8 May 2024 5:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 08 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Jindal Stainless Share Price | मल्टिबॅगर 307% परतावा देणारा स्टॉक 'खरेदी' करण्याचा सल्ला, अल्पावधीत 30% परतावा मिळेल BHEL Share Price | PSU BHEL स्टॉकवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून मालामाल करणारी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकचार्ट काय संकेत देतोय? या प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांचा इशारा काय? Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची मजबूत परतावा देणारी योजना, बचतीवर रु.56,830 फक्त व्याज मिळेल SBI Mutual Fund | नोट छापायची मशीन आहे ही SBI म्युच्युअल फंड योजना, 5,000 च्या SIP वर 1.37 कोटी रुपये परतावा Waaree Renewables Share Price | 2 रुपयाच्या शेअरची कमाल! 4 वर्षात दिला 137000% परतावा, खरेदी करणार?
x

Tata Group Stock | टाटा के साथ नो घाटा, 1263 टक्के परतावा देणारा हा शेअर खरेदीचा तज्ञांचा सल्ला, टार्गेट प्राईस तपासा

Tata Group Stock

Tata Group Stock | टाटा ग्रुपच्या ऑटो सेक्टरमधील कंपनीने सप्टेंबर तिमाहीत जाहीर केलेले निकाल फारसे चांगले नव्हते. तिमाही निकालात मात्र कंपनीचा तोटा कमी झाला असून कंपनीच्या महसुलात जबरदस्त वाढ झाली आहे. तिमाही निकालानंतर बऱ्याच ब्रोकरेज हाऊसेसनी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे.

आपण ज्या कंपनीबद्दल चर्चा करत आहोत, तिचे नाव आहे, Tata Moters. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स थोड्या पडझडीसह 432.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. चढ-उतारांच्या चक्रात अडकलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सनी मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणुकदारांना 5 टक्के परतावा कमावून दिला आहे. या वर्षी आतापर्यंत टाटा मोटर स्टॉक 13 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. 1 जानेवारी 1999 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 31.73 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 1999 नंतर या स्टॉकमध्ये 1263 टक्क्यांची वाढ झाली असून, शेअर आता 432.65 रुपयांवर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 528.50 रुपये आहे. तर नीचांक किंमत पातळी 366.20 रुपये होती.

टाटा मोटर्स खरेदी-विक्री-होल्ड :
जागतिक ब्रोकरेज फर्म नोमुराने टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सवर बाय रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. टाटा मोटर्स कंपनीचा स्टॉक गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर सिद्ध झाला आहे. नोमुराने टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्ससाठी 521 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. 27 नोव्हेंबर 2020 रोजी या कंपनीचे शेअर 180.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अशाप्रकारे मागील दोन वर्षांत हा स्टॉक 142 टक्के वाढला आहे.

मोतीलाल ओसवाल फर्मने ही टाटा मोटर्स कंपनीच्या स्टॉकवर बाय रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. भारतीय ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मोतीलाल ओसवाल यांनी टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सवर 500 रुपये लक्ष किंमत दिली आहे. टाटा मोटर्स ही एक लार्ज कॅप कंपनी असून तिचे बाजार भांडवल 1.45 लाख कोटी रुपये आहे.

विश्लेषकांचे मत :
टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स फॉलो करणाऱ्या 31 पैकी 9 विश्लेषकांनी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स त्वरित खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. 12 तज्ञ Buy On Dip चा सल्ला देत आहेत. याशिवाय, 8 विश्लेषक ज्यांच्याकडे हा स्टॉक आहे त्यांना होल्ड करण्याचा सल्ला देत आहेत. दोन विश्लेषक हा स्टॉक त्वरित विकून बाहेर पडण्याचा सल्ला देत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Tata Moter a Tata Group Stock is increasing and Brokerage firm has given New Target price for investment on 1 December 2022.

हॅशटॅग्स

#Tata Group Stock(29)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x