6 May 2024 12:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | PSU बीएचईएल शेअर्स घसरले, स्टॉक Hold करावा की Sell? तज्ज्ञांनी खुशखबर दिली Suzlon Share Price | शेअर प्राईस 40 रुपये! 4 वर्षात दिला 1623% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईसबाबत मोठी अपडेट SBI Home Loan | SBI कडून 20 वर्षांसाठी गृहकर्ज घ्यायचं आहे का? महिना EMI आणि व्याज किती लागेल जाणून घ्या IPO GMP | IPO आला रे! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, GMP धुमाकूळ घालतेय, संधी सोडू नका Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या
x

शिंदेंच्या गुजरात, गोवा, गुवाहाटी, सागर बंगला ते राजभवनावर भेटी | स्व. बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाकडे फिरकलेच नाही

Eknath Shinde

Eknath Shinde | विधानसभेत आज उद्धव ठाकरे विरूद्ध एकनाथ शिंदे हा पहिला सामना रंगतोय. कारण विधानसभेत अध्यक्षपदाची निवडणूक आज रंगते आहे. राहुल नार्वेकर हे भाजपचे उमेदवार आहेत त्यांना एकनाथ शिंदे यांनी पाठिंबा दिला आहे. तर दुसरीकडे राजन साळवी यांना शिवसेनेचे उमेदवारी दिली आहे. शिवसेनेचे कट्टर नेते म्हणून राजन साळवी ओळखले जातात.

शिवसेनेतून बंडखोरी करून बाहेर पडलेले एकनाथ शिंदे यांनी आज त्यांच्यासोबत आलेल्या आमदारांसाठी व्हीप काढला आहे. या व्हीपमध्ये राहुल नार्वेकर यांना मतदान करावं असं त्यांनी सांगितलं आहे. राज्यात जे बंड झालं त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली. ३९ पेक्षा जास्त आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत.

एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबतच्या बैठकीत काय म्हटलं :
आज खऱ्या अर्थाने भाजप-सेना युतीचं सरकार आलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात वीर सावरकर यांचा अपमान, दाऊद संबंधाचा आरोप झालेल्या मंत्र्याचा बचाव, हे सारे अस्वस्थेचे विषय बनत चालले होते. शिवसेनेचे अधिक नुकसान होतेय हे पाहणे त्रासदायक होते. नेतृत्वाला सांगण्याचे प्रयत्न खूप झाले, पण दुर्देवाने त्यात यश आले नाही, म्हणून आजची स्थिती निर्माण झाली.

शिंदे गुजरात, आसाम नंतर गोवा नंतर मुंबई :
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड केल्यानंतर आपल्यासोबत ४०च्या वरती आमदार घेऊन अगोदर सुरतला गेले. सुरतवरुन एकनाथ शिंदेंच्या गटाने आपला मुक्काम गुवाहटीला हलवला आणि दोन दिवसापासून सर्व आमदार गोव्यामध्ये होते. आज तब्बल १२ दिवसांनंतर सर्व आमदार मुंबईमध्ये आले आहेत. तत्पूर्वी शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ सुद्धा घेतली आणि मागील दोन दिवस ते मुंबईमध्ये आहेत. त्यानंतर ते पुन्हा बंडखोर आमदारांना आणण्यासाठी गोव्याला गेले होते आणि काल पासून पुन्हा मुंबईत आहेत. विशेष म्हणजे अनेक बंडखोर आमदार मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये राज्य भाजपच्या वरिष्ठांचे पाय पकडताना दिसले.

स्व. बाळासाहेबांच्या आणि धर्मवीर आनंद दिघेंच्या नावाचा राजकारणासाठी वापर :
एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडात त्यांनी त्यांनी अनेक दिवस घेतले. त्यात त्यांनी सर्वाधिक वापर हा स्व. बाळासाहेब ठाकरे आणि स्व. आनंद दिघे यांच्या नावाचा केल्याचं पाहायला मिळतंय. अनेक दिवस ते मुंबईत आहे आणि अनेक भेटी गाठी सुद्धा घेत आहेत. मात्र आज पर्यंत ते स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाकडे आणि आनंद दिघे आश्रमाकडे फिरकले देखील नाहीत आणि त्याची मराठी माणसामध्ये जोरदार चर्चा रंगली आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Chief Minister Eknath Shinde political stand against Shivsena check details 03 July 2022.

हॅशटॅग्स

#Eknath Shinde(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x