29 April 2024 2:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करतोय हा शेअर! वेळीच खरेदी करा, मागील 1 वर्षात दिला 1700 टक्के परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, स्टॉक तेजीत येतोय, टार्गेट प्राईस जाणून घ्या Penny Stocks | एक वडापावच्या किमतीत 16 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत करतील श्रीमंत PSU Stocks | हा PSU शेअर बंपर तेजीत वाढणार, 2 महिन्यात होईल मोठी कमाई, काय म्हटलं तज्ज्ञांनी? IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर्स 30 दिवसात मोठी परतावा देणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर IREDA Share Price | IREDA शेअर्स खरेदीसाठी गुंतवणूकदार तुटून पडले, कंपनीबाबत लेटेस्ट अपडेट, फायदा घेणार?
x

Shah Rukh Khan | आरोपीच्या कुटुंबीयांशी केलेले बोलणे हे सेवा नियमांचे उल्लंघन? व्हाट्सअँप चॅट लीकवरून हायकोर्टात हेतूवर प्रश्न उपस्थित

Highlights:

  • चॅट मीडियात लीक झाल्याबद्दल कोर्टात प्रश्न चिन्ह
  • सीबीआयला ३ जूनपर्यंत उत्तर सादर करण्याची मुदत
  • समीर वानखेडेंकडून सेवा नियमांचे उल्लंघन
Shah Rukh Khan Whatsapp Chat

Shah Rukh Khan | आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात खंडणीचा आरोप असलेल्या समीर वानखेडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि शाहरुख खान यांच्यातील चॅट मीडियात लीक झाल्याबद्दलही कोर्टाने प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे. त्या चॅट्स प्रसारमाध्यमांना लीक करणारे आपणच आहात का, अशी विचारणा न्यायालयाने वानखेडे यांना केली.

हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असतानाही त्यासंबंधीच्या गोष्टी सोशल मीडिया आणि मीडियामध्ये का फिरत आहेत, असा सवाल न्यायालयाने केला. मात्र उच्च न्यायालयाने समीर वानखेडे यांना ८ जूनपर्यंत अटक होणार नाही, असा दिलासा दिला आहे.

दरम्यान, न्यायालयाने सीबीआयला ३ जूनपर्यंत उत्तर सादर करण्यासाठी मुदत दिली आहे. इतकंच नाही तर समीर वानखेडे म्हणाले की, मला गेल्या 4 दिवसांपासून सतत धमक्या येत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची माहिती मी मुंबई पोलीस आयुक्तांना देणार आहे. उच्च न्यायालयाने समीर वानखेडे यांना व्हॉट्सअॅप चॅट लीक होण्यास आपण जबाबदार आहात का, अशी विचारणा केली.

लीक झालेल्या चॅटमध्ये शाहरुख खान आणि वानखेडे यांच्यात आर्यन खानच्या अटकेबाबत चर्चा होताना दिसत आहे. या चॅटमध्ये शाहरुख खान आपल्या मुलासाठी कळकळीची विनंती करताना दिसत आहे. मात्र, या प्रकरणातही समीर वानखेडे यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. विशेष म्हणजे एवढी प्रतिष्ठत व्यक्ती समीर वानखेडेंसोबत थेट संपर्कात का होती आणि वानखेडे सुद्धा ते न टाळता संवाद सुरूच ठेवून होते हे सुद्धा समोर आल्याने त्यावरही संशय व्यक्त करण्यात येतं आहे.

सेवा नियमांचे उल्लंघन
याचे कारण म्हणजे समीर वानखेडे यांनी आरोपीच्या कुटुंबीयांशी केलेले बोलणे हे सेवा नियमांचे उल्लंघन मानले जात आहे. या प्रकरणात एका प्रामाणिक अधिकाऱ्याला त्रास दिला जात असल्याचे वानखेडे यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले. वानखेडे यांनी तपासात सहकार्य करण्याची भाषा केली असतानाही त्यांना त्रास का दिला जात आहे? वानखेडे तपासात सहकार्य करत नसल्याचे सीबीआयने म्हटले आहे. वानखेडे यांना या प्रकरणाशी संबंधित अनेक पैलूंचा खुलासा करायचा नाही, असे एजन्सीने म्हटले आहे. वानखेडे यांनीच शाहरुखसोबतच्या संभाषणाचे चॅट व्हायरल केले होते, असे सीबीआयने म्हटले आहे.

News Title: Shah Rukh Khan Whatsapp Chat with Sameer Wankhede check details on 22 May 2023.

हॅशटॅग्स

#Shah Rukh Khan Whatsapp Chat(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x