महत्वाच्या बातम्या
-
'ते' विसरले यांना 'आठवले'? मोदी सरकार प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा करणार, RBI'शी बोलणी सुरु
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एक धक्कादायक आणि मोदी सरकारला पुन्हा गोत्यात आणणारं वक्तव्य केलं आहे. ज्या विषयावरून आधीच मोदी सरकारवर प्रचंड टीका झाली असताना, रामदास आठवलेंच्या या विधानाने मोदी आणि भाजप पुन्हा टीकेचे धनी होण्याची शक्यता आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोदींच्या हस्ते होणाऱ्या भूमिपूजन सोहळ्यात उद्धव ठाकरेंना निमंत्रण नाही
आगामी लोकसभा निवडणुका अगदी ३-४ महिन्यांवर येऊन ठेपल्याने भाजपने निवडणुकीचे उदघाटन आणि भूमिपूजन कार्यक्रम आयोजित केले आहेत. दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते कल्याण तसेच पुण्यात मेट्रो ट्रेनचे भूमिपूजन पार पडणार आहेत. विशेष म्हणजे हा कार्यक्रमाला भाजपचा मित्र पक्ष आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आलेले नाही.
6 वर्षांपूर्वी -
तेलंगणा पाठोपाठ कमलनाथांनी 'राज' मार्गाचं वास्तव स्वीकारलं? यूपी-बिहारींना नाही तर स्थानिकांना नोकऱ्या
मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर कमलनाथ यांनी बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांविरुद्ध आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. परप्रांतियाविरोधातील राग आळवला आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोंढे मध्य प्रदेशातील स्थानिक युवकांच्या नोकऱ्या बळकावतात. त्यामुळे आमच्या राज्यातील तरुणांना राज्यातील प्रत्येक उद्योगात ७० टक्के प्राधान्य देण्यात येणार असल्याचं नवंनियुक्त मुख्यमंत्री कमलनाथ यांनी स्पष्ट केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
कल्याणकरांना दुसरं गाजर? ६५०० कोटीच्या प्रतीक्षेत असताना, निविदाच काढल्या नसलेल्या मेट्रो-कामाचे निवडणूक पूर्व भूमिपूजन?
२०१४ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण-डोंबिवली शहराला तब्बल ६,५०० कोटींचं गाजर दाखवलं होतं. तेच आश्वासन अजून प्रत्यक्षात पूर्ण झालं नसताना आणि पुन्हा निवडणुका लागताच इथल्या सामान्य लोकांना तोंड तरी कसं दाखवणार या भीतीने भाजपने पुन्हा २०१९ मधील निवडणुका ४-५ महिन्यांवर आल्या असताना इथल्या सामान्यांना पुन्हा निवडणुकीचं गाजर दाखवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
विरोधी पक्षनेते पद: शिवराज सिंह चौहान यांना आरएसएस'चा विरोध
मध्यप्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या पाठिंब्यावर राष्ट्रीय काँग्रेसने सत्ता स्थापन केली आहे. के कमलनाथ लवकरच मुख्यमंत्रिपदाची सूत्र स्वीकारतील. सत्ताधाऱ्यांचा विषय मार्गी लागला असला तरी विरोधकांमध्ये वेगळाच पेच निर्माण झाला आहे. कारण सभागृहाच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे नाव पुढे रेटले जात असताना संघाकडून मात्र शिवराजसिंग यांच्या नावाला तीव्र विरोध असल्याचे समजते.
6 वर्षांपूर्वी -
१९८४ शीख विरोधी दंगल: काँग्रेस नेते सज्जन कुमार दोषी; जन्मठेपेची शिक्षा
१९८४ साली दिल्लीत उसळलेल्या शीखविरोधी दंगल प्रकरणात दिल्ली हायकोर्टाने आज महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. हायकोर्टाच्या कनिष्ठ कोर्टाने निर्णय बदलत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सज्जन कुमार यांना दोषी ठरवलं आहे. कुमार यांना शीख विरोधी दंगल प्रकरणातील सहभागाबद्दल जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. दरम्यान, दंगल भडकवणे आणि कट कारस्थान रचणे हे दोन गुन्हे कोर्टात सिद्ध झाले आहेत. परंतु, हत्या प्रकरणात कुमार यांची निर्दोष मुक्तता झाली आहे.
6 वर्षांपूर्वी -
राम मंदिर हा केवळ भाजपचा अजेंडा, ‘एनडीए’चा नव्हे; मित्रपक्षांची भूमिका
भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए’च्या एकूण घटकपक्षांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. तर जे आहेत ते स्वतःची वेगळी भूमिका घेताना दिसत आहेत आणि स्वतःला भारतीय जनता पक्षाच्या अजेंड्यापासून वेगळं ठेवत आहेत. एनडीए’चा भाग असलेल्या लोक जनशक्ति पार्टीने स्वतःची भूमिका मांडली आहे. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे चिरंजीव चिराग पासवान यांनी भारतीय जनता पक्षाला राम मंदिराच्या मुद्यावरून वेगळे पाडले आहे. राम मंदिर हा केवळ एका पक्षाचा अजेंडा आहे, तो संपूर्ण एनडीएचा अजेंडा नाही, अशा शब्दात त्यांनी भाजपाला अप्रत्यक्ष रित्या सुनावले आहे अशी चर्चा रंगली आहे.
6 वर्षांपूर्वी -
दाक्षिणात्य नेते राहुल गांधींच्या पाठीशी, तर मोदी स्वतःला राजे समजतात अशी टीका
देशात सध्या सर्वत्र अराजक माजले असून पंतप्रधान मोदींनी सत्ताकाळात देशाला १५ वर्षे मागे रेटले आहे. मोदी स्व:ताला देशाचे राजे समजत आहेत. त्यामुळे देशाला आता नव्या तरुण पंतप्रधानाची गरज आहे. दरम्यान, तामिळनाडूतर्फे आघाडीकडून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव आपण मांडत असल्याचे DMKचे अध्यक्ष एम के स्टॅलिन जाहीरपणे म्हणाले.
6 वर्षांपूर्वी -
सेना आमदार उदय सामंत म्हाडा अध्यक्ष, हा योगायोग? सेना शाखाप्रमुखाला ५ कोटींची दोन घरे!
माजी खासदार निलेश राणे यांनी काही दिवसापूर्वीच मुंबई म्हाडाचे अध्यक्ष आणि शिवसेना आमदार उदय सामंत यांच्याबाबत एक ट्विट केलं होतं. दरम्यान, काल घोषित झालेल्या नशीबवान उमेदवारांमध्ये खरी लॉटरी लागली आहे ती शिवसेनेच्या एका शाखाप्रमुखाला. इथे खरी लॉटरी लागली आहे ती शिवसेना खासदार, नगरसेवक आणि शाखाप्रमुख यांची असंच म्हणावं लागेल. कारण म्हाडाच्या इतिहासातील ग्रँट रोड येथील ५ कोटी किंमत असलेल्या दोन घरांसाठी शिवसेना शाखाप्रमुख विनोद शिर्के यांना खरी लॉटरी लागली आहे. तर शिवसेनेचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांना लोअर परळ येथील ९९ लाखांच्या घराची लॉटरी लागले आहे.
6 वर्षांपूर्वी -
छत्तीसगड: मुख्यमंत्रीपदासाठी भूपेश बघेल यांची निवड
छत्तीसगडमध्ये घवघवीत यश मिळवणाऱ्या काँग्रेसचा मुख्यमंत्री पदाचा पेच अखेर सुटला आहे. याआधी मध्यप्रदेश आणि राजस्थानातील मुख्यमंत्री पदाचा तिढा सोडवण्यात राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना यश आलं होतं, मात्र छत्तीसगडचा पेच कायम होता.
6 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरेंच्या हस्ते कोस्टल रोडचे भूमिपूजन; तर राज ठाकरे स्थानिक कोळी समाजाच्या भेटीला
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज वरळी कोळीवाड्याला भेट दिली. कारण मुंबईतील नियोजित सागरी मार्गामुळे स्थानिक मच्छिमार मोठ्या संकटात सापडला आहे. दरम्यान, या मार्गासाठी बांधकाम करताना भराव टाकला आणि खांब उभारले तर आम्हाला आमच्या बोटी उभ्या करता येणार नाही. आणि त्यामुळे होणाऱ्या बदलांमुळे मच्छीमारी करणे सुद्धा अवघड होणार आहे. दरम्यान, या सर्व समस्या कोळी समाजाने राज ठाकरे याना सांगितल्या आहेत.
6 वर्षांपूर्वी -
लोकसभा आढावा: कल्याणमध्ये सेनेच्या शिंदे'शाहीला मनसेच्या पाटील'शाहीकडून सुरुंग लागू शकतो?
२०१४ मधील लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ.श्रीकांत शिंदे यांनी विजय मिळवला होता. त्यावेळी भाजप आणि शिवसेनेने एकत्रित निवडणुका लढवल्याने मोदी लाटेचा थेट फायदा श्रीकांत शिंदे यांना झाला होता. त्यावेळी प्रचारात एकनाथ शिंदे यांनी मोदी लाट असल्याने मोदींच्या सभेसाठी शिवसेना पक्षप्रमुखांकडे हट्ट लावून धरला होता आणि प्रचाराच्या शेवटच्या क्षणी नरेंद्र मोदी यांना कल्याणमध्ये प्रचारासाठी आणून त्यांच्यानावाने मतांचा जोगवा मागितला गेला. परिणामी शिवसेना आणि भाजपची एकत्रित मतं श्रीकांत शिंदे यांच्या खात्यात पडली होती.
6 वर्षांपूर्वी -
आरबीआय गव्हर्नरपदी दास यांची नेमणूक ही आर्थिक दहशतवादाची सुरुवात : उद्धव ठाकरे
आरबीआय’च्या गव्हर्नरपदी शक्तिकांत दास यांची नेमणूक करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सडकून टीका केली आहे. मोदी सरकारला कोणत्याही विषयात सत्य समोर ठेवणारे लोक नको असून केवळ हो ला हो बोलणारे होयबा हवेत अशी खरमरीत शब्दांत टीका केली आहे. दरम्यान, शक्तिकांत दास यांची गव्हर्नरपदी नेमणूक त्याच उद्देशाने झाली असेल तर ही येऊ घातलेल्या आर्थिक दहशतवादाची सुरुवात आहे, असं मत सामनाच्या अग्रलेखातून आज व्यक्त करण्यात आलं आहे. त्यामुळे मोदी सरकार अर्थव्यवस्थेशी खेळत असल्याचे सामनातून म्हटलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
रामदास कदम म्हणजे उद्धव ठाकरेंचा पाळलेला कुत्रा: नितेश राणे
राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांनी काल खासदार नारायण राणे यांच्यावर टीका करताना म्हटले होते की, नारायण राणे म्हणजे कोकणाला लागलेला काळा डाग आहे, हा डाग धुतल्याशिवाय राहणार नाही’. दरम्यान, आमदार नितेश राणे यांनी रामदास कदमांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले आहे.
6 वर्षांपूर्वी -
राफेल डील: राहुल गांधींची 'जॉईंट पार्लीमेंट्री कमेटी'ची मागणी अजून मान्य नाही?
सुप्रीम कोर्टाने राफेल करारावरून चौकशी करण्याची गरज नसल्याचे निकालात स्पष्ट करताच अमित शाहांनी राहुल गांधीवर निशाणा साधला आहे. दरम्यान, आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी राहुल गांधींवर राफेलच्या मुद्द्यावरून देशाची दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे. तसेच त्यांनी देशाची माफी मागावी अशी जाहीर मागणी करावी.
6 वर्षांपूर्वी -
कंत्राटी महाभरतीमुळे भाजप-शिवसेना बेरोजगारांना भविष्यात महा-बेरोजगारीकडे ढकलतील? सविस्तर
महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना सरकार आगामी निवडणुकीच्या तोंडावर कंत्राटी महाभरतीचा खेळ करत आहे खरा, परंतु कंत्राटी नोकरी प्राप्त करणारे हेच उमेदवार भविष्यात बेरोजगार महाबेरोजगार ठरण्याची शक्यता अभ्यासाअंती समोर येते आहे. कारण विविध विभागांतील आणि क्षेत्रीय कार्यालयांतील रिक्त जागांपैकी ७० टक्के पदे बाहेरील यंत्रणेमार्फत आणि कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
कमलनाथ यांची मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री पदासाठी निवड
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि गांधी कुटुंबियांचे जवळचे मानले जाणारे कमलनाथ यांची मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी एकमताने निवड झाली आहे. मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसकडून कमलनाथ आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यात चुरस होती. अखेर एकमताने आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या आदेशानंतर कमलनाथ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
राफेल प्रकरणात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार
राफेल लढाऊ विमानांच्या करारात कोणतीही अनियमितता नसल्याचं स्पष्ट करत सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांनी संबंधित सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत. सरन्यायाधीश रंजन गोगोई, संजय किशन कौल आणि के. एम. जोसेफ यांच्या पीठाने दाखल याचिकांवर आज न्यायालयात अंतिम सुनावणी घेतली.
6 वर्षांपूर्वी -
गडकरींकडून विजय मल्ल्याची पाठराखण, म्हणाले 'तो घोटाळेबाज कसा'?
विजय मल्ल्याचे लंडनमधून भारतात प्रत्यार्पण होण्याआधीच त्याला सज्जन असल्याचा दाखल देण्यास भाजपकडून सुरुवात. कारण खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीच बँकांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवून आणि देशातून पलायन कडून लंडनमध्ये वास्तव्यास असलेल्या मल्ल्याची पाठराखण केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
आलू पॉलिटिक्स'चा दुसरा अंक सुरु? पराभूत झाल्याने भाजप चा पराक्रम
आलू पॉलिटिक्स’चा दुसरा अंक सुरु? पराभूत झाल्याने भाजप चा पराक्रम
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये तेजीचे संकेत; मिळेल मजबूत परतावा - NSE: ADANIPOWER
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH