26 April 2024 9:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

काँग्रेसचे माजी आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी उत्तर मध्य मुंबईतून लोकसभेच्या रिंगणात?

मुंबई : लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतशी मुंबई काँग्रेसमध्ये सुद्धा जोरदार हालचाली सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे उत्तर मध्य मुंबईची आगामी लोकसभा निवडणूक प्रिया दत्त लढणार नसल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. परंतु, त्यांच्या जागी आता स्वच्छ प्रतिमेचे राज्याचे माजी आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी ही निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.

यापूर्वी ते ३ वेळा विधासभेवर निवडून गेले आहेत, तसेच अनेक वेळा राज्यात मंत्रिपद सुद्धा भूषवलं आहे. दरम्यान, काँग्रेसच्या काळात राज्याचे आरोग्यमंत्री असताना राजीव गांधी आरोग्य योजना आणि १०८ ही आरोग्यविषयक योजना, त्यांच्याच काळात अमलात आणली गेली होती आणि यशस्वी सुद्धा झाली होती. तसेच दिल्लीच्या राजकारण्यांचा त्यांच्यावर चांगला वरदहस्त आहे, त्यामुळे त्यांना जास्त विरोध होण्याची शक्यता नाही.

विशेष म्हणजे त्यांचे दिवंगत खासदार सुनील दत्त यांच्यासोबत सुद्धा सलोख्याचे संबंध होते आणि आता माजी खासदार प्रिया दत्त यांच्यासोबत सुद्धा चांगले राजकीय संबंध आहेत. तसेच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबत सुद्धा मैत्रीपूर्ण संबध लपून राहिलेले नाहीत. त्यामुळे सुरेश शेट्टी मोदी लाटेत खासदारकीची लॉटरी लागलेल्या भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा मार्ग खडतर झाला आहे असच म्हणावं लागेल. काँग्रेसमधील त्यांचा ४० वर्षांचा अनुभव आणि या मतदारसंघाचा अभ्यास त्यांच्या पथ्यावर पडू शकतो असं समीकरण आहे.

सर्वात जमेची बाजू म्हणजे या मतदारसंघात काँग्रेसचा मोठ्या प्रमाणावर पारंपरिक मतदार आहे. दुसरं म्हणजे ऑक्टोंबर महिन्यात प्रिया दत्त यांनी अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सचिवपदाचा राजीनामा दिला. परंतु त्यांनी राहुल गांधींची भेट घेऊन काँग्रेसच्या संभाव्य उमेदवाराला संपूर्ण ताकदीनिशी सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघातून कृपाशंकर सिंग आणि नगमा सुद्धा उमेदवारीसाठी प्रयत्न करत असल्याचे वृत्त आहे. परंतु, कृपाशंकर सिंग यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप आहेत आणि नगमा यांच्यापेक्षा सुरेश शेट्टी हे अनुभवी तसेच दिल्लीश्वरांच्या अधिक जवळचे आहेत. त्यामुळे हा मार्ग सध्या तरी सुरेश शेट्टी यांच्यासाठी अधिक सुखकर असल्याचे समजते.

त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबईमधून मिलिंद देवरा, उत्तर मध्य मुंबईतून सुरेश शेट्टी आणि उत्तर पश्चिम मुंबईतून संजय निरुपम यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे अखेरच्या क्षणी नक्की कोणाला उमेदवारी मिळणार ते पाहावं लागणार आहे, कारण सर्वच पक्ष निवडणून येतील अशाच उमेदवारांना तिकीट देण्याच्या मनस्थितीत सध्या तरी दिसत आहेत.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x