15 May 2024 2:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Share Price | स्वस्त GTL शेअर मालामाल करणार, कंपनीकडून मोठ्या फायद्याची अपडेट आली Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसच्या या योजनेत ₹2000, ₹3000 किंवा ₹5000 बचतीवर किती परतावा मिळेल? नोट करा NBCC Share Price | मालामाल होण्याची संधी! NBCC शेअरसहित हे 4 शेअर्स 50% पर्यंत परतावा देतील, स्टॉक सेव्ह करा Penny Stocks | एक वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, सेव्ह करा टॉप 10 पेनी स्टॉकची यादी Vodafone Idea Share Price | 13 रुपयाचा शेअर देईल 100% परतावा, एक बातमी येताच स्टॉक खरेदीला तुफान गर्दी Reliance Power Share Price | 26 रुपयाचा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, यापूर्वी अल्पावधीत दिला 2168% परतावा Old Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीचा लाभ घेण्यासाठी या तारखेपर्यंत भरा ITR, किती फायदा होईल पहा
x

Karnataka Voters Data Analysis | कर्नाटकातील मतदानाच्या मॉडेलने भाजपला धडकी, काय सांगते आकडेवारी? भाजपचा मतदारही दुरावतोय

Karnataka Voters Data Analysis

Karnataka Voters Data Analysis | कर्नाटक निवडणुकीत सत्ताधारी भाजपला तब्बल ६८ जागा गमवाव्या लागल्या आहेत. पाच वर्षांपूर्वी १०४ जागा जिंकणाऱ्या भाजपला यावेळी भयंकर सत्ताविरोधी लहरीला सामोरे जावे लागले आणि ते अवघ्या ६६ जागांवर घसरले. निवडणुकीपूर्वी भाजपने आपल्या यशस्वी राजकीय प्रयोगांचा भाग म्हणून तेथील अनेक दिग्गजांची तिकिटे कापून अनेक नव्या चेहऱ्यांवर संधी देण्याचा धोका पत्करला होता, पण कर्नाटकच्या जनतेने तो स्पष्टपणे नाकारला आहे.

एकप्रकारे मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशसारख्या राज्यांमध्ये भाजप जे गुजरात मॉडेल राबवत आहे, ते दक्षिणेकडील राज्याने नाकारले आहे. मात्र काँग्रेसने सुद्धा डेटा वर्गीकरण सुरु केल्याने आगामी निवडणुकीत मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशसारख्या राज्यांमध्ये सुद्धा भाजपाला असाच धक्का बसू शकतो असं म्हटलं जातंय.

भाजपचे तीनही कार्ड अपयशी ठरले
भाजपने हिंदू कार्ड, दलित कार्ड आणि लिंगायत कार्डही खेळले पण सर्व अपयशी ठरले. निवडणुकीच्या आकडेवारीचे विश्लेषण केल्यास असे दिसून येते की, नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये लिंगायत समाजात भाजपचा स्ट्राईक रेट काँग्रेसच्या तुलनेत एक तृतीयांश इतका खाली आला आहे. काँग्रेसने लिंगायत समाजातून ५१, भाजपने सर्वाधिक ६८ आणि जेडीएसने ४४ उमेदवार उभे केले होते.

काँग्रेसकडून सर्वाधिक लिंगायत आमदार विजयी
या निवडणुकीत काँग्रेसचे एकूण ३९ लिंगायत उमेदवार विजयी झाले आहेत. काँग्रेसच्या विजयाचा स्ट्राईक रेट ७४.५१ टक्के होता, तर भाजपचा स्ट्राईक रेट केवळ २६.४७ टक्के आणि जेडीएसचा ४.५५ टक्के होता. त्याचप्रमाणे अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या जागांवर काँग्रेसने सर्वोत्तम कामगिरी केली आहे. पक्षाने ५८.३३ टक्के स्ट्राईक रेटसह एकूण ३६ अनुसूचित जातीचे उमेदवार उभे केले होते. भाजपने ३७ एससी उमेदवार उभे केले होते. त्यांचा विजयाचा स्ट्राईक रेट ३२.४३ टक्के आणि जेडीएसचा विजय दर ९.०९ टक्के (३३ उमेदवारांच्या तुलनेत) आहे.

एसटी उमेदवारांच्या विजयातही काँग्रेस आघाडीवर
अनुसूचित जमातींच्या बाबतीतही काँग्रेस आघाडीवर आहे. काँग्रेसने १७, भाजपने १८ आणि जेडीएसने १४ उमेदवार उभे केले होते, परंतु सर्वाधिक ८८.२४ टक्के स्ट्राईक रेट काँग्रेसचा होता, तर भाजपचा स्ट्राईक रेट ११.११ टक्के आणि जेडीएसचा केवळ ७.१४ टक्के होता.

भाजपच्या नव्या उमेदवारांचा पराभव
एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, भाजपने 21 विद्यमान आमदारांची तिकिटे कापली होती आणि 2018 मध्ये जिंकलेल्या विधानसभेच्या 224 जागांपैकी निम्म्यापेक्षा कमी म्हणजेच 103 जागा जिंकलेल्या उमेदवारांना उमेदवारी दिली होती. पक्षाने ८२ जागांवर नव्या चेहऱ्यांना मैदानात उतरवले होते, पण जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. त्यापैकी फक्त तीन जण विजयी झाले. भाजपने काँग्रेस किंवा जेडीएसमधून पक्षांतर केलेल्या १९ जणांना तिकीट दिले होते, परंतु त्यापैकी केवळ सहा जणांनाच विजय मिळवता आला. भाजपच्या १०३ विद्यमान आमदारांपैकी ३७ आमदार निवडणुकीत पराभूत झाले.

गुजरात-एमपी-यूपीमध्ये हा प्रयोग यशस्वी झाला होता
भाजपने असा प्रयोग करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड अशा अनेक राज्यांमध्ये भाजपने या फॉर्म्युल्याचा यशस्वी प्रयोग केला असला तरी कर्नाटकात मात्र त्याची बाजी फोल ठरल्याचे दिसून येत आहे. नव्या चेहऱ्याला उमेदवारी देण्याच्या भाजपच्या जुन्या रणनीतीमुळे भाजपमध्ये बंडखोरी झाली होती. अनेक जागांवर बंडखोरी आणि सत्ताविरोधी लाटेने भाजपचे राजकीय विजयाचे स्वप्न भंगले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Karnataka Voters Data Analysis check details on 16 May 2023.

हॅशटॅग्स

#Karnataka Voters Data Analysis(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x