल: कोरोना बाधितांचा आकडा राज्यात कमी होत असल्यामुळं समाधान व्यक्त होत असतानाच काल अचानक रुग्णांच्या संख्येत उच्चांकी वाढ झाली. रुग्णांच्या संख्येबरोबर मृतांचा आकडाही वाढत आहे. त्यामुळं प्रशासनाची चिंता काही प्रमाणात वाढली आहे. असं असलं तरी आजपासून राज्याच्या काही भागांत निवडक उद्योगधंदे सुरू होत आहेत. अर्थात, लॉकडाऊनचे नियम पाळून हे अर्थचक्र सुरू होणार आहे.

राज्यात रविवारी एकाच दिवशी ५५२ नव्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील कोरोना विषाणू बाधितांचा आकडा हा ४ हजारांहून अधिक झाला आहे. राज्यात रविवार दिवसाअखेरपर्यंत रुग्णांची संख्या ही ४ हजार २०० वर पोहोचली आहे, यातील सर्वाधिक म्हणजे २ हजार ७२४ रुग्ण हे राजधानी मुंबईमधले आहेत. मुंबईत रविवारी ४५६ नवे रुग्ण समोर आले आहेत.

कोरोना विषाणूच्या बाधेमुळे रविवारी १२ जणांचा मृत्यू झाला यामुळे राज्यात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ही २२३ वर पोहचली आहे. रविवारी मृत्युमुखी पडलेल्या १२ रुग्णांपैकी ६ मुंबई, ४ मालेगाव आणि प्रत्येक एक रुग्ण हा सोलापूर आणि अहमदनगरमधला आहे.

दरम्यान, मुंबईचं अर्थचक्र सुरू राहावं म्हणून मुंबई महापालिकेने कंटेन्मेंट झोन वगळून इतर भागात अत्यावश्यक सेवेतील काही गोष्टींना आजपासून मर्यादितप्रमाणात लॉकडाऊनमधून सशर्त परवानगी दिली आहे. यानुसार ज्या संस्था किंवा व्यवसाय इत्यादींना सूट देण्यात येईल त्यांनी किमान मनुष्यबळाचा वापर करून सदर कार्यवाही करणे अपेक्षित आहे, असं पालिकेनं म्हटलं आहे. पालिकेने कंटेन्मेंट झोन नसलेल्या परिसरातच मासेमारी, कॉल सेंटरसह विवाह समारंभांनाही काही अटींवर सूट दिली आहे. मात्र, या अटींचा भंग केल्यास संबंधितांना एक वर्षाची शिक्षा होऊ शकते, असा इशाराही पालिकेने दिला आहे.

 

News English Summary: While the number of patients in the state is declining due to coronary disease, the number of patients has increased suddenly. The death toll is also increasing with the number of patients. That has raised the concern of the administration to some extent. Anyway, from today onwards, select industries are starting to operate in some parts of the state. Of course, this budget is about to start following the rules of lockdown.

News English Title: Story some relief for non containment zones in Mumbai City Covid 19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x