29 April 2024 12:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, स्टॉक तेजीत येतोय, टार्गेट प्राईस जाणून घ्या Penny Stocks | एक वडापावच्या किमतीत 16 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत करतील श्रीमंत PSU Stocks | हा PSU शेअर बंपर तेजीत वाढणार, 2 महिन्यात होईल मोठी कमाई, काय म्हटलं तज्ज्ञांनी? IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर्स 30 दिवसात मोठी परतावा देणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर IREDA Share Price | IREDA शेअर्स खरेदीसाठी गुंतवणूकदार तुटून पडले, कंपनीबाबत लेटेस्ट अपडेट, फायदा घेणार? Smart Investment | स्मार्ट इन्व्हेस्टमेंट! दर महिन्याला 5-10-15 हजार रुपये गुंतवून तुम्ही 1 कोटी रुपये मिळवू शकता HDFC Mutual Fund | सुवर्ण संधी! HDFC म्युच्युअल फंडाची नवी योजना लाँच, 100 रुपयांपासून करा गुंतवणूक
x

Adipurush Movie | हॉलिवूड नाही तर 'आदिपुरुष' चित्रपटामध्ये चाहत्यांना पहायला मिळणार VFX सीन, जबरदस्त ट्रेलर पाहिला का?

Adipurush Movie

Adipurush Movie | गेल्या दिवसांपासून प्रेक्षकवर्ग टॉलिवूड पट्ट्याकडे वळाला आहे. हिंदी चित्रपट सतत बॉयकॉट होत असल्याचे प्रेक्षकांचे बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये मन रमेना म्हणायला हरकत नाही. अश्यातच टॉलिवूड पट्ट्यातून एक से बढकर एक चित्रपट समोर येत आहेत. दरम्यान, ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाची कथा ही प्रभु श्री राम यांच्यालवर आधारित आहे. असे ही समोर येत आहे की, या चित्रपटामध्ये रामायणाच्या वेगवेगळ्या कथा दाखवल्या जाणार आहेत आणि या चित्रपटाचे बजेट हे नुकताच रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा आलेला ब्रह्मास्त्र चित्रपटापेक्षा जास्त असणार आहे. तसेच बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या बाबतीतही हा चित्रपट ब्रह्मास्त्रपेक्षाही मोठा असणार आहे.

भयानक रावण असेल 8 फूट उंचीचा
सैफ अली खान रावणाच्या भुमिकेमध्ये दिसून येणार आहे तर प्रभास प्रभु श्री राम यांची भूमिका साकारणार आहे. दरम्यान, आदिपुरुष चित्रपटाबद्दल तुम्हाला हे जाणून घेणे महत्वाचे आहे की, पहिल्यांदाच राम आणि रावणाची पात्रे इतक्या मोठ्या प्रमाणावर दाखवली जाणार आहेत. या चित्रपटामध्ये रावणाचे पात्र साकारणाऱ्या सैफ अली खानची उंची 8 फूट वाढवण्यात आली आहे.

बॉलिवूडमध्येही पाहता येणार व्हीएफएक्ससह चित्रपट
चित्रपट चाहत्यांनी जेव्हा जेव्हा व्हीएफएक्ससह चित्रपट पाहायचे होते तेव्हा त्यांना हॉलीवूड कडे वळावे लागले मात्र ब्रह्मास्त्र आणि राजामौली यांनी हे चित्र पुर्ण पणे बदलून टाकले आहे. आदिपुरुष या परंपरेला आणखी पुढे नेणार असल्याचे बोलले जात आहे आणि या चित्रपटामध्ये प्रेक्षक वर्गाला आतापर्यंतचे काही दमदार व्हीएफएक्स सीन्स पाहायला मिळतील.

रामायणातील सर्वात अनोखी कथा
आज्जी आजोबा यांच्या तोंडून आपण कायमच रामायणाच्या कथा ऐकल्या आहेत. त्यातील बोध ते कायमच आपल्याला देत आले आहेत. मात्र आपल्याला ते आता मोठ्या प्रमाणात पहायला मिळणार आहे. असे समोर आले आहे की, या चित्रपटामध्ये राम आणि रावणाची व्यक्तिरेखा समान दाखवण्याचा निर्माते प्रयत्न करणार आहेत. सामान्यतः रावण फक्त वाईट आणि राम फक्त चांगला असे म्हटले जाते, तर श्रीलंका आणि भारत या बाबतीत भिन्न विचार करतात.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Adipurush Movie will see VFX scene Checks details 21 September 2022.

हॅशटॅग्स

Adipurush(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x