9 May 2025 5:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

जनहिताच्या बांधकामात दिरंगाईमुळे कंत्राटदार व अभियंत्याला चोप, मनसे नगरसेवक संजय तुर्डे यांना अटक

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक संजय तुर्डे यांना कुर्ला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर मुंबई महापालिकेचे कंत्राटदार आणि अभियंत्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तशी रीतसर तक्रार संबंधित कंत्राटदार आणि अभियंत्यांनी केल्यामुळे त्यांना अटक झाली आहे.

संजय तुर्डे ज्या वॉर्डच प्रतिनिधित्व करतात त्या विभागातील अनेक जनहिताची कामं करण्यात संबंधित कंत्राटदार आणि अभियंते दिरंगाई करत असल्याने स्थानिकांमध्ये रोष व्यक्त करण्यात येत होता. संबंधितांना वारंवार सूचना देऊनही कानाडोळा करणाऱ्या मुंबई महापालिकेच्या कंत्राटदार आणि अभियंत्याला नगरसेवक संजय तुर्डे यांनी मनसेच्या भाषेत चोख उत्तर दिल.

त्यानंतर संबंधितांनी संजय तुर्डे यांच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार केल्याने तुर्डे यांना पोलिसांनी अटक करण्यात आली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या