29 April 2024 4:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार? IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, अशी संधी सोडू नका Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करतोय हा शेअर! वेळीच खरेदी करा, मागील 1 वर्षात दिला 1700 टक्के परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, स्टॉक तेजीत येतोय, टार्गेट प्राईस जाणून घ्या Penny Stocks | एक वडापावच्या किमतीत 16 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत करतील श्रीमंत
x

हम तो फकीर आदमी है? भाजप अति-श्रीमंत झाला, तब्बल ४३७ कोटींच्या देणग्या

नवी दिल्ली: देशातील विविध कॉर्पोरेट कंपन्यांकडून भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक मोठ्या प्रमाणावर देणग्या मिळत असल्याची माहिती समोर आली आहे. देशभरातील विविध राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात दिलेल्या अधिकृत माहितीच्या आधारे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सनं अर्थात ‘एडीआर’ ही आकडेवारी सार्वजनिक केली आहे.

मोदी सरकार सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाला तब्बल ४३७ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस, एनसीपी, सीपीआय आणि ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस यांच्या तुलनेत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या देणग्यांचं प्रमाण तब्बल १२ पटीने अधिक असल्याचे सिद्ध होते आहे.

यूपीत भारतीय जनता पक्षाच्या विरोधात सपा’सोबत आघाडी करणाऱ्या मायावतींच्या बसपाला २० हजार रुपयांपेक्षा अधिकची देणगी मिळालेली नाही. तशी अधिकृत माहिती बसपानं निवडणूक आयोगाला लिखित स्वरुपात दिली आहे. देशातील एकूण राष्ट्रीय पक्षांना २० हजारांहून अधिक रकमेच्या एकूण ४,२०१ देणग्या मिळाल्या आहेत. त्यातून प्राप्त झालेली रक्कम ४६९.८९ कोटी इतकी आहे. त्यापैकी तब्बल ४३७.०४ कोटी रुपये एकट्या भारतीय जनता पक्षाला मिळाल्या आहेत. भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या देणग्यांची संख्या २,९७७ इतकी आहे.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या तुलनेत काँग्रेसला मिळालेल्या देणग्यांची एकूण संख्या आणि त्या देणग्यांमधून मिळालेली एकूण रक्कम अतिशय कमी असल्याचे दिसते. काँग्रेसला ७७७ देणग्यांच्या माध्यमातून एकूण २६.६५ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. तसेच देशातील एकूण राष्ट्रीय पक्षांना २०१७-१८ मध्ये कॉर्पोरेट आणि व्यवसाय क्षेत्रातून एकूण १,३६१ देणग्यांमधून ४२२.०४ कोटी रुपये प्राप्त झाले. तर २,७७२ हे वैयक्तिक देणग्यांच्या स्वरुपात म्हणजे ४७.१२ कोटी रुपये मिळाले आहेत. विशेष म्हणजे कॉर्पोरेट कंपन्यांनी सर्वाधिक देणग्या भारतीय जनता पक्षाला दिल्या आहेत. या माध्यमातून भारतीय जनता पक्षाला ४००.२३ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. तर काँग्रेसला केवळ १९.२९ कोटी रुपये मिळाले आहेत असे ही आकडेवारी सांगते.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x