19 May 2024 7:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

मोदींनी लोकांच्या घरात डोकावल्यावर त्यांना कळेल की लोकं त्यांना शिव्या घालतात

नाशिक : मोदी सरकारची आता तुमच्या कम्प्युटरमधील प्रत्यके हालचालींवर बारीक नजर असणार आहे. कारण, केंद्रीय गृह मंत्रालयाकडून देशातील तब्बल १० मोठ्या एजन्सींना तुमच्या खासगी कम्प्युटरवर थेट नजर ठेवण्यासाठी परवानगी बहाल करण्यात आली आहे. या सर्व संबंधित १० एजन्सी एकप्रकारे तुमच्यासाठी गुप्तहेराचेच काम करणार असून त्या केव्हाही तुमच्या खासगी कम्प्युटरमधील माहिती तपासू शकतात.

याच विषयाला अनुसरून जेव्हा नाशिक दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, ‘मोदींना लोकांच्या घरात घुसून पाहायचं असेल तर पाहावं. लोक त्यांना शिव्या घालतात हे तरी कळेल, आधी लोकांचे पैसे काढले आता घरात घुसून पाहणार का?, असा सवाल त्यांनी विचारला.

दरम्यान, जानेवारीत पुन्हा एकदा नाशिकचा दौरा करणार असल्याची माहिती राज ठाकरेंची पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाल्याचे समजते. सध्या भाजपने नाशिकरांची विकासाच्या मुद्यावरून निराशा केली असून राज ठाकरेच बरे होते अशी नाशिककरांची भावना मनसे अध्यक्षांना या दौऱ्यात निर्दशनास आली असावी हे सुद्धा यामधून सूचित होतं आहे. कारण त्यांच्या दौऱ्यात त्यांना मिळणारा प्रतिसाद बरंच काही सांगून जातो आहे.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x