3 May 2025 1:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

आर्थिक अडचणींमुळे कुटुंबीयांची आणि राज ठाकरेंची माफी मागत शहराध्यक्षाची आत्महत्या

Rajsaheb forgive me, MNS City President commits suicide, Nanded Kinvat

नांदेड , १६ ऑगस्ट : अखेरचा जय महाराष्ट्र म्हणत मनसेच्या किनवट शहराध्यक्ष सुनील ईरावार यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने मनसेत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सुनील ईरावार हे नांदेड जिल्ह्यातील किनवट शहराध्यक्ष आहेत. आर्थिक अडचणींमुळे राहत्या घरात आत्महत्या केल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. राजकारणात जात आणि पैसे दोन्ही गोष्टी लागतात, माझ्याकडे यापैकी काहीच नाही असं त्याने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.

रविवारी सकाळी सुनील ईरावार यांनी राहत्या घरात गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. जातीपातीचं राजकारण आणि आर्थिक उलाढाल या राजकारणात सर्वसामान्य प्रामाणिक कार्यकर्त्यांची गोची होत असल्याचं या प्रकरणातून समोर आलं आहे.

सुनील याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, अखेरचा जय महाराष्ट्र, राज साहेब मला माफ करा. आमच्या येथे पैसा आणि जात या दोन गोष्टीवर राजकारण आहे. दोन्ही माझ्या जवळ नाही.”जय महाराष्ट्र..जय राज साहेब..जय मनसे अशी सुसाईड नोट लिहून त्यांनी आत्महत्या केली आहे. या नोटमध्ये त्याने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची माफी मागितली.

‘अखेरचा जय महाराष्ट्र’

यापुढे राजकारण करण्यासाठी माझी आर्थिक परिस्थिती कमजोर असल्यामुळे मी माझे पुढील माझ्या मर्जीप्रमाणे संपवत आहे. तरी माझ्यामुळे कुणालाच त्रास देऊ नका.

राजसाहेब, मला माफ करा. आमच्या इथं पैसे आणि जात या दोन गोष्टींवर राजकारण आहे आणि दोन्हीही माझ्याजवळ नाही.

जय महाराष्ट्र, जय राजसाहेब, जय मनसे

आई, पप्पा, काका, काकू, मोठी वहिणी, छोटी वहिणी, शिवादादा, शंकरदादा, पप्पूदादा, मला माहिती आहे मी माफ करण्याचा लायकीचा नाही, तरी तुम्ही मला सर्वजण मला माफ करशाल अशी आशा बाळगतो.

आई मला माफ करं,

तुझाच सुनिल

 

News English Summary: MNS party Kinwat city president Sunil Irawar committed suicide by hanging himself. Sunil Irawar is the Kinwat city president of Nanded district. Many have expressed frustration with committing suicide at home due to financial difficulties.

News English Title: Rajsaheb forgive me! MNS City President commits suicide by writing suicide note in Nanded Kinvat News latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या