महत्वाच्या बातम्या
-
सत्ताधारी शिवसेना राजदंड कसा पळवू शकते? शिवसेनेची नाटकं कोकणी जनता ओळखून: नितेश राणे
आज सभागृहाचं कामकाज सुरु होताच नाणार रिफायनरी विषयाला अनुसरून शिवसेनेचे काही सदस्य हातात बॅनर घेऊन आणि घोषणा देत अध्यक्षांच्या आसनासमोर आले. परंतु आमदार नितेश राणे थेट सभापतींच्या समोर गेले आणि सभापतींसमोर ठेवलेल्या राजदंडाजवळ पोहचले. परंतु आक्रमक झालेले आमदार नितेश राणे थेट सभापतींच्या राजदंडापर्यंत पोहोचल्याचे दिसताच शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, वैभव नाईक, राजेश क्षीरसागर व राजेंद्र साळवी सुद्धा सभापतींच्या आसनाजवळ पोहोचले.
7 वर्षांपूर्वी -
भाजप-सेनेच्या राज्यात उदयोग सुलभतेच्या बाबतीत महाराष्ट्र पिछाडीवर: जागतिक बँक
उद्योग संपन्न म्हणून अनेक वर्ष देशभर परिचित असणार महाराष्ट्र राज्य उदयोग सुलभतेच्या बाबतीत पिछाडीवर असल्याचं जागतिक बँकेच्या अहवालात समोर आले आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र उदयोग सुलभतेच्या बाबतीत देशातील पहिल्या दहा राज्यांच्या यादीत सुद्धा नाही. अगदी झारखंड आणि छत्तीसगड सारखी मागासलेली समजली जाणारी राज्य सुद्धा महाराष्ट्राच्या पुढे आहेत असं हा जागतिक बँकेचा रिपोर्ट सांगतो.
7 वर्षांपूर्वी -
महिलांना 'मोफत' गॅस जोडणी देणारी 'उज्ज्वला योजना' केवळ दिखावा?
देशातील गरीब महिलांना मोफत गॅस देऊन स्वतःची पाठ थोपटून घेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारच्या ‘उज्ज्वला योजने’तील वास्तव समोर आलं आहे. कारण उज्ज्वला अंतर्गत दिले जाणारे गॅस हे मोफत नसून त्यासाठी गरीब महिलांना नवी जोडणी घेताना तब्बल १७५० रुपये मोजावे लागत आहेत. त्यामधील ९९० रुपये हे शेगडीसाठी आणि ७६० रुपये हे सिलेंडरसाठी आकारले जात असल्याचं वास्तव समोर आला आहे.
7 वर्षांपूर्वी -
न्यायव्येवस्थेच्या सुनावणीत राज ठाकरेंच २०१४ मधील 'ते' मत अधोरेखित होत आहे? मुंबईसाठी स्वतंत्र रेल्वे बोर्ड
कारण उच्च न्यायालयाने १० जुलै २०१८ मध्ये एका जनहित याचिकेच्या सुनावणीवेळी मत व्यक्त केलं आहे की, “मुंबईसाठी स्वतंत्र रेल्वे बोर्ड स्थापन करण्याची गरज” आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये राज्यातील जनतेसमोर मांडलेल्या ब्लू-प्रिंट’मध्ये मुंबईतील वाहतूक व्यवस्थेवर विचार मांडताना आणि मुंबईमधील लोकसंख्या आणि इथल्या वाहतूक व्यवस्थेच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढायचा असेल तर मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या ‘मुंबईसाठी स्वतंत्र रेल्वे बोर्ड’ असावं असं २०१४ मध्ये सादर केलेल्या ब्लू-प्रिंट’मध्ये अधोरेखित केलं होत.
7 वर्षांपूर्वी -
उमेदवारीसाठी भाजपला ३० लाखाचा चेक झळकावून दाखवला, पण शिवसेनेने प्रवेश दिला
सांगली-मिरज-कुपवाड शहराच्या महापालिका निवडणुकीमध्ये भाजपकडून उमेदवारी मिळण्यासाठी त्याने पक्षातर्फे घेण्यात आलेल्या इच्छुकांच्या मुलाखतीदरम्यान थेट ३० लाखाचा चेक झळकावला होता. भाजपच्या या सक्रिय कार्यकर्त्याचे सचिन चौगुले असं नाव असल्याचं समोर आलं आहे. परंतु त्याच धनवान भाजप कार्यकर्त्याला शिवसेनेने प्रवेश दिल्याने सांगलीत त्या ३० लाखाच्या चेकची चर्चा रंगली आहे.
7 वर्षांपूर्वी -
एमआयएम-आंबेडकरांची आघाडी कॉंग्रेसच्या मुळाशी तर भाजपला फलदायी?
