13 May 2024 4:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Patel Engineering Share Price | 55 रुपयाचा शेअर 99 रुपयांवर जाणार, यापूर्वी 342 टक्के मल्टिबॅगर परतावा दिला Gold Rate Today | गुड-न्यूज! आज पुन्हा सोन्याचा भाव मजबूत घसरला, तुमच्या शहरातील नवे दर पटापट तपासून घ्या Multibagger Stocks | रॉकेट स्पीडने परतावा देणारे टॉप 10 शेअर्स, प्रतिदिन 5 ते 10 टक्के परतावा मिळतोय IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागून मिळेल 151% परतावा, संधी सोडू नका Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, अल्पावधीत तगडा परतावा मिळेल Alok Industries Share Price | चिंता वाढली! शेअर 39 रुपयांवरून घसरून 25 रुपयांवर आला, स्टॉक Hold करावा की Sell? Income Tax Refund | नोकरदारांनो! तुम्हाला ITR रिफंड कधी मिळणार? पैसे लवकर मिळतील, महत्वाची माहिती जाणून घ्या
x

कडवट दाक्षिणात्य नेते | महाराष्ट्रासारखं तेलंगानामध्ये सरकार पाडून दाखवा | मग मी मोदी सरकारच पाडून दाखवतो - मुख्यमंत्री केसीआर

TRS Telangana government

Telangana KCR Government | महाराष्ट्रात गेल्या आठवडाभरापासून वेगवान राजकीय घडामोडी घडल्या आहेत. महाविकास आघाडी सरकार पायउतार होऊन भाजपाच्या पाठिंब्यानं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आहे. राज्यातील या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक हैदराबादमध्ये आयोजित करण्यात आली होती. या बैठकीची औपचारिक सुरूवात काल (शनिवार) झाली होती. बैठकीच्या दिवशी बैठकीच्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांची सर्वाधिक चर्चा होती. त्याचं कारण होतं अमित शाहा यांनी शेवटच्या क्षणी केलेला राजकीय खेळ आणि त्यानंतर फडणवीस समर्थकांमध्ये उमटलेले पडसाद.

भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची तब्बल 18 वर्षांनी हैदराबादमध्ये बैठक होत आहे. या बैठकीच्या नंतर विजय जनसंकल्प सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होण्याची दाट शक्यता आहे. भाजपाने कर्नाटकनंतर तेलंगणा या दक्षिण भारतामधील राज्यावर आपले लक्ष केंद्रीत केले आहे.

तेलंगणात सुद्धा एमआयएम’च्या माध्यमातून हिंदू-मुस्लिम द्वेष पेरणारी?
हैदराबाद हा AIMM चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांचा बालेकिल्ला आहे. या बैठकीच्या निमित्तानं ओवेसी तसंच तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांना घेरण्याचा भाजपाचा प्रयत्न असेल. भाजपाच्या या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथसह प्रमुख नेते उपस्थित राहाणार आहेत.

तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्याकडून हल्लाबोल :
तेलंगणा राष्ट्र समितीचे प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी आमचे 104 आमदार आहेत आणि भाजप म्हणत आहे की ते महाराष्ट्राप्रमाणे सरकार पाडू शकते. त्यावर बोलताना केसीआर म्हणाले की, भाजपला माझे आव्हान आहे, त्यांनी एकदा हा प्रयत्न करून पाहावा, त्यानंतर आमची ताकद बघा आम्ही थेट दिल्लीतील तुमचे सरकार पाडू शकतो असंही त्यांनी मत व्यक्त केले आहे.

जनतेच्या हिताची कोणतीही कामं मोदी करत नाहीत :
भाजपवर टीका करताना केसीआर एवढ्यावरच थांबले नाहीत त्या पुढे जाऊन ते म्हणाले की, पंतप्रधान पदावर असतानाही तुमच्याकडून एकही चांगले आणि हिताचे काम झाले नाही. जनतेच्या हिताची कोणतीही हिताची कामं करण्यात आली नाहीत. कर भरा म्हणून सांगून तुम्ही 30 हजार कोटीची रक्कम तुम्ही घशात घातली. सगळे जग आपल्या देशाला महात्मा गांधींचा भारत म्हणून ओळखतात, तर तुम्ही मात्र महात्मा गांधींचा जेवढा अपमान करायचा आहे तेवढा अपमान करता.

पंतप्रधान खोटे बोलत आहेत :
हैदराबादमध्ये होणाऱ्या पीएम मोदींच्या जाहीर सभेबाबत ते म्हणाले की, तुमच्या उद्योगपती मित्राला श्रीलंकेत व्यवसायाची संधी मिळवून देण्यासाठी तुम्ही काय केले तेही तुम्ही सांगा. त्यानंतर टीआरएस प्रमुख केसीआर म्हणाले की, पंतप्रधान खोटे बोलत आहेत. काळा पैसा आणण्याबाबत ते बोलत होते. काळा पैसा एक रुपयाही आला नाही, उलट तो दुप्पट झाला. असे आकडे सांगत आहेत. 15 लाख देण्याची चर्चा झाली मात्र 15 पैसेही आले.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: TRS Telangana government KCR warn Modi government check details 03 July 2022.

हॅशटॅग्स

#TRS(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x