19 March 2024 2:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Infra Share Price | मार्ग श्रीमंतीचा! रिलायन्स इन्फ्रा शेअरने 2 दिवसात 20 टक्के परतावा दिला, खरेदी करावा IFCI Share Price | 4 रुपयाच्या शेअरने मालामाल केलं, अल्पावधीत दिला 875 टक्के परतावा, खरेदी करणार? TCS Share Price | टीसीएस शेअर्समध्ये मोठी घसरण सुरु, कंपनीच्या मोठ्या निर्णयाने शेअर पुढे किती घसरणार? Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीबाबत अपडेटने शेअरवर परिणाम, शेअरची प्राईस खूप घसरणार? IPO GMP | स्वस्त IPO शेअरने लॉटरी लागली! एकदिवसात 101 टक्के परतावा मिळाला, गुंतवणूकदार मालामाल IRFC Vs RVNL Share Price | रेल्वे सेवा संबंधित शेअर्स खरेदी करावे? 1 वर्षात मल्टिबॅगर परतावा दिला, पण पुढे काय होणार? Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर्समध्ये जोरदार खरेदी सुरू, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राइस जाहीर
x

पुरावा! 'डिवायडर इन चीफ'चे लेखक आतिष यांचं स्वतः राम माधव यांनी कौतुक केलं होतं

Narendra Modi, Loksabha Election 2019

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेतील जगप्रसिद्ध टाइम मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकले होते. परंतु यावेळी नरेंद्र मोदींचा मुखपृष्ठावरील फोटो हा सकारात्मक लेखासंदर्भात नसून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख ‘टाइम’ने थेट दुफळी निर्माण करणारा भारतातील प्रमुख नेता असा केला होता. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी हिंदुत्वावर आधारित राजकारण करत असल्याने देशात ध्रुवीकरण झाल्याचा आरोप मोदींसंदर्भात लेख लिहिणाऱ्या आतिश तासीर यांनी प्रसिद्ध केला होता.

‘लोकप्रियतेमुळे कोलमडलेली लोकशाही म्हणून भारताचे नाव घेता येईल’ या वाक्याने लेखाची सुरुवात झाली होती. ‘जगातील सर्वात मोठी लोकशाही मोदी सरकारला अजून ५ वर्ष देईल का?’ अशा मथळ्याखाली टाइम मासिकाच्या आशिया अवृत्तीमध्ये कव्हरस्टोरी छापण्यात आली आहे. या लेखामध्ये तुर्की, ब्राझील, ब्रिटन आणि अमेरिकेप्रमाणेच भारतातही लोकशाही मुल्यांपेक्षा एखाद्याची लोकप्रियता अधिक वाढल्याचे दिसत आहे असे लेखकाने म्हटले आहे. ‘लोकप्रियतेमुळे या आधी दुर्लक्षित केल्या जाणाऱ्या बहुसंख्याकांच्या भावनांना वाचा फोडण्याचे काम झाले आहे. परंतु त्याच वेळी यामुळे देशातील वातावरण निकोप व उत्साहवर्धक राहिलेले नाही,’ असं देखील तासीर यांनी या लेखात म्हटले होते.

त्यानंतर भाजपने त्यांचा संबंध थेट काँग्रेस सोबत जोडून त्यांचे पाकिस्तानसोबत संबध असल्याच्या बातम्या समाज माध्यमांवर पेरण्यास सुरुवात केली होती. मात्र याच लेखक आतिश तासीर यांचं स्वतः भाजपचे वरिष्ठ नेते राम माधव यांनी तोंडभरून कौतुक केलं होतं. स्वतः पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांनी ते ट्विट शेअर केल्याने भाजप पुन्हा तोंडघशी पडलं आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x