महत्वाच्या बातम्या
-
‘बोला काय विचारू?’, ‘मोदीमय’ मुलाखतीची राज ठाकरेंकडून खिल्ली
पंतप्रधानांच्या त्या मुलाखतीची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून खिल्ली उडवली आहे. मोदींची ती मुलाखत म्हणजे स्वतःच स्वतःला प्रश्न विचारल्यासारखं होतं, असा टोला राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून पंतप्रधानांना लगावला आहे. व्यंगचित्रात राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी हे स्वतःच स्वत:ची मुलाखत घेत असून यावेळी “बोला काय विचारु ?” असं प्रश्न ते स्वतःलाच दुसऱ्या बाजूने करत आहेत असं दाखवलं आहे. त्या मुलाखतीचा एक ‘मनमोकळी’ मुलाखत ! असा उल्लेख राज ठाकरे यांनी केला असून, ती ठरवून केलेली मुलाखत होती असं अप्रत्यक्षरित्या सूचित केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोदींची मुलाखत म्हणजे चहाच्या पेल्यातले वादळ : उद्धव ठाकरे
पंतप्रधान मोदी यांच्या मुलाखतीचे वादळ हे चहाच्या पेल्यातलेच ठरले आणि मोदी हे केवळ बचावात्मक पवित्र्यात दिसले तसेच २०१९ ची चिंता त्यांच्या हावभावात स्पष्ट दिसत होती, अशा बोचरी टीका सामनामधून मोदींच्या मुलाखतीवर करण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
राफेल डील: ना पंतप्रधान, ना संरक्षणमंत्री तर अर्थमंत्री उत्तर का देतात? - खासदार सौगत राय
तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत राय यांनी राफेल करारावरून नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळावर बोचरी टीका केली आहे. भारतीय जनता पक्षाला राफेल लढाऊ विमानांच्या करारावर बोलण्यासाठी राज्यसभेचा सदस्य सापडला. भाजपचे लोकसभेत ३०० खासदार असूनही राज्यसभेतला माणूस इथे येऊन नरेंद्र मोदी सरकारची बाजू मांडत आहे. विशेष म्हणजे राज्यसभेचे सदस्य असलेले अरुण जेटली हे संरक्षण मंत्री सुद्धा नाहीत. तरी पण ते स्वतःला राफेल लढाऊ विमानांच्या करारातील तज्ज्ञ समजतात.
6 वर्षांपूर्वी -
मग होऊ दे JPC'; 'शिवसेनेलासुद्धा मोदी सरकारवर संशय
राफेल करारावरुन आज लोकसभा सभागृहात काँग्रेसने मोठा गदारोळ केला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनंतर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनीही जेटलींना यासंदर्भात प्रश्न विचारले. दरम्यान, अर्थमंत्री अरुण जेटलींच्या उत्तराने आपलं समाधान झालं नसल्याचं खासदार सावंत यांनी म्हटलं आणि अप्रत्यक्षरित्या भाजप व मोदी सरकारवरच संशय व्यक्त केला.
6 वर्षांपूर्वी -
राफेल कराराच्या चौकशीसाठी जेपीसीची गरज नाही : अरुण जेटली
राफेल लढाऊ विमानांच्या मुद्द्यावरून लोकसभेत आज प्रचंड गदारोळ सुरू आहे. सत्ताधारी भाजप आणि विरोधक एकमेकांवर सडकून आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. त्यात राहुल गांधी यांच्या प्रश्नांना थेट आणि सविस्तर उत्तर देण्यापेक्षा राहुल गांधींबाबत चर्चेला येतील असे शब्द वापरून मूळ मुद्याला बगल देण्याचा प्रयत्न केला असं निदर्शनास येत होतं.
6 वर्षांपूर्वी -
भाजपकडून महिलांचा अपमान! शबरीमलात महिलांचा प्रवेश ही विनाशकारी घटना म्हटलं
शबरीमला मंदिराच्या गाभाऱ्यात आज २ महिलांनी प्रवेश करून दर्शन घेतल्याची घटना ही विनाशकारक असल्याचं भाजपकडून वक्तव्य केलं आहे. आज पहाटे बिंदू आणि कनकदुर्गा या पन्नाशीच्या आतल्या महिलांनी शबरीमलामध्ये कडेकोट पोलिसांच्या गराड्यात मंदिरात प्रवेश केला आणि शेकडो वर्षांची परंपरा मोडीत काढली.
6 वर्षांपूर्वी -
मोदींची मुलाखत: बरोबर मोदीजी! प्रियांका चतुर्वेदींनी मोदींना 'त्या' शब्दांची आठवण करून दिली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली असून लोकसभा निवडणूकपूर्व ठरवून घेतलेली मुलाखत अशी विरोधकांनी त्यावर टीका केली आहे. या मुलाखतीदरम्यान मोदींनी काँग्रेसच्या विधानांवर भाष्य केलं आणि म्हणाले की, जैसी जिसकी सोच, वैसे शब्द’ असं उत्तर दिल. सदर मुलाखत जवळपास ९५ मिनिटांची होती.
6 वर्षांपूर्वी -
माझं कोणीही काही करू शकत नाही, माझ्याकडे राफेल घोटाळ्याची माहिती: पर्रिकरांची ऑडिओ क्लिप
राफेल लढाऊ विमान घोटाळ्यावरून काँग्रेसने आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्यावर सुद्धा निशाणा साधला आहे. राफेल लढाऊ विमानांच्या घोटाळ्याचे रहस्य गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांच्या बेडरूममध्ये असल्याचा धक्कादायक आरोप काँग्रेसने केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
शबरीमला मंदिरात दोन महिलांनी घेतले भगवान अयप्पा यांचे दर्शन
केरळमधील २ महिलांनी शबरीमला येथील भगवान अयप्पा यांचे दर्शन घेतले आहे. काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने १० ते ५० वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखले जाऊ शकत नाही, असा ऐतिहासिक निकाल दिला होता. या निर्णयानंतरही कालपर्यंत एकासुद्धा महिलेला अयप्पांचे दर्शन घेने शक्य झाले नव्हते.
6 वर्षांपूर्वी -
हिम्मत असेल तर मोदींनी आर्थिक मुद्यांवर माझ्याशी चर्चा करावी: चंद्राबाबूंचं आव्हान
मागील साडेचार वर्षांच्या कार्यकाळात देशाला काय आर्थिक फायदा झाला यावर पंतप्रधानांनी थेट माझ्याशी चर्चा करावी असे खुले आव्हान आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडूंनी नरेंद्र मोदी यांना दिले आहे. मंगळवारी पंतप्रधान मोदींनी एअनआय’ला दिलेल्या मुलाखतीवर प्रतिक्रिया देताना त्यांनी मोदी सरकारच्या कार्यकाळात देशाने अपेक्षित आर्थिक वाढीचा दर गाठला का? असा सवाल सुद्धा उपस्थित केला.
6 वर्षांपूर्वी -
शेकडो निरपराधांचे बँकेत मृत्यू झाले, तरी मोदींना नोटाबंदी हा झटका वाटत नाही?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली असून लोकसभा निवडणूकपूर्व ठरवून घेतलेली मुलाखत अशी विरोधकांनी त्यावर टीका केली आहे. या मुलाखतीदरम्यान मोदींनी नोटाबंदी, राम मंदिर, RBI मधील वाद आदी विविध मुद्द्यांवर लोकसभा निवडणुका जवळ येताच भाष्य केले. सदर मुलाखत जवळपास ९५ मिनिटांची होती.
6 वर्षांपूर्वी -
उद्योगमहर्षि रतन टाटांना अमित ठाकरे यांच्या लग्नाचे निमंत्रण
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे लवकरच बोहल्यावर चढणार आहे. अमित ठाकरे यांचा विवाह मिताली बोरूडेशी होणार असून नातेवाईक आणि जवळच्या मोजक्या मंडळींना आमंत्रित करत लग्न अगदी साध्या पद्धतीने करणार असल्याचे राज ठाकरे यांनी याआधीच सांगितले होते. त्यामुळे घरातील आणि नात्यांमधील ती मोजकी मंडळी कोण याची सरावांनाच उत्सुकता होती.
