महत्वाच्या बातम्या
-
५ दिवसांचा आठवडा मग पगार ७ दिवसांचा का? मंत्री बच्चू कडू
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 5 दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयानंतर एकीकडे कर्मचारी आनंद व्यक्त करत असतानाच राज्यमंत्री बच्चू कडू यांनी या निर्णयावर निशाणा साधला आहे. ‘पाच दिवसांचा आठवडा मग कर्मचाऱ्यांना 7 दिवसांचा पगार का द्यायचा?’ असा सवाल बच्चू कडू यांनी केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रातील कॉलेजमध्ये १९ फेब्रुवारीपासून राष्ट्रगीत सक्तीचे
महाराष्ट्रातील महाविद्यालयामध्ये राष्ट्रगीत अनिवार्य करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र सरकारच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या मंत्रालयाने याबाबत निर्णय घेतला आहे. १९ फेब्रुवारीपासून सर्व महाविद्यालयांना हा आदेश लागू होणार आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी बुधवारी यासंदर्भात माहिती दिली. या नियमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभावना निर्माण होण्यास मदत होईल, असेही सामंत यांनी म्हटले आहे.
5 वर्षांपूर्वी -
शिवसेनेने लोकसंख्या नियंत्रणावरून खासगी विधेयक राज्यसभेत मांडले; काय आहे त्यात?
शिवसेनेने लोकसंख्या नियंत्रणाचा मुद्दा हाती घेतला असून लोकसंख्या नियंत्रणाबाबतचे एक खासगी विधेयक आणले आहे. शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी हे खासगी विधेयक राज्यसभेत मांडले आहे. ज्यांना दोन अपत्ये आहेत अशांनाच नोकरी आणि शिक्षणात सवलत द्यावी अशी तरतूद या विधेकात करण्यात आली आहे. हे विधेयक मंजूर झाल्यास देशातील कुटुंब नियोजन पद्धतीला शिस्त लागेल, असे खासदार देसाई यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
5 वर्षांपूर्वी -
केजरीवालांनी मतदाराला गंडवले नाही; शिवसेनेचा मोदी-शहांना टोला
आपण तेवढेच देशप्रेमी आणि आपल्याला विरोध करणारे आणि इतर सर्व देशद्रोही हा काहींच्या मनातील भ्रमाचा भोपळा ही दिल्लीकर मतदारांनी फोडला आहे, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील विधानसभा निवडणूक निकालावरुन भाजपला हाणले आहे. एका निवेदनात ठाकरे यांनी अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात आम आदमी पार्टीने मिळविलेल्या जबरदस्त यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.
5 वर्षांपूर्वी -
शिवसेना हीच राष्ट्रवादी काँग्रेसची 'बी टीम' झाली आहे; मनसेचा टोला
सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक सूची (एनआरसी) यावरून देशभरात प्रचंड वादंग सुरू असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बांगलादेशी, पाकिस्तानी घुसखोरांना देशाबाहेर हाकलण्याची भूमिका घेतली आहे. घुसखोरांविरोधात मनसेच्या वतीनं महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. मरिन लाइन्स येथील हिंदू जिमखाना येथून मोर्चाला सुरूवात होत असून, आझाद मैदानात राज ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
कर्जमाफी बुजगावणं वाटत असेल तर बच्चू कडूंनी सरकारमधून बाहेर पडावे: अब्दुल सत्तार
दोन लाखांची कर्जमाफी हे बुजगावणं आहे, असं वक्तव्य महाविकास आघाडी सरकारचे राज्य मंत्री बच्चू यांनी केलं होते. पुण्याच्या आळंदी येथे वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली होती. तेव्हा ते पत्रकारांशी संवाद साधला होता. तूर डाळीला हमीभाव देणं आणि ते जाहीर करणं हे केंद्र सरकारच्या हातात आहे. पण केंद्र ते काम करत नाही अशी खंत बच्चू कडू यांनी केंद्र सरकारवर आसूड ओढले होते. पुढे त्यांनी शेतकऱ्यांना २ लाखाची दिलेली कर्जमाफी ही बुजगावणं असल्याचं म्हणत आपल्याच महाविकास आघाडी सरकारवर प्रश्न उपस्थित केले होते.
5 वर्षांपूर्वी -
छेडछाड निंदनीय पण मानसी नाईकने युवासेनेच्या कार्यकर्त्यांचे नाव घेतले नाही: वरुण सरदेसाई
मराठी चित्रपट सृष्टीतील डान्सिंग क्वीन म्हणूनपरिचित असलेल्या अभिनेत्रीसोबत छेडछाड झाल्याचं संतापजनक वृत्त समोर आलं. या प्रकरणी मुंबईतील साकीनाका पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचं वृत्त पसरलं.
5 वर्षांपूर्वी -
युवासेना जिल्हा प्रमुखाच्या कार्यक्रमात मराठी अभिनेत्रीसोबत अज्ञाताकडून गैरवर्तन; तक्रार दाखल
मराठी चित्रपट सृष्टीतील डान्सिंग क्वीन म्हणूनपरिचित असलेल्या अभिनेत्रीसोबत छेडछाड झाल्याचं संतापजनक वृत्त आहे. या प्रकरणी मुंबईतील साकीनाका पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचं वृत्त आहे.
5 वर्षांपूर्वी -
मध्य प्रदेश सरकारकडून सीएए विरोधातील ठराव मंजूर; राज्यात सेनेच्या अडचणीत वाढ?
देशात यापूर्वी केरळ, पंजाब, राजस्थान आणि पश्चिम बंगाल या राज्यांनी CAA रद्द करण्यात यावा यासाठी ठराव संमत केला होता. आता मध्य प्रदेशच्या मंत्रिमंडळाने देखील CAA विरोधात ठराव संमत केला आहे. हा कायदा भारतीय राज्यघटनेच्या धर्मनिरपेक्ष चौकटीला छेद देणारा आहे. म्हणून हा कायदा लवकरात लवकर रद्द करण्याची मागणी मध्य प्रदेशने ठरावाच्या माध्यमातून केली आहे. तत्पूर्वी काही सामनाच्या मुलाखतीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी देखील याबाबत आपली भूमिका मांडली आहे आणि त्यात सीएए कायद्याच समर्थन करताना NRC’ला विरोध दर्शविला होता.
5 वर्षांपूर्वी -
पिंक सिटी जयपूर नाही; हे आहेत शिवसेनेची सत्ता असलेल्या प्रदूषित डोंबिवलीचे रस्ते
रासायनिक कंपन्यांच्या प्रदूषणामुळे डोंबिवली शहर नेहमीच चर्चेत असते. परंतु, मंगळवारी एमआयडीसी’तील फेज २ मधील एक रस्त्यावर रासायनिक पदार्थ सांडल्याने तो गुलाबी, लाल रंगाचा झाल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी उग्र दर्प येत असल्याच्या तसेच डोळे चुरचुरणे यासारखा त्रास झाल्याच्या तक्रारी केल्या. दरम्यान, हे प्रदूषण नसल्याचा दावा कारखानदारांच्या ‘कामा’ संघटनेने केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न द्या! प्रवीण तोगडियांची जाहीर मागणी
दिवगंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याची मागणी हिंदुत्ववादी नेते प्रवीण तोगाडिया यांनी केली आहे. राम मंदिर आंदोलनात बाळासाहेब ठाकरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे त्यांना सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे अशी मागणी तोगडियांनी केली.
5 वर्षांपूर्वी -
हिंदू निर्वासितांच्या मुद्द्याआड मुख्यमंत्र्यांचं CAA समर्थन; महाविकास आघाडीत बिघाडी होणार? सविस्तर वृत्त
सध्या देशभर CAA वरून आंदोलनं पेटलेली असताना आणि काँग्रेससहित अनेक पक्ष त्या कायद्याला विरोध करत असताना शिवसेनेने वेगळी भूमिका घेतल्याचे काँग्रेस नाराज होण्याची दाट शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा हा एकप्रकारे काँग्रेसला धक्का असल्याचं मानलं जातं आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेकडे काँग्रेस कसं पाहणार ते पाहावं लागणार आहे. कारण CAA अंतर्गत बाहेरील निर्वासित हिंदूंना भारतात नागरिकत्व देणार असल्याने शिवसेनेने स्वतःचा स्वार्थ साधला असून, देशभरातील मुस्लिम समाजाची आणि आंदोलकांच्या भावना दुखावण्याची शक्यता नाकारता येत नाही असं राजकीय तज्ज्ञांना वाटतं. कदाचित हाच संदेश दिल्ली दरबारी पोहोचेल आणि यावरून भाजप देखील शिवसेनेला राजकीय कोंडीत पकडेल अशी शक्यता आहे.
5 वर्षांपूर्वी -
यवतमाळ विधानपरिषद पोटनिवडणुकीत भाजपला धक्का, शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी विजयी
यवतमाळ विधानपरिषद पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाला धक्का बसला आहे. शिवसेनेच्या तिकीटावर रिंगणात उतरलेले महाविकास आघाडीचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी विजयी झाले आहेत, तर भारतीय जनता पक्षाच्या सुमित बाजोरिया यांना पराभवाचा धक्का बसला आहे.
5 वर्षांपूर्वी -
शिवभोजन थाळीमुळे तिजोरीवर भार वाढला; त्यामुळे १ रुपयात आरोग्य तपासणीला ग्रहण
गरीब आणि गरजूंना फक्त १० रुपयांत जेवणाची थाळी देणाऱ्या ‘शिवभोजन’ योजनेची २६ जानेवारीपासून राज्यभरात अंमलबजावणी झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या योजनेचा आज आढावा घेतला होता आणि त्यानंतर या योजनेच्या अंमलबजावणीचे निर्देश दिले होते.
5 वर्षांपूर्वी -
शिवसेनेचे नाराज आमदार तानाजी सावंत अखेर मातोश्रीवर
शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट घेतली. तसेच राज्य मंत्रिमंडळ विस्तारानंतर कोणतेच पद न मिळाल्याने जिल्हा संपर्कप्रमुख आमदार डॉ.तानाजी सावंत हे नाराज होते.
5 वर्षांपूर्वी -
मागच्या काळात सुद्धा फोन टॅपिंगचे प्रकार घडले, ती एक रणनीती असते: मंत्री गुलाबराव पाटील
भाजप सत्तेत असताना विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार, खा. संजय राऊत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक नेत्यांचे फोन टॅप करण्याचे व त्यांचे व्हॉट्सअॅप मेसेज वाचणारे तंत्र इस्रायलवरून मागवण्यात आले. त्यासाठी एका आयपीएस अधिकाऱ्यास काही वेळा इस्रायलला पाठवण्यात आले, अशी माहिती आल्याने याची चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
हिंदुत्वाच्या राज'मार्गामुळे सेनेचा थयथयाट? राज यांना थेट सामना'च्या अग्रलेखात स्थान
राज ठाकरे यांनी शिवसेनेशी फारकत घेऊन मनसेची स्थापना केल्यापासून राज ठाकरे आणि मनसेला सामाना वृत्तपत्रात स्थानच नव्हतं. अगदीच राज ठाकरेंच्या मनसेची एखादी बातमी आलीच तरी त्या बातमीला एखादा कोपराच मिळत असे. मात्र ज्यावर आजपर्यंत राजकारण केलं तो हिंदुत्वाचा मुद्दा आणि महाविकास आघाडीत सरकारमध्ये झालेली हिंदुत्वाच्या मुद्द्याची कोंडी यामुळे शिवसेना पेचात अडकली आहे. त्यामुळे बदलत्या राजकीय समीकरणामुळे कोंडी झाली असताना राज ठाकरे यांनी हिंदुत्वाला हात घालताच शिवसेनेच्या जळफळाटाने मनसे आणि राज ठाकरे यांना थाट सामनाच्या अग्रलेखात स्थान दिल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून शिवसेनेची या मुद्यावरून किती कोंडी झाली आहे याचा प्रत्यय येऊ लागला आहे.
5 वर्षांपूर्वी -
भीमा-कोरेगाव - माजी गृहराज्य मंत्र्यांनी पवारांचा दावा फेटाळला; सेना-राष्ट्रवादीत एकवाक्यता नाही
भीमा कोरेगाववरुन महाविकास आघाडीतले दोन पक्ष आमनेसामने आलेले पाहायला मिळत आहेत. भीमा कोरेगाव प्रकरण तत्कालीन सरकारनं पोलिसांच्या मदतीनं घडवलेलं षडयंत्र असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी केला. या प्रकरणाची एसआयटीद्वारे चौकशी करण्याची मागणीदेखील त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली. मात्र या प्रकरणातले पुरावे पोलिसांनी खातरजमा करुनच दाखल केलेले असून ते न्यायालयानंदेखील मान्य केलेले आहेत, अशी भूमिका तत्कालीन गृहराज्यमंत्री आणि शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी मांडली आहे. त्यामुळे भीमा कोरेगाववरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन सत्ताधारी पक्षांमध्ये एकवाक्यता नसल्याचं समोर आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरे, शरद पवार, संजय राऊत यांचे फोन टॅपिंग प्रकरण; सरकारकडून चौकशीचे आदेश
भारतीय जनता पक्षाच्या माजी ज्येष्ठ मंत्र्याने माझा फोन टॅप होत असल्याचं सांगितलं होतं, असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. फडणवीस सरकारने आपल्या काळात तत्कालीन विरोधी पक्षातील नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप झाल्यानंतर राऊतांनी ट्विटरवरुन हा दावा केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
भाजपच्या चेहऱ्यावरचे मुखवटे संपता संपत नाही; शिवसेनेची टीका
भारतीय जनता पक्षाच्या चेहऱ्यावरचे मुखवटे संपता संपत नाहीत, असं म्हणत शिवसेनेनं पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. शिवसेनेचा खरा चेहरा कोणता यावर महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाने संशोधन सुरू केले आहे. संशोधन म्हणण्यापेक्षा पुरातत्व विभागाचे उत्खनन म्हणणे सोयीचे ठरेल, असं म्हणत शिवसेनेनं भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल केला. २०१४ मध्ये सत्तास्थापनेसाठी शिवसेनेने काँग्रेसशी संपर्क साधला होता, असा दावा काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. त्यानंतर भारतीय जनता पक्षाने शिवसेनेवर निशाणा साधला होता.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN