27 April 2024 5:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

लोकसभा: उत्तर पश्चिम मुंबईतून इच्छुक संजय निरुपम यांना स्थानिक कार्यकर्त्यांचा तीव्र विरोध?

मुंबई : लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतशी मुंबई काँग्रेसमध्ये सुद्धा जोरदार हालचाली सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यात आता उत्तर पश्चिम मुंबईतून संजय निरुपम सुद्धा उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे वृत्त आहे.

संजय निरुपम यांच्या जुन्या लोकसभा मतदारसंघातून लढविण्यापेक्षा ते स्वतःसाठी नवख्या आणि काही प्रमाणात भरवशाच्या उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक असल्याचे काँग्रेसच्या अंतर्गत गोटातून समजते. परंतु, त्यांना उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील आणि विशेष करून अंधेरी पूर्वेतील काँग्रेस कार्यकर्त्यांचा तसेच पदाधिकाऱ्यांचा तीव्र विरोध आहे. या मतदारसंघात काँग्रेसचा मोठ्या प्रमाणावर पारंपरिक मतदार असून येथे राज्याचे माजी आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी यांचे कार्यक्षेत्र असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांचा कल हा माजी आमदार आणि मंत्री राहिलेले सुरेश शेट्टी यांच्या बाजूने असल्याचे दिसते.

त्यांच्या सध्याच्या मतदारसंघातील उत्तर भारतीय मतदारपेटी सुद्धा शिवसेना आणि भाजपच्या गळाला लागली आहे. तसेच याच मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर गुजराती आणि जैन मतदार असल्याने संजय निरुपम यांचा प्रवास खडतर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांनी मोर्चा उत्तर पश्चिम मुंबईच्या लोकसभा मतदारसंघावर वळवला आहे. परंतु इथल्या स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांचा त्यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध आहे. तसेच दिवंगत काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांच्या जुन्या कार्यकर्त्यांचं सूत संजय निरुपम यांच्यासोबत जुळणे सुद्धा फार कठीण आहे.

त्यात अंधेरी पूर्वेतील संजय निरुपम यांचे कट्टर समर्थक माजी नगरसेवक कमलेश राय यांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी कॉग्रेसला राम राम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला आहे आणि सध्या त्यांच्या पत्नी येथून काँग्रेसच्या नगरसेविका आहेत. त्यात अंधेरी पूर्वेला एकेकाळी सुरेश शेट्टी यांचे विश्वासू असलेले आणि सध्या भाजप’मध्ये असलेले कार्यसम्राट नगरसेवक मुरजी पटेल यांनी त्यांच्या जीवन ज्योत प्रतिष्ठान या समाजसेवी संस्थेच्या मार्फत अंधेरी पूर्वेतील जनमानसात चांगली पकड निर्माण केली आहे. त्यामुळे अंधेरी पूर्वेत शिवसेनेला आणि काँग्रेसला सुद्धा तगडं आवाहन देणारे मुरजी पटेल हे भाजपचे विद्यमान नगरसेवक आहेत, तर त्यांच्या पत्नी केसरबेन पटेल सुद्धा याच मतदारसंघातून नगरसेविका आहेत. असं इथलं राजकीय समीकरण असताना काँग्रेससाठी इथली व्होटबँक राखणे साधे सोपे नाही. त्यामुळे स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांची सुरेश शेट्टी यांच्या नावालाच अधिक पसंती आहे असे समजते. त्यामुळे पुढे संजय निरुपम यांच्याबाबतीत काय होणार ते पाहावं लागणार आहे.

हॅशटॅग्स

#Congress(527)#SanjayNirupam(12)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x