6 May 2024 6:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Federal Bank Share Price | टॉप बोकरेज फर्मचा फेडरल बँक शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढे मिळेल मोठा परतावा Ashirwad Capital Share Price | फ्री बोनस शेअर्स मिळवा! स्टॉक प्राईस 5 रुपये, पेनी शेअरची धडाधड खरेदी सुरु Adani Port Share Price | कंपनीकडून एक बातमी आली अदानी पोर्ट्स शेअर्स सुसाट वाढीचे संकेत मिळाले, फायदा घेणार? Rhetan TMT Share Price | 12 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल, 2 दिवसात दिला 30 टक्के परतावा, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 07 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरून 12 रुपयांवर, तज्ज्ञांचा मोठा इशारा, फायदा की नुकसान? Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

राज्यातील निवडणुकीपूर्वी इन्कमटॅक्स विभाग कामाला लागला? | सुरतेहून परत येणाऱ्या शिवसेना आमदाराच्या नातेवाईकांच्या घरी धाडी

Income tax

Income Tax Raided | गुरुवारी पहाटेपासून सोलापूर जिल्ह्यातील उद्योजक आणि साखर कारखानदारांच्या व्यवसायावर इनकम टॅक्स विभागाच्या धाडी सुरु आहेत.पंढरपूर मधील साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या उस्मानाबाद येथील साखर करण्यासह पंढरपूर येथील ऑफिस व घरी इन्कम टॅक्स पुणे विभागाचे अधिकारी दाखल झाले असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे. पहाटेपासून ही कारवाई सुरु आहे.

अभिजित पाटील पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादीच्या भालके गटाला धक्का देत 21 पैकी 20 जागा जिंकल्यानंतर ते प्रकाशझोतात आले होते.विठ्ठल सहकारी व धाराशिव कारखाना चेअरमन आहेत.त्यांच्या ताब्यात 5 कारखाने आहेत. त्यात विठ्ठल सहकारी साखर कारखाना, सांगोला सहकारी साखर कारखाना, नाशिक व नांदेड येथे एक, धाराशिव असे साखर कारखाने आहेत.

अभिजीत पाटील चेअरमन असलेल्या कारखान्यावर धाडी पडल्याची प्राथमिक माहिती आहे. अभिजीत पाटील हे पंढरपूर येथील असून ते साखर सम्राट म्हणून गेल्या 10 वर्षात ओळखले जात आहेत. पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादीच्या भालके गटाला धक्का देत 21 पैकी 20 जागा जिंकल्यानंतर ते प्रकाशझोतात आले होते. विठ्ठल सहकारी व धाराशिव कारखाना चेअरमन आहेत.त्यांच्या ताब्यात 5 कारखाने आहेत त्यात विठ्ठल सहकारी साखर कारखाना, सांगोला सहकारी साखर कारखाना, नाशिक व नांदेड येथे एक, धाराशिव असे साखर कारखाने आहेत.

शिवसेना आमदार कैलास पाटलांचे भाचे :
कळंब-उस्मानाबाद मतदारसंघाचे शिवसेना आमदार कैलास पाटील हे नात्याने अभिजित पाटील यांचे मामा लागतात. कैलास पाटील यांनी सुरतेहून परत येऊन उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार असल्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्याच भाच्याच्या उद्योगांवर आयकर विभागाच्या कारवाईने वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत.

आज गुरुवारी पहाटेच कृषी अभ्यास शिबीर 24 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट असा बोर्ड लावून आयकर विभागाची गाडी धाराशिव साखर कारखाना येथे धाड टाकण्यासाठी आली आहे.. या गाडीवर लागलेल्या बोर्डनुसार 30 ऑगस्टपर्यंत हा आयकर विभागाचा अभ्यास दौरा सुरु राहणार आहे. 5 गाड्यात जवळपास 20 च्या वर अधिकारी हे पाटील यांच्या विविध संस्थाची चौकशी करीत आहेत. यात पुणे व दिल्ली येथील काही अधिकारी यांचा समावेश आहे. जालना येथे आयकर विभागाचे अधिकारी यांनी राहुल वेड्स अंजली असे स्टिकर गाडीला लावून धाड टाकण्यासाठी आले होते… आता उस्मानाबाद येथे कृषी अभ्यास शिबिराचा फंडा वापरला असल्याचे दिसते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Income tax department officers raid on Abhijeet Patil Industry check details 25 August 2022.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x