12 December 2024 11:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे Maruti Suzuki Swift | या कारच्या खरेदीसाठी शो-रूम मध्ये गर्दी, 6.49 लाखांची बजेटमधील कार खरेदी करा, फीचर्स जाणून घ्या BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL Horoscope Today | नवीन वर्ष 'या' राशींसाठी असणार अत्यंत खास; शनीच्या साडेसातीपासून व्हाल कायमचे मुक्त Samvardhana Motherson Share Price | संवर्धना मदरसन सहित हे 4 शेअर्स 45% पर्यंत परतावा देतील, फायदा घ्या - NSE: MOTHERSON Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना
x

ICICI Mutual Fund | पैसा झाला मोठा! या फंडाच्या योजनेने अल्प गुंतवणुकीवर 2.4 कोटी परतावा, रिस्क घेणारे करोडपती, तुमचं काय?

ICICI Mutual Fund

ICICI Mutual Fund | म्युच्युअल फंड एसआयपी मधील गुंतवणूक आपल्याला नियमित परतावा कमावून देऊ शकते कारण, ते शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणुक करून बाजारातील अस्थिरता व्यवस्थापित करू शकतात. म्हणूनच म्युच्युअल फंड दीर्घ मजबूत परतावा कमावून देतो. टेक म्युच्युअल फंडानी मागील 20 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना सरासरी वार्षिक 20 टक्के परतावा कमावून दिला आहे. तुम्ही जर 20 वर्षापूर्वी टेक म्युचुअल फंडात एसआयपी गुंतवणूक केली असती, तर तुम्ही आज करोडपती झाला असता.

2.4 कोटी रुपये परतावा कसा मिळवाल? :
जर तुम्ही 20 वर्षांसाठी एसआयपी पद्धतीने म्युचुअल फंडात दरमहा 10,000 रुपये जमा करायला सुरुवात केली तर, तुम्हाला 2.4 कोटी रुपये परतावा मिळू शकतो. आपण या लेखात टेक म्युच्युअल फंड योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ. मागील 20 वर्षांत सर्वाधिक SIP परतावा देणाऱ्या यादीत टेक म्युचुअल फंड अग्रस्थानी आहेत. टेक म्युचुअल फंड सातत्याने आपल्या स्पर्धकांना परतावा देण्याबाबत मागे टाकत आहे.

ICICI प्रुडेन्शियल टेक्नॉलॉजी फंड :
या म्युचुअल फंडाने मागील 20 वर्षांत आपल्या शेअर धारकांना सर्वाधिक एसआयपी परतावा मिळवून दिला आहे. मागील 10 वर्षांपासून या म्युचुअल फंडाची थेट योजना उपलब्ध आहे. दीर्घ काळात हे म्युचुअल फंड अप्रतिम परतावा कमावून देतात, कारण यात चक्रवाढ पद्धतीने परतावा मिळतो.

SIP गुंतवणुकीचे तपशील : ICICI प्रुडेन्शियल टेक्नॉलॉजी फंड तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानावर अवलंबून असलेल्या कंपन्यांमध्ये इक्विटी आणि सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करतो. हा म्युचुअल फंड मुख्यतः आपला टेक कंपनीमध्ये गुंतवणूक करून दीर्घकालीन पैसे कमविण्याचे लक्ष्य निर्धारित करतो. या म्युचुअल फंड योजनेत एकरकमी गुंतवणूक मर्यादा रक्कम 5,000 रुपये आहे. तर 1,000 रुपये भरून तुम्ही SIP गुंतवणूक सुरू करु शकता. जर ही म्युचुअल फंड योजना परिपक्वता कालावधीपूर्वी रिडीम केल्यास तुम्हाला 1 टक्के एक्झिट लोड भरावा लागेल.

लार्ज कॅप कंपन्यांवर लक्ष केंद्रित :
आजच्या काळात हा म्युचुअल फंड लार्ज कॅप कंपन्यांमध्ये अधिक गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतो. एकूण फंडाच्या रक्कमपैकी 88 टक्के गुंतवणूक टेक कंपनीमध्ये केली जाते. आणि मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांमध्ये 6-6 टक्के रक्कम गुंतवणूक केली जाते. हा एक टेक सेक्टरशी संबंधित म्युचुअल फंड आहे, म्हणून त्यात अतिशय उच्च जोखीम आहे. या म्युचुअल फंडाची AUM म्हणजेच अॅसेट अंडर मॅनेजमेंट 9,182 कोटी रुपये आहे. सध्या या म्युचुअल फंडाचे खर्चाचे प्रमाण 2.1 टक्के असून थेट योजनेसाठी त्याचे खर्चाचे प्रमाण 0.89 टक्के आहे.

गुंतवणुकीवर मिळणारा परतावा :
या म्युचुअल फंडाने मागील 20 वर्षांत आपल्या शेअर धारकांना वार्षिक सरासरी 20 टक्के दराने परतावा कमावून दिला आहे. मागील 15 वर्षांत या म्युचुअल फंडाने लोकांना वार्षिक सरासरी 21 टक्के परतावा कमावून दिला आहे. गेल्या 10 वर्षात या म्युचुअल फंडाने अपाय गुंतवणुकदारांना सरासरी वार्षिक 21.5 टक्के परतावा कमावून दिला आहे. गेल्या 5 वर्षांत या म्युचुअल फंडाने सरासरी वार्षिक 26.8 टक्के परतावा कमावून दिला आहे.

या म्युचुअल फंडाने मागील 21 वर्षात आपल्या दीर्घ कालीन गुंतवणूकदारांना 29 टक्के परतावा कमावून दिला आहे. या टेक म्युचुअल फंडने 5 ते 20 वर्षांच्या मध्यम ते दीर्घकालीन कालावधीत नियमित स्थिर परतावा कमावून दिला आहे. गुंतवणूकदारांनी या म्युचुअल फंड योजनेत दीर्घ कालावधीसाठी SIP गुंतवणूक तसेच एकरकमी गुंतवणूक केली असती तर त्यांना या दोन्ही पद्धतीने मोठा परतावा मिळाला असता. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की, हा म्युचुअल फंड मुख्यतः एकाच क्षेत्रात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतो, म्हणून त्यात जोखीम खूप जास्त आहे. तुम्ही तुमच्या म्युच्युअल फंड पोर्टफोलिओमध्ये वैविध्यता ठेऊ शकता. ज्यात तुम्ही प्रामुख्याने लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप कंपनीच्या म्युचुअल फंडांचा समावेश करू शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| ICICI prudential Technology Mutual Fund Scheme for long term investment to earn huge Return on 17 December 2022.

हॅशटॅग्स

ICICI Mutual fund(29)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x