13 May 2024 8:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | PSU RVNL शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, स्टॉकला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, किती फायदा? Bisil Plast Share Price | शेअर प्राईस 3 रुपये! 2 दिवसात 20% परतावा, पैशाचा पाऊस पाडतोय हा स्टॉक Numerology Horoscope | 14 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 14 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर शेअर्स सुसाट तेजीत धावणार, मिळेल 45 टक्के परतावा, फायदा घ्या Patel Engineering Share Price | 55 रुपयाचा शेअर 99 रुपयांवर जाणार, यापूर्वी 342 टक्के मल्टिबॅगर परतावा दिला Gold Rate Today | गुड-न्यूज! आज पुन्हा सोन्याचा भाव मजबूत घसरला, तुमच्या शहरातील नवे दर पटापट तपासून घ्या
x

आम्हीच शिवसेना म्हणणारे शिंदे भाजपच्या नियंत्रणात? | सेनेच्या वाट्याची जागा भाजपच्या विवादित गुजराती उमेदवाराला जाहीर, 40 समर्थकांना इशारा?

Murji Patel

CM Eknath Shinde ​​| मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत उद्योग मंत्री उदय सामंत, मंत्री संदिपान भुमरे, प्रकाश सुर्वे, दादा भुसे असणार आहेत. उदय सामंत सकाळीच दिल्लीला पोहोचले आहेत. त्याला ग्राम पंचायत निवडणुकीतील अपयशाची पाश्वभुमी असल्याचं वृत्त आहे. ४० आमदार आणि १२ खासदार असूनही शिंदे गट आणि शिवसेना यांना मिळालेल्या एकूण जागांमधील फरक हा केवळ ३-४ जागांचा असल्याने चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या जागेसाठी लवकरच पोटनिवडणूक होणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने दावा सांगितला होता, मात्र भाजपने ही जागा हिसकावत शिंदे गटाला धोबीपछाड दिली आहे. भाजपकडून विवादित माजी नगरसेवक मुरजी पटेल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून तशी पोश्टरबाजी मतदारसंघात सुरु झाली आहे. गुजराती उमेदवार मुरजी पटेल यांचे नगरसेवकपद बनावट जात प्रमाणपत्रामुळे रद्द करण्यात आले होते, आता त्यांच्यावर भाजपची भिस्त आहे. या विधानसभा क्षेत्रात अनेक एसआरए प्रकल्प बाधितांचे त्यांच्यावर गंभीर आरोप असून ते त्यांच्या कार्यालयात नेहमी तगादा लावत असताना. इथल्या झोपडपट्टीत त्यांच्याविरोधात अनेकांमध्ये रोष आहे. मुरजी पटेल यांचे आशिष शेलार यांच्यासोबत जवळचे संबंध आहे.

40 समर्थकांसाठी धोक्याची घंटा?
आम्हीच शिवसेना असा दावा करणाऱ्या एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या वाट्याच्या पहिल्याच मतदारसंघावर स्वतःच्या पातळीवर सौदेबाजी केल्याची चर्चा इथल्या शिंदे समर्थकांमध्ये सुरु झाली आहे. तसेच यापढे भाजप शिंदेंच्या गोटातील अनेक जणांच्या आमदारकी तिकीट आयत्यावेळी भाजप नेत्यांना दिली जातील अशी चर्चा या मतदारसंघात शिंदे समर्थकांमध्ये सुरु झाली आहे. अशा विषयांवर शिंदेंचं ऐकलंच जातं नाही नाही असं पदाधिकारी सांगत आहेत. त्यामुळे शिंदे समर्थकांचा भविष्यकाळ आत्ताच दिसू लागला आहे अशी चर्चा आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांची काही दिवसांपूर्वी दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या कुटुंबीयांनी भेट घेतली होती आणि त्यांना पाठीशी असल्याचा विश्वास दिला होता.

कोण आहेत मुरजी पटेल :
भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते. मुरजी पटेल हे भाजपचे माजी नगरसेवक आहेत. मुरजी पटेल यांच्या पत्नी केशरबेन २०१२ मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर नगरसेविका होत्या. २०१५ मध्ये पटेल दाम्पत्याने काँग्रेस सोडून भाजपचा झेंडा हाती धरला. त्यानंतर २०१७ ची महापालिका निवडणूक जिंकली, मात्र २०१८ मध्ये बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणात दोघांचंही नगरसेवक पद रद्द झालं होतं.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप यांची निवडणूकपूर्व युती असल्यामुळे अंधेरी पूर्व मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला. यामुळे नाराज झालेल्या पटेल यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. पटेल यांनी उमेदवारी अर्ज भरताना शक्तीप्रदर्शन केल्यामुळे ही खरंच बंडखोरी आहे की पक्षाच्या संमतीने अपक्ष लढवलेली निवडणूक, असा सवालही विचारला जात होता.

दरम्यान, विधानसभेला रमेश लटके यांचा १६ हजार ९६४ इतक्या मताधिक्याने विजय झाला. लटकेंना जवळपास ६२ हजार, तर पटेलांना जवळपास ४५ हजार मतं मिळाली होती. त्यानंतर पटेल भाजपात पुन्हा सक्रिय झाले. २०२० मध्ये त्यांना मुंबई उत्तर पश्चिम जिल्ह्याचे महामंत्रिपद देण्यात आले. अंधेरी पूर्व मतदारसंघात १० ते १२ टक्के गुजराती, मारवाडी, जैन मतदार आहेत. तर २० टक्के उत्तर भारतीय मतदार आहेत. या मतांवर नजर ठेवून पटेल यांना उमेदवारी मिळण्याची चिन्हं आहेत. या मतदारसंघात निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपकडून आशिष शेलार यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Andheri East by poll will be contest by BJP leader Murji Patel check details 21 September 2022.

हॅशटॅग्स

#Murji Patel(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x