26 April 2024 12:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 3 रुपये ते 9 रुपये किंमतीच्या स्वस्त 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मालामाल होऊन जाणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर्स चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर RVNL Share Price | अल्पावधीत 1985 टक्के परतावा देणारा RVNL शेअर रॉकेट तेजीत धावणार, फायद्याची अपडेट आली Bonus Shares | खरेदी करा हा शेअर! फ्री बोनस शेअर्स सुद्धा मिळतील, शेअरने 6 महिन्यांत 210% परतावा दिला Post Office Interest Rate | होय! या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, फायद्याचा मोठा व्याज दर SBI Mutual Fund | तज्ज्ञांनी सुचवल्या 5 व्हॅल्यू फंड योजना, SBI सहित मालामाल करणाऱ्या टॉप SIP योजना सेव्ह करा 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांचं टेन्शन वाढवणारी अपडेट, थेट महागाई भत्ता आणि HRA होणार परिणाम
x

Bharat Jodo Yatra 2 | भाजपची चिंता वाढणार! काँग्रेस लवकरच सुरू करणार भारत जोडो यात्रा पार्ट-2, राहुल गांधी प्रचंड मेहनतीच्या मोडवर

Bharat Jodo Yatra 2

Bharat Jodo Yatra 2 | काँग्रेसने संपूर्ण दक्षिण भारत भाजप मुक्त केला आहे. कर्नाटक विजयाच्या यशाचे श्रेय राहुल गांधी आणि भारत जोडो यात्रेला देखील दिला जातोय. अनेक राज्यातील इतर पक्षातील नेत्यांनी सुद्धा ते मान्य केलंय. काँग्रेस पक्षाने आपल्या ट्विटर हँडलवरून भारत जोडो यात्रे दरम्यानचा एक व्हिडिओ शेअर केला होता आणि म्हटले होते की, मी अजय आहे, मला खात्री आहे की आता मला कोणीही थांबवू शकणार नाही.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो यात्रेची सुरुवात तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून झाली आणि ती काश्मीरमध्ये संपली. या दौऱ्याच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी बराच काळ कर्नाटकात घालवला. येथे राहुल गांधी यांनी २१ दिवसांत ५११ किलोमीटरचा प्रवास केला होता. विधानसभेच्या ५१ जागा असलेल्या राज्यातील सात जिल्ह्यांतून ही यात्रा गेली होती. या ५१ जागांपैकी ३४ जागांवर काँग्रेसने विजय मिळवला आहे.

तत्पूर्वी, भारत जोडो यात्रेद्वारे पक्षाला पहिले यश हिमाचल प्रदेशात मिळाले. काँग्रेसनेही येथे भाजपकडून सत्ता हिसकावून घेतली. हिमाचल प्रदेश विधानसभेच्या ६८ पैकी तब्बल ४० जागा काँग्रेसने जिंकल्या. भाजप अवघ्या २५ जागांवर घसरला. या मालिकेमुळे राहुल गांधी यांची प्रतिमा अनेक पटीने वाढली आहे. गुडघ्याला दुखापत झाली होती तरी राहुल गांधींची चाल मीडिया आणि सोशल मीडियाच्या हेडलाईन्समध्ये कायम राहिली. थंडीत टी-शर्ट घालून प्रवास करण्याचीही चर्चा होती. २०१४ पासून सुस्त असलेल्या काँग्रेसजनांनीही यात्रेदरम्यान रस्त्यावर उतरून आपली उपस्थिती जनतेत अनुभवली होती.

इंदिरा अम्मा : तेलंगणात काँग्रेसची लाट येण्याचे संकेत
विशेष म्हणजे भारत जोडो यात्रेला दक्षिण भारतातील तेलंगणात देखील मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे आगामी तेलंगणा विधानसभा निवडणुकीत सुद्धा काँग्रेसची लाट येण्याचे संकेत स्थानिक वृत्तवाहिन्यांकडून येतं आहेत. त्यात प्रियांका गांधी यांच्यामध्ये इंदिरा अम्मा दिसतात असे इथले मतदार बोलू लागल्याने त्यांच्या तेलंगणात विराट सभा होताना दिसत आहेत.

परिणामी, भारत जोडो यात्रेचे यश पाहता पक्ष लवकरच यात्रेचा भाग-२ सुरू करू शकतो असं वृत्त आहे. यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात प्रामुख्याने तीन राज्यांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. या राज्यांमध्ये यूपी, बिहार आणि पश्चिम बंगालचा समावेश आहे. तिन्ही राज्यांमध्ये पक्षाची अवस्था अत्यंत वाईट आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा पक्ष टीएमसी सत्तेत आहे तर भाजप विरोधी पक्षात आहे. उत्तर भारतात भाजपाला मोठा धक्का देण्याची व्यूहरचना काँग्रेस सध्या आखात आहे. बिहारमध्ये काँग्रेस महाआघाडीचा भाग असून नितीश सरकारमध्ये मित्रपक्ष आहे आणि त्यामुळे बिहारमध्ये भाजपचा सुपडा साफ होईल असे संकेत आहेत. तसेच हिंदी पट्ट्यातील मध्य प्रदेशात आणि राज्यस्थान मध्ये स्थानिक नेत्यांची टीम आणि पक्ष मजबूत स्थितीत आहे. या राज्यातून आधीच भारत जोडो यात्रा गेल्याने मोठा फायदा होईल अशी काँग्रेसला आशा आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Bharat Jodo Yatra 2 will begin soon check details on 17 May 2023.

हॅशटॅग्स

#Bharat Jodo Yatra 2(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x