16 May 2024 12:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या Praj Industries Share Price | अशी संधी सोडू नका! फटाफट 50% परतावा मिळेल, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला Triveni Turbine Share Price | 97 रुपयाच्या शेअरची कमाल! 3 वर्षात 470% परतावा दिला, शेअर अप्पर सर्किट हिट करतोय RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेल्वे स्टॉक बुलेट ट्रेनच्या वेगाने परतावा देणार HAL Share Price | PSU स्टॉक HAL सुसाट तेजीत परतावा देणार, परतावा पाहून खरेदीला ऑनलाईन गर्दी Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 16 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांकडून टाटा पॉवर शेअर्ससाठी 'बाय' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस केली जाहीर
x

WhatsApp Updates | व्हॉट्सॲपचं नवं फीचर, 1000 हून अधिक लोक लवकरच ग्रुपमध्ये अ‍ॅड करू शकतील, अधिक वाचा

WhatsApp Updates

WhatsApp Updates | व्हॉट्सॲप ॲपमध्ये नवनवीन अपडेट्स सादर करतं, जेणेकरून युजर्सला एक चांगला अनुभव मिळू शकेल. व्हॉट्सॲपवरील नव्या फिचर्समुळे चॅटिंगचीही सोय होते. आता व्हॉट्सॲप आणखी एक नवं फिचर आणण्याच्या तयारीत आहे, जे खासकरून ग्रुपसाठी आणलं जाणार आहे. अशी माहिती मिळाली आहे की व्हॉट्सॲप लवकरच आपल्या जुन्या फीचरचे अपडेट्स सादर करत आहे, जेणेकरून ग्रुपमध्ये 1,024 मेम्बर्स जोडले जाऊ शकतात.

व्हॉट्सॲप ट्रॅकर WABetaInfo ने ही माहिती दिली आहे. हे फीचर व्हॉट्सॲपने काही बीटा टेस्टर्ससाठी सादर केलं आहे, जे अँड्रॉईड आणि आयओएस दोन्ही युजर्ससाठी आहे, अशी माहिती समोर आली आहे. याआधी बीटा युझर्सला कॅप्शनसह डॉक्युमेंट शेअर करण्यासाठी एक फीचर देण्यात आलं आहे.

तत्पूर्वी जूनमध्ये इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मने या ग्रुपमध्ये 512 पर्यंत सहभागींना जोडण्याची सुविधा सुरू केली होती. WABetaInfo ने याबद्दल एक स्क्रीनशॉटही शेअर केला आहे, ज्यामध्ये हे नवीन फीचर कसे दिसेल हे पाहता येईल.

WhatsApp-Updates

याशिवाय युजर्सची प्रायव्हसी लक्षात घेऊन अनेक नवीन फिचर्स येत आहेत. रिपोर्ट्सनुसार, कंपनी पेंडिंग ग्रुप पार्टिसिपल्स फीचर घेऊन येत आहे. सध्या हे फीचर विकासाच्या टप्प्यात आहे. हे अॅप भविष्यातील अपडेट्ससह रोलआउट केले जाईल.

स्क्रीनशॉटनुसार, पेंडिंग पार्टिसिपल्स नावाचा एक नवीन अतिरिक्त विभाग ग्रुप इन्फोमध्ये आढळेल. त्यावर क्लिक केल्यास ग्रुप अॅडमिनला ग्रुप अॅडमिनला ग्रुपमध्ये सामील होऊ इच्छिणाऱ्या सर्व लोकांची विनंती दिसेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: WhatsApp Updates on group members limit check details 09 October 2022.

हॅशटॅग्स

#WhatsApp Updates(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x