6 वर्षांपूर्वी -
नगर: प्रथम सेनेकडून एनसीपी व काँग्रेससोबत पाठिंब्यासाठी चर्चा सुरु होती: रामदास कदमांचा गौप्यस्फोट
अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दिलेला झटका शिवसेनेच्या फार जिव्हारी लागलेला आहे. दरम्यान, नगरच्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेने सर्वाधिक जागा जिंकल्यानंतर त्यांनी प्रथम पाठिंब्यासाठी काँग्रेस आणि एनसीपीशी चर्चा केली होती. परंतु, एनसीपीने आयत्यावेळी धोका दिल्याचा आरोप शिवसेनेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
मतदारांनो! आली रे आली निवडणुकीपूर्व 'मोदी' स्वस्ताई आली! सविस्तर
पाच राज्यांमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला आणि विशेष करून मोदी ब्रॅण्डला पडलेल्या फटाक्यांमुळे भाजपाला लोकसभा निवडणुकीआधी खडबडून जाग आली आहे. महागाई घटत नसल्याने भाजपची मतं घटली आणि परिणामी धार्मिक राजकारण पथ्यावर न पडल्याने हिंदी भाषिक पट्यात काँग्रेस सत्तेत विराजमान झाली आहे. आता लोकसभा निवडणुकीचा धसका घेतलेल्या मोदी सरकारकडून निवडणुकीआधी मतदारांना आकर्षित करण्यासाठी करांमध्ये घट करून विविध वस्तू स्वस्त करण्याचे प्रकार सुरु झाले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज लोकसभेच्या रिंगणात
मोदी सरकारवर खुलेपणानं टीका करणारे आणि समाजातील प्रत्येक गंभीर प्रश्नावर बेधडकपणे भाष्य करणारे अभिनेते प्रकाश राज आता राजकारणाच्या आखाड्यात उतरणार आहेत. त्यांनी नववर्षाच्या सुरूवातीला आपण २०१९ ची लोकसभा निवडणुक लढवणार असल्याचं अधिकृत ट्विट केलं आहे. विशेष म्हणजे त्यासाठी त्यांनी कोणत्याही पक्षाची निवड केली नसून ते थेट अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
आंबेडकरी बांधवांनी केले विजयस्तंभाला अभिवादन
भीमानदीकाठावरील कोरेगाव भीमा जवळील ऐतिहासिक विजयस्तंभ मानवंदना सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहेत. मानवंदना सोहळ्यास महाराष्ट्रासह देशभरातून आज म्हणजे 1 जानेवारीला लाखो आंबेडकरी अनुयायी जमा झाले आहेत. दरम्यान, यावेळी विविध पक्ष, सामाजिक संघटनांच्यावतीने अभिवादन सभांचे आयोजन करण्यात आले आहे. मागील वर्षी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आणि त्यानंतर उसळलेला हिंसाचार लक्षात घेता पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त करण्यात आला आहे.
6 वर्षांपूर्वी -
'बायको शिवसेनेसारखी पाहिजे, लफडी कळली तरी सोडत नाही' : नितेश राणे
आमदार नितेश राणे आणि शिवसेना यांच्यातील राजकीय वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. सामनातील आजच्या संपादकीय मध्ये आलेल्या अग्रलेखाचा संदर्भ घेऊन निलेश राणेंनी शिवसेनेला चांगलाच टोला लगावला आहे. नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंच्या टीकेचा त्यांच्याच भाषेत चांगलाच खरपूस समाचार घेतला आहे.
6 वर्षांपूर्वी -
धुळ्यात भाजपचे चंद्रकांत सोनार महापौरपदी विराजमान
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे चंद्रकांत सोनार यांची महापौरपदी तर उपमहापौर पदासाठी भाजपच्याच कल्याणी अंपळकर यांची वर्णी लागली आहे. महानगरपालिका निवडणुकीत एकूण ७४ जागांपैकी भाजपने ५० जागांवर घवघवीत यश प्राप्त केलं होतं. त्यामुळे अन्य कुणाची सुद्धा मदत न घेता भारतीय जनता पक्षाने स्वबळावर धुळे महानगर पालिकेत सत्ता स्थापन केली.
6 वर्षांपूर्वी -
राज्यातील सरकारचा जन्मच मुळात अनैतिक संबंधांतून झाला आहे: उद्धव ठाकरे
भाजप-एनसीपीचे अनैतिक राजकीय संबंध खूप जुनेच असून राज्यातील सध्याच्या सरकारचा जन्मच मुळात अशा अनैतिक संबंधांतून झाला आहे. केवळ अहमदनगरमधील नव्या पॅटर्नमुळं फक्त मोठ्या प्रमाणावर उफाळून आले इतकेच,’ अशी उपहासात्मक टीका टीका ‘सामना’च्या अग्रलेखातून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
राणेंच्या अत्याधुनिक इस्पितळात गरिबांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार
राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या स्वप्नातील अत्याधुनिक एसएसपीएम लाईफटाईम हॉस्पिटल अॅण्ड मेडिकल कॉलेजमध्ये उपचार आणि शस्त्रक्रिया होणा-या रुग्णांना आता शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य सुविधेचा लाभ मिळणार आहे. दरम्यान, सदर योजनेतून पिवळे व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबियांना २२ पेक्षा अधिक आजारांवर मोफत औषधोपचार, फेरतपासणी, आंतररुग्ण उपचार, शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL