11 May 2025 11:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

कर्नाटक विधानसभेत काँग्रेसच मोठा पक्ष बनेल - संजय राऊत

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीबाबत बोलताना निवडणुकीनंतर कर्नाटकमध्ये काँग्रेस नंबर एकचा पक्ष बनेल असं ठाम विश्वास व्यक्तं केला आहे.

केंद्र सरकारवर गंभीर आरोप करताना संजय राऊत म्हणाले की, भाजपने कर्नाटक विधानसभेसाठी केंद्रातील सर्व यंत्रणा कामाला लावल्या आहेत असं सांगितलं. पुढे स्वतंत्र निवडणुका लढविण्याच्या मुद्याला धरून बोलताना राऊत म्हणाले की, राज्यात विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपबरोबर युती झाली याचा अर्थ २०१९ लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी सुद्धा भाजप बरोबर युती होईल असा कोणी सुद्धा अर्थ काढू नये अस खासदार संजय राऊतांनी स्पष्ट केलं.

भाजपवर आरोप करताना पुढे संजय राऊत पुढे म्हणाले की, विधानसभा निवडणुकी दरम्यान भाजपकडून देशातील आणि इतर राज्यातील प्रशासन वाऱ्यावर सोडले जाते. निवडणुकीसाठी केंद्राची संपूर्ण यंत्रणा, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री प्रचारात कामाला लागतात आणि हे चित्र देशातील प्रत्येक जण पाहत आहे. उत्तर प्रदेशात धूळवादळाचे संकट आलेले असताना तिथले मुख्यमंत्री आदित्यनाथ कर्नाटकच्या प्रचारात मग्न होते असं संजय राऊत म्हणाले.

शिवसेनेला २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळेल आणि पुढचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल असा ठाम विश्वास संजय राऊत यांनी बोलताना व्यक्त केला.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या