14 May 2024 1:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mobile Recharge Hike | बापरे! कोट्यवधी मोबाइल युजर्सना झटका लागणार! मोबाईल रिचार्ज खर्च 25% वाढणार Budh Rashi Parivartan | बुध राशी परिवर्तन, या 5 राशींसाठी पुढचे 17 दिवस अत्यंत लाभदायक, तुमची राशी कोणती? Mutual Fund SIP | पगारदारांची पसंती 'या' स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजनांना, नोकरदार वर्ग मालामाल होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! जुलैपासून बदलणार DA ची रक्कम, किमान वेतनात वाढ होणार RVNL Share Price | PSU RVNL शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, स्टॉकला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, किती फायदा? Bisil Plast Share Price | शेअर प्राईस 3 रुपये! 2 दिवसात 20% परतावा, पैशाचा पाऊस पाडतोय हा स्टॉक Numerology Horoscope | 14 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल
x

बुलेट ट्रेनसाठी निसर्गाचा विध्वंस! ५३,४६७ खारफुटींच्या कत्तलीस परवानगी

Narendra Modi, BJP, Bullet Train

मुंबई : बुलेट ट्रेनसाठी ठाणे, नवी मुंबई व पालघर या पट्ट्यात तब्बल १३.३६ हेक्टर जागेवर पसरलेल्या एकूण ५३,४६७ खारफुटींची कत्तल करण्यास केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान मंत्रालयाने (एमओईएफ) परवानगी दिल्याची अधिकृत माहिती नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोेरेशन (एनएचएसआरसी)ने स्वतः हायकोर्टाला सोमवारी दिल्याचे वृत्त आहे.

एमओईएफने दिलेल्या परवानगीमुळे आता हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनकडे बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या असल्याचा दावा नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनने केला आहे. महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी (एमसीझेडएमए)ने सात मार्च रोजी एनएचएसआरसीएलचा खारफुटी तोडण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला. एमसीझेडएमएने केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाला पाठविलेल्या पत्रानुसार, मुंबई ते ठाणेदरम्यान ३२.४३ हेक्टर जागेवर पसरलेले कांदळवन या ठिकाणाहून हटवावे लागेल.

एमसीझेडएमएने बुलेट ट्रेनसाठी कांदळवन नष्ट करण्यास नकार दिल्याने एनएचएसआरसीएलने या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेच्या सुनावणीत वरील माहिती हायकोर्टाला देण्यात आली. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी ठाणे, नवी मुंबई, पालघर या पट्ट्यातील खारफुटी हटविण्यासाठी एनएचएसआरसीएलने एमसीझेडएमला अर्ज केला. परंतु, २२ डिसेंबर २०१८ रोजी प्राधिकरणाने एनएचएसआरसीएलचा अर्ज फेटाळला.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x