17 May 2024 5:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला Penny Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतील
x

अंधेरी पूर्व पोटनिवडणूक, बावनकुळे म्हणाले आम्ही 51 टक्के जिंकलो असतो, नंतर म्हणाले 100 टक्के जिंकलो असतो, सगळा गोंधळ

Andheri East By Poll

Andheri East By Poll Assembly Election | अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. या निवडणुकीत भाजपने माघार घेतली आहे. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे अंधेरीची पोटनिवडणूक होत आहे. रमेश लटके यांना श्रद्धांजली म्हणून ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं होतं.

यानंतर भाजप काय निर्णय घेतं याकडेच सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. अशात आता भाजपने आपला उमेदवार मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्यामुळे आम्ही ही निवडणूक लढवत नसल्याचं भाजपने सांगितलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी याबाबत माहिती दिली.

विजयाच्या खात्रीत गोंधळ :
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला तेव्हा ते थोडे गोंधळल्याचं पाहायला मिळालं. ते म्हणाले आम्हाला विजयाची ५१ टक्के खात्री होती असं सांगताना पुढे ते पुन्हा म्हणाले की आमचा विजय १०० टक्के होणार होता. या एकूण संवादातून सगळं स्क्रिप्टेड प्रकरण आता अंगलट आल्याचं पाहायला मिळतंय.

भाजपचे राष्ट्रीय महासचिव सी.टी. रवी यांच्यासोबत मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांची बैठक झाली. त्याचबरोबर आशिष शेलार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही चर्चा झाली. राज ठाकरे आणि शरद पवारांपाठोपाठ सत्तेत सहभागी असलेल्या शिंदे गटानेच बिनविरोधाची मागणी केल्यानं भाजपवर दबाव वाढल्याचं बोललं जात होतं.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Mumbai Andheri East By Poll Assembly Election 2022 check details 17 October 2022.

हॅशटॅग्स

#Murji Patel(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x