प्रकाश आंबेडकरांनी नुकतेच असदुद्दीन ओवेसीं’च्या एमआयएमशी आघाडी करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे जर भविष्यात जर ही आघाडी झाल्यास ते भाजपसाठी फलदायी असेल तर काँग्रेसची डोकेदुखी वाढविणारी असेल असं दिसत आहे. मुस्लिम समाजाने २०१४ मध्ये एमआयएम’ला मोठ्या प्रमाणावर मतदान केल्याने त्याचा थेट फायदा भाजपला झाला होता. त्यामुळे २०१९ ला मुस्लिम समाज सुद्धा एमआयएम पासून लांब राहू शकतो असं सुद्धा राजकीय विश्लेषक बोलत आहेत.
7 वर्षांपूर्वी -
मुंबई दादर'मध्ये येताच भाजपचे प्रवक्ते संबित पात्रां'च्या पायातले शूज हातात
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आज मुंबईमध्ये आहेत. मुंबईमधील पावसाने भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रां’वर नियोजित पत्रकार परिषद रद्द करण्याची वेळ आली आहे. परंतु पत्रकार परिषद रद्द झाल्यावर बाहेर पडलेल्या संबित पात्रांना पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे चालणे कदाचित इतके अवघड होऊन बसले की त्यांना पायातले शूज हातात घेऊन रस्ता शोधण्याची वेळ आली.
7 वर्षांपूर्वी -
रस्त्यांवरील खड्डे; मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली महापालिकेतील भ्रष्ट सत्ताधारी व अधिकारी किती निष्पापांचे प्राण घेणार?
काल ज्या घटनास्थळी आरव’चा रस्त्यांवरील खड्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला, त्या ठिकाणी त्याच्या बाबांनी आरवला आवडणारा दही-भात रस्त्यावर ठेवला आणि उपस्थितांचे डोळे पाणावले. अनेकांना ते दृश्य पासून रडू कोसळले. पालिकेतील भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांमुळे आणि सत्ताधार्यांमुळे अजून किती निरपराध लोक आपल्या प्रियजनांना गमावणार आहेत असा प्रश्न विचारला जात आहे.
7 वर्षांपूर्वी -
त्याच जुन्या जोष मध्ये भुज'बळ' विधानसभेत, घोषणांनी विधानभवन परिसर दणाणला
तब्बल २ वर्षानंतर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत पुन्हा धडाकेबाज प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला विधानसभेत पुन्हा बळ मिळणार आहे. छगन भुजबळांनी आज पावसाळी अधिवेशनाच्या दुस-या आठवड्याच्या पहिल्या दिवसाच्या कामकाजात सहभाग नोंदविला आहे.
7 वर्षांपूर्वी -
मुंबई गुजराती समाज आयोजित कार्यक्रमात राज ठाकरेंची रोखठोक मराठी भूमिका
मुंबई बोरिवली येथे श्री. विनूभाई वालीया प्रेरीत दादा-दादी पार्क या गुजराती समाजातील संस्थेचे सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनी काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत एक बैठकी आयोजित केली होती. या बैठकीत अनेक समस्यांवर मुक्त संवाद साधण्यात आला.
7 वर्षांपूर्वी -
भाजप आयटी-सेल योद्ध्यांनो शरद पवारांपासून सर्व विरोधकांना उत्तर देण्यास तयार रहा
आगामी निवडणुकीत सोशल मीडिया महत्वाची भूमिका बजावणार असल्याने भाजपच्या आयटी-सेल योद्ध्यांनी विरोधकांना जोरदार उत्तर देण्यासाठी कंबर कसली पाहिजे असं आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना केला आहे. तसेच शेतकरी आत्महत्यांवर बोलणाऱ्या शरद पवारांना सुद्धा सोशल मीडियातून चोख प्रत्युत्तर द्यावे असे आदेश अमित शहा यांनी त्यांच्या टीमला दिले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
याच सामान्य महाराष्ट्र सैनिकांच्या ताकदीने राज ठाकरे आगामी निवडणुकीत सर्व गणित बदलतील: सविस्तर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठ्या प्रमाणावर पक्षविस्तारावर लक्ष केंद्रित केल्याचं चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. मागील काही काळात अनेक वरिष्ठ नेते मंडळी पक्षाची साथ सोडून गेल्याने पक्षात आलेली मरगळ झटकून टाकण्यासाठी राज ठाकरे स्वतः नव्या जिद्दीने मैदानात उतरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
7 वर्षांपूर्वी -
मनु हा संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांपेक्षा श्रेष्ठ होता: संभाजी भिडे
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्या या विधानाने पुन्हा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. काल दुपारी २ वाजण्याच्या सुमारास संभाजी भिडेंनी जंगली महाराज मंदिरात सर्व धारकऱ्यांना तासभर मार्गदर्शन करताना हे विधान केले आहे, ज्यामुळे पुन्हा वाद उफाळून येऊ शकतो.
7 वर्षांपूर्वी -
मल्टिप्लेक्स विरोधातील मनसेच्या आंदोलनाचा सामान्यांना मोठा फायदा होणार
काही दिवसांपूर्वी मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर मल्टिप्लेक्स थिएटरमधील सामान्यांना न परवडणाऱ्या खाद्यपदार्थांच्या अवाजवी किंमती विरोधात आंदोलन छेडलं होत. विशेष म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाने सुद्धा मल्टिप्लेक्स थिएटरमधील खाद्यपदार्थांच्या अवाजवी किंमतीवरून राज्यसरकारला धारेवर धरलं होत आणि मल्टिप्लेक्स मालकांना ५ रुपयांचे पॉपकॉर्न २५० रुपयांना विकण्याचा अधिकार कोणी दिला असा प्रश्न उपस्थित केला होता.
7 वर्षांपूर्वी -
नोएडा'त मोदींच्या हस्ते होणार सॅमसंगच्या नव्या प्रकल्पाचे उद्घाटन
सॅमसंग कंपनीच्या या प्रकल्पाची बोलणी उत्तर प्रदेशाचे तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या सोबत झाली होती. परंतु उत्तर परदेशात सत्तापालट होऊन भाजपचे सरकार स्थापन झाले आणि सर्व काही खोळंबून होत. परंतु त्यानंतर सॅमसंग’च्या प्रतिनिधींनी उत्तर परदेश दौरा करून विद्यमान मुख्यमंत्री आदित्यनाथ यांची भेट घेतली आणि या प्रकरणाला पुन्हा गती आली आहे.
7 वर्षांपूर्वी -
पावसामुळे नागपूरकर 'ड्रमा'त, देशाच पायाभूत सुविधांच खातं व मुख्यमंत्री पद असून सुद्धा?
नागपूरमधील तुफान पावसामुळे नागपूर महापालिकेच्या ढिसाळ पायाभूत सुविधा आणि त्याच्या दर्जाची पोलखोल झाली आहे. विशेष म्हणजे भारताच्या पायाभूत सुविधां संदर्भातील महत्वाचं खातं नितीन गडकरींकडे, राज्याचं मुख्यमंत्रीपद फडणवीसांकडे आणि नागपूर महापालिकेची सत्ता असताना सुद्धा नागपूर शहरात झालेल्या तुफान पावसाने शहरातील पायाभूत सुविधांची पोलखोल झाली आहे.
7 वर्षांपूर्वी -
ख्रिस्ती धर्मीयांबाबत वादग्रस्त विधान, भाजप नेत्यांना शरम वाटली पाहिजे: शरद पवार
मुंबईतील भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी ख्रिस्ती धर्मीयांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे भाजपवर चारही बाजूने टीकेचा भडीमार होत असताना, आता राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांनी सुद्धा भाजपवर सडकून टीका केली आहे. भाजप नेत्यांना शरम वाटली पाहिजे,’ अशा तिखट शब्दात शरद पवारांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
7 वर्षांपूर्वी -
ख्रिश्चनांसंदर्भात वक्तव्य भोवल, भाजपा खासदार गोपाळ शेट्टी राजीनामा देण्याच्या तयारीत?
मुंबईतील मालवणी येथे ख्रिश्चनांसंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानामुळे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी प्रकाश झोतात आले आहेत. परंतु त्यांच्या विधानाने पक्ष गोत्यात आल्याने त्यांची दिल्लीश्वरांनी चांगलीच खरडपट्टी केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे गोपाळ शेट्टी प्रचंड नाराज असल्याचे समजते. त्यामुळे ते थेट राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे समजते.
7 वर्षांपूर्वी -
नागपूरमध्ये पावसाने केली सरकारची नाचक्की
विधिमंडळाच्या तळघरात पाणी शिरल्याने विधिमंडळाचा देखील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. अर्थातच अंधारात काम करणे शक्य नसल्याने विधिमंडळाचे कामकाज आज बंद करण्यात आले. वीजपुरवठा नसल्याने कामकाज बंद पडण्याची हि पहिलीच वेळ असल्याने सरकारची चांगलीच नाचक्की झाली आहे असा सूर विरोधकांनी लावला.
7 वर्षांपूर्वी -
सिडको जमीन व्यवहार प्रकरणी मुख्यमंत्र्यांची न्यायालयीन चौकशीची घोषणा
अधिवेशनापूर्वी सिडको येथील जमीन व्यवहार प्रकरणी विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्या आरोपांना आज मुख्यमंत्र्यांनी सुद्धा जोरदार उत्तर दिल. मुख्यमंत्र्यांनी काही स्पष्टीकरण देऊन थेट न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा आज अधिवेशनात केली.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
TCS Share Price | टाटा ग्रुपचा शेअर मालामाल करणार, केव्हाही बिनधास्त करावा असा शेअर - NSE: TCS
-
Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY
-
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
-
Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Infosys Share Price | आयटी शेअरबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा जाणून घ्या - NSE: INFY
-
BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये तेजीचे संकेत; मिळेल मजबूत परतावा - NSE: ADANIPOWER
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH