27 April 2024 7:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
x

शिंदे यांनी पुढील काळात वेगळी भूमिका घेतली तर आमचं वेगळे ठरेल | शिंदे गटाचे आपसात इशारे सुरु

Eknath Shinde

Eknath Shinde | शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय कारवाई करणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. अखेर उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेत एकनाथ शिंदेवर मोठी कारवाई केली आहे. एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या सर्व महत्त्वाच्या पदांवरून हकालपट्टी करण्यात आली आहे.

शिंदे यांची शिवसेनेतील सर्व पदावरून हकालपट्टी :
महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाली असली, तरी राजकीय संघर्ष सुरूच आहे. बंडखोर आमदारांना सोबत घेत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांबाबत काय भूमिका घेतली जाईल, असा प्रश्न होता. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांचं नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदेंवर कारवाईचा बडगा उगारला आहे. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची शिवसेनेतील सर्व पदावरून हकालपट्टी केली आहे. पक्षविरोधी कृत्यांमध्ये सहभागी झाल्याचा कारणावरून ही कारवाई करण्यात आली आहे.

दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद :
दरम्यान, शिवसेनेने बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना पक्षनेते पदावरून हटविल्यानंतर दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी शिंदेंना पदावरून दूर करणे बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. आधी आम्ही त्यांना उत्तर देऊ. त्यानंतर त्यांनी भूमिका बदलली नाही, तर आवश्यक ती कायदेशीर कारवाई करू, असा इशारा केसरकर यांनी शिवसेनेला दिला आहे. ते म्हणाले, की शिंदे आता मुख्यमंत्री आहेत. ते आता विधीमंडळाचे नेते झाले आहेत. हे वैधानिक पद आहे. ते कोणा एका पक्षाचे नेते नसतात. त्यामुळे त्याबाबतीत आदर राखलाच पाहिजे. तर दुसरीकडे नेतेपदावरून काढणे, यासारख्या गोष्टी लोकशाहीला शोभादायक नाहीत, असेही ते म्हणाले आहेत.

केसरकारांचा एकनाथ शिंदे यांनाही इशारा :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढील काळात वेगळी काही भूमिका घेतली तर वेगळे ठरेल, असे मोठे विधान शिंदे गटाचे नेते आणि शिवसेनेचे बंडखोर नेते दीपक केसरकर यांनी केले आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे कोणतेही वक्तव्य आहे, तर आम्ही कोणीही त्याला उत्तर देणार नाही. राजकारणापेक्षा भावना महत्त्वाच्या असतात. आत्ता जरी आमची ही भूमिका असली, तरी उद्धव ठाकरे यांच्याविषयी आदर आहे, असे दीपक केसरकर म्हणाले. तर ते आमचे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या कोणत्याही स्टेटमेंटला आम्ही उत्तर देणार नाहीत. याचा अर्थ आमच्याकडे उत्तरे नाहीत, असे नाही. मात्र उद्या एकनाथ शिंदेंनी वेगळी भूमिका घेतली तर ते वेगळे ठरेल, असा अप्रत्यक्ष इशारा त्यांनी शिंदेंना दिल्याचे बोलले जात आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: MLA Deepak Kesarkar warn CM Eknath Shinde check details 02 July 2022.

हॅशटॅग्स

#Eknath Shinde(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x